लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Yadi Gram Panchayat List (Gramin PDF)

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 2.4/5 - (10 votes)

महाराष्ट्रातील विविध ग्राम पंचायत मार्फत Ladki Bahin Yojana Yadi Gram Panchayat List प्रकाशित करण्यात येत आहे. सध्या लाडकी बहीण योजनेची राशी बँक खात्यामध्ये टाकली जात असल्यामुळे ही यादी बघणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 1 करोड 60 लाख पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु हा अर्ज भरल्यानंतर पुढील अर्जाचे प्रक्रिया काय आहे आणि त्यानंतर आपल्याला लाभ कसा मिळेल याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे.

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी राज्य शासनामार्फत यशस्वीपणे आणि प्रभावीपणे करण्यात येत असली तरी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतीमार्फत लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित
  2. गाव पातळीवरती लाडकी बहीण योजनेची ग्रामीण यादी लावण्यात येते
  3. ग्रामीण तसेच शहरी पातळीवरती लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित

Ladki Bahin Yojana Yadi Gram Panchayat List

महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायत मार्फत लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि या यादीमध्ये ज्या महिलांचे नाव आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळताना बघायला मिळते.

परंतु कधी कधी यादी मध्ये नाव असले तरी पण आपल्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत याला मुख्य कारण म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाही.

जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्ड बरोबर लिंक केलेले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि बँक खात्यावरती पैसे येणार नाही त्यामुळे बँक अकाउंट हे आधार संलग्न असणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागाबरोबरच राज्यातील शहरी भागामध्ये पण नगरपालिका आणि महानगरपालिका मार्फत लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात येत आहे. सदर महिला पीडीएफ फाईल डाऊनलोड करून ऑफलाइन पद्धतीने ही यादी चेक करू शकतील.

Ladki Bahin Yojana Yadi Grampanchayat PDF 2024

जर तुमच्या ग्रामपंचायतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी लावलेली असेल तर तुम्ही ती यादी चेक करू शकतात किंवा बऱ्याच ग्रामपंचायतीमार्फतच पीडीएफ स्वरूपामध्ये गावाच्या व्हाट्सअप ग्रुप वरती यादी पाठवण्यात येते जर तुमच्या ग्रुप वरती यादी आलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये नाव चेक करू शकाल.

परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामपंचायती अशा पण आहे ज्यांच्या वतीने अजून लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही तसेच जे पीडीएफ फाईल असते ती काही दिवसांपूर्वीची असू शकते आणि त्यामध्ये नवीन लाभार्थी नोंदणी केलेली नसेल अशा परिस्थितीत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले नाव चेक केले पाहिजे.

Ladki Bahin Yojana Gramin Yadi

जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर केला जातो तेव्हा तुमच्या मोबाईल नंबर वरती MMLBY च्या वतीने मेसेज पाठवण्यात येतो तसेच जर तुमचा रिजेक्ट करण्यात आला तरीपण तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेज पाठवण्यात येतो त्यामुळे आपला लाडकी बहीण योजना बरोबर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर चालू असणे गरजेचे आहे.

याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता आणि त्यानंतर आपला अर्ज भरल्यानंतर सदर वेबसाईटवरूनच लाडकी बहीण योजनेमध्ये आपले अर्ज मंजूर झालेले आहे की रीजेक्ट झालेले हे चेक करू शकता.

लाडकी बहीण योजना ग्रामीण माहिती

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2024 मध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या योजनेची अंमलबजावणी अत्यंत जलद गतीने करण्यात आली ज्यामध्ये जुलै महिन्यापासूनच अर्ज चालू करण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्यामुळे नागरिकांची तसेच सरकारची वेळ आणि पैशांची बचत होत आहे आणि यानंतर आता 14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी सरकारच्या वतीने युद्ध पातळीवरती फॉर्म तपासणी सुरू आहे आणि दररोज लाख अर्ज मंजूर तसेच रिजेक्ट करण्यात येत आहेत.

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईटवरून यासाठीचा अर्ज भरू शकतात तसेच जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जाऊन किंवा इतर अधिकृत सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरू शकता.

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नसाल तर तुम्हाला यासाठी अंगणवाडी सेविका कडे जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल ऑनलाइन पद्धतीमुळे वेगवेगळे स्कॅम होत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने काही निर्बंध लावलेले त्यामुळे आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकाल.

ऑफिशियल वेबसाईटलाभार्थी यादी
स्वयंघोषणापत्रहमीपत्र
जिल्ह्यानुसार यादीअर्जाचे स्टेटस

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment