लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी लाभ प्राप्त केलेला आहे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता या महिलांना प्राप्त झालेला आहे.
आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते अर्ज अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आपले सेवा केंद्र आणि इतर माध्यमाद्वारे मंजूर केले जात होते आणि स्वीकारले जात होते परंतु मागे काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतील काही गैरव्यवहार उघडकीस आलेले आहेत.
म्हणजेच काही महिलांनी वारंवार फॉर्म भरून एकापेक्षा जास्त वेळा लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त केला आणि त्यानंतर सरकारने असे अनुचित प्रकार परत घडू नये यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी शासन निर्णय निर्गमित
- आता फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज स्वीकारण्याची परवानगी
- सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करावा असेच सरकारचे आवाहन
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजनेमध्ये बदल
लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत आणि जर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपण आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सेवा केंद्र, मदत कक्ष प्रमुख, समूह संघटन सीआरपी, सिटी मिशन मॅनेजर, ग्रामसेवक तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अर्ज सादर करू शकत होतो.
परंतु आता अर्जांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्यामुळे शासनाने नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकांनाच लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिलेली आहे.
म्हणजेच जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जाऊन याविषयीचा अर्ज भरावा लागेल. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली होती परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आला आणि सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सुरू राहतील असे नवीन शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले.
लाडकी बहीण योजना अर्ज स्वीकारण्याचा कोणाचा हक्क संपुष्टात
अनुक्रम | अर्ज हक्क संपुष्टात |
---|---|
1. | सेतू सेवा केंद्र |
2. | आशा सेविका |
3. | मदत कक्ष प्रमुख |
4. | ग्रामसेवक |
5. | आपले सरकार सेवा केंद्र |
6. | समूह संघटक |
7. | सिटी मिशन मॅनेजर |
8. | मदत कक्ष प्रमुख |
ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे अद्याप राहिलेले असेल किंवा त्यांनी अर्ज भरलेला नसेल तर ते अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपले अर्ज भरू शकतील आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतील
लाडकी बहीण योजना 2024
लाडकी बहीण योजनेची सुरुवात आणि अंमलबजावणी एक जुलै 2024 पासून करण्यात आली आणि त्यानंतर 14 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता 14 ऑगस्ट रोजी देण्यात आला आणि त्यानंतर त्या हप्त्याचे पुनर्वितरण 28 ऑगस्ट नंतर करण्यात आले. ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये संबंधित योजनेचा लाभ प्राप्त झालेला नसेल त्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण तीन महिन्यांचे 4500 प्राप्त करू शकतील.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या दैनंदिन वापराकरिता तसेच गरजांकरिता पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रति महिना पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला 18000 रुपये महिलांसाठी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र असतील त्यांना हा लाभ प्राप्त होईल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा