लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

गोंदिया लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Ladki Bahin Yojana List Gondia Municipal Corporation PDF

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.5/5 - (11 votes)

गोंदिया जिल्ह्यामधील महिलांकडून लाडकी बहीण योजनेसाठी चांगला प्रतिसाद नोंदविण्यात आलेला आहे आणि आता लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी गोंदिया प्रकाशित करण्यात येत आहे.

जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोंदिया जिल्ह्याची लाभार्थी यादी बघितलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही यादी बघावी लागेल कारण आता 14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येत आहे आणि ज्या महिला यापासून वंचित राहिलेल्या आहे त्यांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल.

त्यामुळे जर आपला अर्ज चुकून रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला आपल्या अर्जामध्ये सुधारणा करून परत आवेदन पाठवावे लागेल आणि त्याद्वारे लाडकी बहीण योजना लाभ घ्यावा लागेल.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. गोंदिया जिल्ह्याची लाडकी बहीण लाभार्थी यादी प्रकाशित
  2. ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादी मध्ये असेल त्यांना लाभ प्राप्त होईल
  3. प्रत्येक भागानुसार पीडीएफ फाईल मध्ये नाव चेक करण्याची प्रोसेस
  4. गोंदिया जिल्ह्यातील ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांना ऑनलाईन अर्ज स्टेटस चेक करण्याची पद्धत

Ladki Bahin Yojana List Gondia Municipal Corporation

गोंदिया महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडकी बहीण योजनेची यादी बघणे खूपच सोपे आहे आणि या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो.

पुढील काही दिवसांमध्येच गोंदिया महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती ही यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि त्या यादीमध्ये आपण आपले नाव बघू शकाल. ही यादी पीडीएफ स्वरूपामध्ये असेल आणि त्यामुळे आपण आपल्या भागाची पीडीएफ डाऊनलोड करून त्यामध्ये नाव कसे शोधू शकाल याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया.

  1. सर्वप्रथम गोंदिया महानगरपालिकेच्या ऑफिसच्या वेबसाईट वरती जा
  2. त्यासाठी गुगलवरती Gondia Municipal Corporation टाकून सर्च करा
  3. ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि वेबसाईटच्या मुख्य पानावरती जा
  4. तिथे लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय निवडा
  5. लाडकी बहीण योजना यादी नावाच्या पर्यायावरती क्लिक करा
  6. नवीन पेज उघडेल त्यामध्ये प्रत्येक भागानुसार पीडीएफ फाईल देण्यात आली आहे
  7. आपल्या भागाची पीडीएफ फाईल चेक करा
  8. त्यात लाभार्थी महिलेचे नाव आहे की नाही बघा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिका मार्फतच यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु आपल्या गोंदिया महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती ही यादी अद्याप देण्यात आलेली नाही आणि पुढील काही दिवसांमध्ये ही यादी प्रकाशित करण्यात येऊ शकते त्यामुळे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्जाचे स्टेटसच जाणून घेऊ शकता.

Ladki Bahin Yojana Gondia Beneficiary List

गोंदिया जिल्ह्याची लाडकी बहीण योजनेची यादी बघण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती जावे लागेल तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि लॉगिन प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

लॉगिन प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड माहित असणे गरजेचे आहे जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही तिथेच तो पासवर्ड बदलू शकाल त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल.

लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्यापुढे तुमचा लाडकी बहीण योजना डॅशबोर्ड उघडेल आणि तिथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडा.

उघडलेला अर्जामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे माहीत होईल तसेच या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही याची माहिती मिळेल.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी राज्य शासनाच्या वतीने ऑनलाईन वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये नागरिक ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात तसेच त्यांना इतर महत्त्वाची माहिती प्राप्त होऊ शकते तर त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल वरती प्रभावीपणे होत आहे.

जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून या योजनेकडे सरकारचे खूपच चांगले लक्ष आहे आणि या योजनेचे खूपच प्रभावीपणे अंमलबजावणी केले जात आहे राज्य शासनाच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या योजनेकडे लक्ष ठेवून आहेत आणि या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ होईल याकडे लक्ष देत आहेत.

परंतु आता लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांना परत अर्जात सुधारणा करून या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. फॉर्म भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 नंतर सुरू असली तरी जर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा एकत्रितपणे 4500 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागतील.

नागपूरवर्धा
भंडारागडचिरोली
चंद्रपूरमहाराष्ट्रातील जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment