Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्र शिंदे सरकारच्या वतीने महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी एक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे त्यामध्ये महिलांना प्रती महिना 1500 रुपयांचे राशी देण्यात येणार आहे आणि ज्या योजनेचे नाव माझी लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात आलेली आहे याविषयीचे अधिकारीक सूचना महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 2.5 लाख रुपये देण्याची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. जर तुम्ही महिला असाल आणि महाराष्ट्रातील नागरिक असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
महाराष्ट्रातील महिलांच्या हिताचा विचार करून ही योजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे याचा लाभ महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणातील महिला वर्गाला होईल तसेच यासाठी काही अटी आणि शर्ती पण लागू करण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त महिलांना ladki bahin yojana योजनेचा लाभ मिळावा असा सरकारचा उद्देश आहे आणि त्यामुळे सरकारी या योजनेची अंमलबजावणी अत्यंत चोखपणे करत आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेच्या घोषणाची तारीख | 28 जून , 2024 |
योजनेची घोषणा कोणी केली | उपमुख्यमंत्री अजित पवार |
योजना लाभार्थी राज्य | महाराष्ट्र |
लाडकी बहीण योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये देणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला |
प्रत्यक्ष लाभ | महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना डीबटी पद्धतीने 1500 रुपये |
योजना अंमलबजावणी तारीख | 1 जुलै 2014 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू |
पहिला हफ्ता तारीख | 14 ऑगस्ट, 2024 |
पहिला हफ्ता पूनर्वितरण | 30 ऑगस्ट, 2024 |
दुसरा हप्ता तारीख | 15 सप्टेंबर, 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
Ladki Bahin Yojana Maharashtra – माझी लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी झालेल्या 2024-25 च्या बजेटमध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातील आणि यासाठी आर्थिक अटी लागू करण्यात आले आहेत.
Ladki Bahin Yojana Maharashtra योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी महिला घेऊ शकतील. या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी मदत होऊ शकते. महाराष्ट्रातील महिलांना काहीसा आर्थिक आधार प्राप्त व्हावा यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्र सरकारमार्फत 46000 कोटी रुपयांचा निधी गठित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या आधी मध्यप्रदेश मध्ये पण लाडली बहना योजना या नावाने सरकारचे कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये महिलांना 1250 रुपये प्रति महिन्यात दिले जातात.
महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड राज्यामध्ये पण अशाच स्वरूपाची योजना सुरू करण्यात आलेली आहे तिला “मैया सन्मान योजना” असे संबोधले जात आहे आणि या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना हजार रुपये देण्याची तरतूद आहे.
Ladki Bahin Yojana अटी शर्ती
- सदर महिला महाराष्ट्राची नागरिक असावी
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे
- महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे
- बँकेमध्ये महिलेच्या नावाने खाते असावे
- महिलेकडे आधार कार्ड असले पाहिजे
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटीत, परित्यकत्या महिलांना याचा लाभ मिळेल
माझी Ladki Bahin Yojana उद्दिष्ट
Mazi ladki bahin yojana योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गातील महिलांना समाजाच्या मुख्य स्त्रोत देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक रक्कम देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये पुरुषांची 59.10% रोजंदारी मध्ये टक्केवारी आहे आणि महाराष्ट्रातील फक्त 29 टक्के महिलाच रोजगारामध्ये सक्रिय आहेत त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत प्रदान करण्यात येणार आहे.
संबंधित योजनेमुळे महिलांमध्ये काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि महिला आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी बनू शकतील. माझी लाडकी बहिणी योजनेमुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळेल.
Majhi ladki bahin yojana लाभाचे स्वरूप
लाडकी बहीण योजना मध्ये पात्र असणाऱ्या सर्व महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये राशी प्रदान केले जाईल. आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही राशी डायरेक्ट डीबीटी पद्धतीने पाठवली जाईल. यासाठी महिलेचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावी.
माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन फॉर्म प्रत
- महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- आधार कार्ड प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- हमीपत्र
नवीन जीआर नुसार पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून टाकण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Yojana Form Process
अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवक/ वॉर्ड अधिकारी/ मुख्य सेविका/ सेतू सुविधा केंद्र यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर दस्तावेजांची आणि फॉर्म ची ऑनलाईन पडताळणी करावी आणि त्यानंतर संबंधित डॉक्युमेंट पुढे मंजुरीसाठी संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कडे पाठवावेत. अंतिम मंजुरी देण्यासाठी पुढे ते जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे पाठवण्यात येतील.
माझी लाडकी बहीण योजना मध्ये ऑनलाईन फॉर्म करण्यासाठी शासनाकडून कोणतीही राशी घेण्यात येणार नाही आणि मोबाईल ॲप तसेच पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करण्यात येऊ शकतो. परंतु अर्ज भरताना सदर महिलेने तिथे उपस्थित असणे गरजेचे आहे जेणेकरून ऑनलाईन केवायसी प्रक्रिया सुरू केली जाईल.
