लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Update: मोठे अपडेट! फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे “4500 रुपये”

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 5/5 - (2 votes)

Ladki Bahin Yojana Update:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रितपणे 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगाने सरकारच्या वतीने दररोज लाखो अर्ज मंजूर तसेच रिजेक्ट केले जात आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना लाडके बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजना मुळे प्रति महिना पंधराशे रुपयांचे राशी देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे.

लाडकी बहीण हप्ता देण्यासाठी सरकारकडून 1 कोटी 35 लाख अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. यातील सर्व पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता एकत्रितपणे देण्यात येत आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला नाही अशा महिला पुढील महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त करू शकतात.

महत्त्वाचे मुद्दे:

  • महाराष्ट्रातील 1 कोटी 35 लाख महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मंजूर
  • 35 लाख महिलांचे आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक नाही
  • ज्या महिलांचे आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक नाही अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही
  • लवकरात लवकर आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक करण्याचे आवाहन

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचे “4500 रुपये” फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार

जर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड व बँक अकाउंट सोबत लिंक केलेले आहे की नाही ते चेक करणे खूपच महत्त्वाचे आहे कारण जे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसतील अशा बँक अकाउंट वरती लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हप्ता देण्यात येणार नाही

लवकरात लवकर आपले आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्याचे आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जर निर्धारित वेळेमध्ये आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक केले नाही तर लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे आपले आधार कार्ड, बँक अकाउंट सोबत लिंक आहे की नाही ते चेक करावे.

आता 17 ऑगस्ट 2024 रोजी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा ज्या महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाडकी बहीण योजना अर्ज दाखल करतील अशा महिलांना पुढील महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रितपणे 4500 रुपये देण्यात येतील.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे अशा कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात तसेच ऑफलाइन पद्धतीने पण अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्या अर्जाची पडताळणी होते आणि त्यानुसार आपल्या लाडकी बहीण योजना फॉर्म चे स्टेटस ठरवण्यात येते. म्हणजेच आपला अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट करण्यात येतो.

बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी आपले आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत लिंक असणे गरजेचे आहे जर तुम्हाला सध्या आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक करणे जमले नाही तर पुढील काही दिवसांमध्ये ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल.

स्वयंघोषणापत्रहमीपत्र
लाभार्थी यादीऑफिशियल वेबसाईट

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment