महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचा राज्य सरकारला 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूपच चांगला फायदा झाला.
परंतु योजनेची घोषणा केल्यापासूनच विरोधकांनी लाडकी बहीण योजना विषयी सरकारला धारेवर धरले होते आणि त्यातच राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या राशीमध्ये वाढ करून 2100 रुपये धनराशी प्रति महिना देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती विचारली असता त्यांनी 2100 रुपये कधी मिळतील याविषयीचे अपडेट दिले आहे.
लाडकी बहीण योजना विषयी अपडेट देत असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या विविध अपात्र निकषांबद्दल आणि भविष्यातील सुधारणा बद्दल माहिती दिली आहे ज्यामुळे योग्य पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल.
महत्त्वाचे मुद्दे:
- 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांची वाढ नाही
- 2100 रुपये कधी मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
- भविष्यात होणाऱ्या योजना बदलावांबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अपडेट
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana 2100rs Update
राज्य शासनाकडून 2024 च्या निवडणुकांमध्ये निवडून आल्यानंतर 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजना तसेच इतर घटकांमुळे राज्य शासन घटक पक्ष 2024 च्या निवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारे निवडून आले आहे.
परंतु विरोधक लाडकी बहीण योजना वरती टीका करत आहेत आणि राज्य शासनाकडून 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे परंतु आता या निर्णयाची शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे यात संदर्भात 2100 रुपये कधी मिळणार हा सवाल केला जात आहे त्याविषयी अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती मांडली.
Ajit Pawar mmlby 2100 rs
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2100 रुपये कधी मिळणार याविषयीची माहिती देताना सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभ मध्ये वाढ करण्यात येईल.
म्हणजेच महिलांना 2100 रुपये प्रति महिना प्राप्त करण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरतीच ही वाढ रक्कम महिलांना दिले जाईल असे स्पष्ट झाले आहे.
ladki bahin yojana double money
लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या राज्यांमध्ये सव्वा आठ लाख महिला आहेत आणि अशा महिलांना एकत्रितपणे वर्षाचे 30 हजार रुपये प्राप्त होत आहेत.
सदर महिलांना पुढील कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ कमी करून सहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ वर्षासाठी देण्यात येईल त्यामुळे त्यांची वार्षिक अनुदानाची रक्कम अधिकतम 18 हजार रुपये असेल.
ज्या महिला एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या लाभाची रक्कम ही वर्षाला 18000 रुपये पेक्षा जास्त असेल तर अशा महिलांसाठी नवीन नियम लागू करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनामार्फत चालवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये विधवा, निराधार घटस्फोटीत तसेच इतर 18 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांचा लाभ देण्यात येतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करावा लागेल सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यांमध्ये 02 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होत आहे आणि या अंतर्गत आतापर्यंत नऊ इन्स्टॉलमेंट मध्ये एकूण 13500 रुपयांचा निधी लाडक्या बहिणींना प्राप्त झालेला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या अर्जांची छाननी आणि पडताळणी सुरू आहे आणि त्या महिला अपात्र असतील अशा महिलांचे लाभ रद्द करण्याचे काम सुरू झालेले आहेत राज्य शासनाने याविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की च्या पात्र महिला आहेत अशा महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा असे या मागचे उद्दिष्ट आहे.