Ladki bahin yojana official website सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून महिला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतील.
लाडकी बहीण योजना पात्रता
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावी
- महिलेकडे आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक पासबुक असावे
- राज्यातील विवाहीत, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबामधील केवळ एक अविवाहित महिला
- किमान 21 वर्षे ते कमाल 65 वर्ष वयोगटातील महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असतील
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 2.5 लाख रुपये आहे अशा कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अपात्रता निकष
- ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरतो
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वरती आहे
- जर कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून मंडळ, सरकारी विभाग, राज्य सरकार, केंद्र सरकार, उपक्रम किंवा सरकारच्या स्थानीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
- परंतु अडीच लाखापर्यंत उत्पन्न घेत असलेले बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील
- जर लाभार्थी महिला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेद्वारे पंधराशे किंवा पंधराशे पेक्षा अधिक लाभ प्रति महिना मिळवत असेल
- ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य महाराष्ट्र शासन किंवा भारत शासनाच्या बोर्ड, उपक्रम किंवा कॉर्पोरेशन चे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक असतील
- ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर कोणतीही चार चाकी वाहन नोंदणीकृत असेल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय (ladki bahin yojana Official GR)
लाडकी बहीण योजना उपयुक्त माहिती
ऑफिशियल वेबसाईट | नारीशक्ती दूत ॲप |
लाभार्थी यादी | हमीपत्र |
स्वयंघोषणापत्र | योजना स्टेटस |
ऑनलाइन अर्ज PDF | अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस |
काही महत्त्वाचे प्रश्न
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केव्हा करण्यात आली?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केव्हा सुरू होत आहे?
खाली कमेंट करुण आम्हाला कळवा की तुम्ही योजनेचा अर्ज केला की नाही:
आह्मला या योजनेचा लाभ केवा मिळेल
1 जुलै नंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा अर्ज करा आणि अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल
कधी होईल हे पोर्सस
सध्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1 जुलैपासून 15 जुलै पर्यंत अर्ज सुरू असणार आहेत
maza form jully madhe approved zala tari pn mala ladki yojnecha laabh milala nahi guide me
जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल आणि सर्व माहिती व्यवस्थित भरलेली असेल तसेच बँकेचे तपशील आणि आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.
हा अर्ज कुठे करता येईल
अद्याप शासनाकडून ऑनलाईन अर्ज साठी कोणतेही अधिकृत पोर्टल जारी करण्यात आलेले नाही लवकरच तुम्हाला या संकेतस्थळावरती त्या विषयाची माहिती प्राप्त होईल.
आम्ही अर्ज केलेला असून आमच्या अर्जाला दिस अप्रुड केलेला असून मला आधार कार्ड व राशन कार्ड मागील व पुढील बाजू अपलोड करण्यास सांगितले आहे तरी कुठल्याही प्रकारचा एडिट करण्याचा ऑप्शन ॲप मध्ये दिसत नाही तर ते डॉक्युमेंट्स कुठल्या प्रकारे अपलोड करावी
amce pan aproval sauseasful
tari paise jama nahi zhale
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावरती प्राप्त करण्याकरिता आपला आधार क्रमांक बँक खात्याबरोबर संलग्न असणे गरजेचे आहे
ॲप्लिकेशन दिसॲप्रोव झाला आहे आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म सबमिट करा असा मेसेज आला आहे.
पण डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन नाही आहे ॲप वर. प्लिज सांगा कसं काय करायचा?.
सर्वर मधील प्रॉब्लेम मुळे अर्ज अपडेट करताना समस्या येतात त्यामुळे पहाटेच्या वेळेस किंवा रात्री अर्ज अपडेट करण्याचा प्रयत्न करा आणि जर ॲप वरती डॉक्युमेंट अपलोड होतच नसतील तर मग ऑफिशियल वेबसाईट वरून प्रयत्न करा.
Online karne kaha hai lekin online ho hi nahi raha kaise kare office jao to wo bolte hai ki pehle mobile se submit karo lekin mobile se bhi to nahi ho raha kya kare ab.🥺
Due to huge quantity of online ladki bahin yojana form you have to submit it on early morning or late evening when server load is low.
login karatana problem sa येतो ceat aacuount केल्यावर sing up hot nahi आधीच खाते आहेः असे दाखवते जाते तर पुढे काय करावे लागेल मी पासवर्ड पण reset karun bagitale plz help mi
6ऑगस्टला approves चा मेसेज आलेला आहे पण अजूनही खात्यात पैसे जमा झाले नाहीत बँकेत आधार वगैरे सगळं लिंक आहे काय करावे कुठला हेल्पलाइन नंबर आहे का चौकशीसाठी
ऑफिशियल वेबसाईट नुसार 181 हा महिला हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे तसेच तुम्हाला अर्जाबद्दलची माहिती आणि इतर डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.