लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

बारा लाख लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढले, डिसेंबर चा हप्ता मिळणार की नाही Ladki Bahin Yojana Installment

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (7 votes)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि या योजनेचे आतापर्यंत 7500 रुपये म्हणजेच पाच हप्ते देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने परत महायुतीचे सरकार निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही योजना पूर्ववत सुरू राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि परत दुसऱ्या टर्म मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालय मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांनी याविषयीचे वृत्त सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित
  2. पुढील काही दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे वितरित
  3. बारा लाख लाडक्या बहिणींना आधार कार्ड लिंकिंग समस्यामुळे मागील हप्ता मिळाला नव्हता
  4. या बारा लाख महिलांना डिसेंबर चा हप्ता मिळणार की नाही

Ladki Bahin Yojana December Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे आणि त्यामध्ये मागील बारा लाख महिला ज्या आधार कार्ड समस्येमुळे वगळण्यात आल्या होत्या अशा महिलांना लाभ मिळणार आहे.

सदर बारा लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास काहीसा विलंब होऊ शकतो परंतु या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त होणार आहे.

जर आधार कार्ड संबंधातील समस्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्राप्त होणार आहे आणि या पुढील सर्व हफ्ते तुम्हाला मिळू शकतील.

जर तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीत, आजी-माजी आमदार खासदार, इन्कम टॅक्स भरणारे किंवा जर तुमच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी अंगणवाडी सेविका कडे जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. सध्या ऑनलाईन वेबसाईटवरून अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे तसेच ॲप वरून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत.

जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला असेल तर तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करावा लागेल आणि त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकाकडे अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांनी तो अर्ज मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे त्याची पडताळणी करून घ्यावी.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment