जर तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केले नसेल आणि तुम्ही ladki bahin yojana last date काय आहे याविषयी माहिती जाणून घेऊ इच्छिता तर या लेखांमध्ये त्याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना मध्ये अडीच कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्या तरीपण राज्यातील बऱ्याच महिलांनी विविध कारणामुळे आतापर्यंत अर्ज भरलेले नाहीत अशा महिलांना अर्ज भरण्याची संधी राज्य सरकारने दिलेली आहे.
लाडकी बहीण योजना राज्याची एक महत्वकांशी योजना आहे आणि यामध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना वर्षाला 18000 रुपये
- अडीच कोटींपेक्षा जास्त पात्र महिला
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज
- लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास मुदत वाढ
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
पात्र लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील महिला |
एकूण लाभ | वर्षाला 18 हजार रुपये |
अर्ज करण्याची पद्धती | ऑफलाइन |
अर्ज कुठे करायचा | अंगणवाडी सेविका |
ऑफिशियल वेबसाईट | click here |
Ladki Bahin Yojana Last Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन शासन निर्णयानुसार 15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची दिनांक ठरविण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांचे अर्ज करण्याची बाकी राहिलेले असतील अशा महिलांनी संबंधित तारखेच्या आत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे अर्ज दाखल करायचे आहेत कारण आता ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्र आणि इतर माध्यमांमधून अर्ज करण्याची सुविधा बंद झालेली आहे.
अंगणवाडी सेविकाकडे अर्ज दाखल करत असताना ऑफलाइन पद्धतीने अर्ज द्यावा लागेल आणि त्यासाठी तो अर्ज तुम्हाला डाऊनलोड करून, प्रिंट काढून, योग्य माहिती भरून द्यावे लागेल.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे मिळेल
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्ही पुढील अर्ज डाऊनलोड करून शकता आणि त्यानंतर त्यावरील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर तो अर्ज अंगणवाडी सेविकाकडे दाखल करू शकता.
ladki bahin yojana form
महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच महिलांचे फॉर्म भरण्याचे राहिलेले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नसल्यामुळे बऱ्याच महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा सर्व परिस्थितीत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारच्या वतीने ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
यापूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच वेळा मोठे बदल करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आधी फक्त पंधरा दिवस अर्ज सुरू असतील अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर मुदत वाढ करून शेवट सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करता येतील अशी तरतूद करण्यात आली होती.
राज्य शासनाकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये परत यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे आणि आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे यानंतर मुदतवाढ करण्यात येईल की नाही याविषयी सांगणे अवघड आहे कारण पुढे आचारसंहिता लागणार आहे आणि त्यापूर्वी आपण अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
राज्य शासनाने यापूर्वी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी वयोमर्यादा 60 वर्षांवरून 65 वर्षांपर्यंत नेली आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेत आधी पाच एकर पेक्षा कमी शेत जमीन असावी अशी अट होती ती पण आता काढण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा