सर्वसामान्य नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता यावा यासाठी शासनाच्या वतीने ऑफिशियल पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि या पोर्टल वरती महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
जर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तिथे रजिस्ट्रेशन करत असताना Authorised person नावाचा पर्याय येतो. संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे General नावाचा विकल्प येतो आणि त्यावर क्लिक केल्यावर Office Name नावाचा पर्याय येतो अशा परिस्थितीमध्ये काय करायचे याविषयीची माहिती आज जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे आणि या योजनेची अंमलबजावणी शासनाच्या वतीने पूर्ण लक्ष देऊन करण्यात येत आहे तरीपण राज्यातील बऱ्याच महिलांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहेत तसेच त्यांना अद्याप लाभ प्राप्त झालेला नाही.
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता प्रदान करण्यात आलेला आहे. ज्या महिला अपात्र झाले आहेत किंवा ज्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज भरत असताना Authorised person नावाचा पर्याय येतो
- Authorised person मध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे Office name / No नावाचा पर्याय विचारला जातो
- घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरत असताना विविध अडचणी
- शासनाकडून नवीन शासन निर्णय जाहीर ज्यामुळे ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत
अनुक्रमणिका ↕️
Authorized Person in Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ladakibahin.maharashtra.gov.in अर्जदार लॉगिन नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यावर Sign-up पर्याय अंतर्गत आपण नवीन अर्ज सादर करू शकतो.
नवीन अर्ज सादर करत असताना आता सामान्य महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे आणि फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज सादर करता येऊ शकतील.
यापूर्वी सामान्य महिला, सेतू सुविधा केंद्र, विविध गव्हर्नमेंट ऑफिस द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली होती परंतु आता नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकांनाच ऑनलाईन अर्ज भरता येतील.
तुम्ही जर घरबसल्या अर्ज सादर करणार असाल तर तुम्हाला Authorised person मध्ये येणारा General पर्याय निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमच्याकडे ऑफिसचे नाव मागितले जाईल.
Office name in ladki bahin yojana
जर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राचे नाव शासनाकडे नोंदणीकृत असल्याप्रमाणे माहीत असले पाहिजे.
जर तुम्हाला अंगणवाडी केंद्राचे नाव माहित नसेल तर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्राचा नंबर माहित असला पाहिजे. नवीन अर्ज सादर करताना अंगणवाडीचे नाव किंवा नंबर माहित असणे गरजेचे आहे.
Ladki bahin yojana form
जरी तुमच्याकडे अंगणवाडी केंद्राची माहिती असेल तरी पण तुम्ही घरी बसून अर्ज भरू नका कारण शासनाच्या अधिकृत शासन निर्णयामध्ये फक्त अंगणवाडी सेविकांनीच अर्ज भरावा असे स्पष्ट केलेले आहे.
जर तुम्ही घरबसल्या अर्ज भरला आणि लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही गैर व्यवहारांमध्ये तुमचे नाव समोर आले तर तुम्हाला विविध कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागू शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.
शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीच फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज सादर करण्याची परवानगी दिलेली आहे. यापूर्वी जेव्हा ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात होते तेव्हा विविध पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.
राज्यातील काही नागरिकांकडून लाडकी बहिण योजनेचे वेगवेगळे गैरप्रकार होत होते आणि या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज सादर करू शकतील अशी तरतूद 6 सप्टेंबर 2024 च्या जीआर मध्ये करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभ | वर्षाला १८ हजार रुपये |
पात्र लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिला |
लाभाचा प्रकार | डीबीटी पद्धतीने डायरेक्ट बँक ट्रान्सफर |
लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा