Ladki Bahin Yojana April Installment: मागील काही दिवसांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित आठ आणि नववा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ राज्यातील अडीच कोटी महिलांना प्राप्त झाला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील महिला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची वाट बघत आहे.
मार्च महिन्यामध्ये एकत्रित दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आता पुढील हप्ता एप्रिल महिन्यामध्ये पाठवला जाईल जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी महिला असाल तर ही माहिती तुमच्यासाठी कामाची ठरेल.
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या राशीमध्ये कोणतीही वाढ करणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत त्यामुळे आता पुढील एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधी मिळेल याविषयीची माहिती या लेखात जाणून घेऊया.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेच्या धनराशी मध्ये कोणतीही वाढ नाही
- महिलांना एप्रिल महिन्यांमध्ये मिळणार पंधराशे रुपयांचा हप्ता
- महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 2.52 कोटी पात्र लाभार्थी महिला
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana April Installment
दहा मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे 2025 26 चे आर्थिक बचत जाहीर करण्यात आलेले आहे आणि या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही बजेट वाढवण्यात आलेले नाही त्यामुळे चालू वर्षांमध्ये लाडकी बहीण योजनेला 36000 करोड रुपयांचे निर्धारित बजेट लागू असेल त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्यांमध्ये पंधराशे रुपये दिले जातील.
लाडके बहीण योजनेच्या लाभांमध्ये वाढ करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट माहिती दिली त्यामध्ये त्यांनी पुढील येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आपली आश्वासने पूर्ण करेल तसेच लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये वाढवून 2100 रुपये केले जातील असे सांगितले आहे.
लडकी बहीण योजनेचा पुढील दहावा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये दिला जाईल आणि या हप्त्यामध्ये राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकतील.
लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याचा हप्ता हा दहा तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवला जातो त्यामुळे पुढील एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता 10 एप्रिल 2025 पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्गीत केला जाऊ शकतो.
Ladki bahin yojana money not received
महाराष्ट्र राज्यामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत ज्या निकषांमध्ये बसत नाहीत म्हणजेच त्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करून लाभार्थी सूची मधून त्यांचे नाव कमी करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अशा जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त महिला आहेत त्यांना आतापर्यंत अपात्र मान्य करण्यात आले आहे आणि त्यांना पुढील लाभ मिळणार नाही तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे ज्या महिलांची ई केवायसी झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो.
Ladki bahin yojana 10th installment status
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता मिळणार आहे की नाही याविषयीचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तिथे अर्जदार लॉगिन पर्याय वरती क्लिक करून नवीन उघडणारे डॅशबोर्ड वरती आपले लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घेऊ शकाल.
जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे जाऊन या विषयाचा फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता.