जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आणि शासनाअंतर्गत केलेल्या प्रचार प्रसार यामुळे लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत दोन जुलैपासून सुरू झालेल्या या अर्ज प्रक्रियेमध्ये जालना शहर तसेच ग्रामीण भागामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
आता ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केल्या जात आहे आणि यासाठी 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रायोगिक तत्त्वावरती सर्वर चाचणी आणि इतर तांत्रिक प्रणालीसाठी महिलांच्या खात्यावरती एक रुपया पाठवण्यात आला.
14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात वर्गीत करण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी 35 लाख पेक्षा जास्त महिलांकडून लाडकी बहीण अर्ज भरण्यात आलेला आहे आणि कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
महत्वाचे मुद्दे:
- लोकप्रतिनिधी तसेच शासनाच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जालना प्रसारित
- ज्या महिलांचे नाव जालना जिल्ह्याच्या यादीमध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होणार
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जालना
लाडकी बहीण योजनेच्या जालना जिल्ह्यातील लाभार्थी यादी चेक करण्यासाठी आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीचा वापर करू शकतो ऑनलाइन पद्धतीचा फायदा एवढाच आहे की आपल्याला कुठे जावे लागणार नाही आणि घरबसल्या आपण आपले लाभार्थी यादी चेक करू शकतो आणि त्यामध्ये महिलेचे नाव आहे की नाही ते बघू शकतो.
कागदपत्रांची योग्य पूर्तता नसणे किंवा अर्ज भरताना चुका करणे आणि इतर कारणामुळे जालना जिल्ह्यातील काही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू शकतात कारण त्यांचे अर्ज रिजेक्ट केले जात आहेत त्यामुळे आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.
Jalna Municipal Corporation Ladki Bahin Yojana List
- जालना महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा यासाठी गुगल वरती तुम्हाला Jalna Municipal Corporation टाकून सर्च करायचे आहे
- महानगरपालिकेचे ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि तिथे लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा
- पर्याय वरती क्लिक करा आपल्याकडे एक नवीन पेज उघडेल
- नवीन पेज वरती विभागानुसार पीडीएफ नावाचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा
- विभागांनुसार पीडीएफ असलेले पेज उघडेल त्यामध्ये आपल्या विभागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
- पीडीएफ यादीमध्ये महिलेचे नाव आहे का ते चेक करा जर यादीत नाव असेल तर महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो
- जर फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर परत फॉर्म भरावा
महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका मार्फत लाडकी बहिण योजनेची पीडीएफ स्वरूपामधील लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे परंतु आपल्या जालना महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती ही यादी सध्या प्रकाशित करण्यात आलेली नाही पुढील काही दिवसांमध्ये ही यादी प्रकाशित करण्यात येईल तत्पूर्वी आपण ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेत नाव कसे चेक करायचे हे जाणून घेऊया.
Ladki Bahin Yojana Yadi Jalna
जर तुम्ही जालना जिल्ह्यामधील रहिवास असाल आणि लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेला असेल तर तुम्ही सरकारच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या पोर्टल वरती लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. फक्त ऑफिशियल वेबसाईट वरील एकाच वेबसाईटवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व कामे करता येऊ शकतील.
- लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – ladakibahin.maharashtra.gov.in
- अर्जदार लॉगिन पर्याय वरती क्लिक करून मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा
- पासवर्ड विसरलेले असाल तर पासवर्ड रिसेट करा त्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यात येतो
- लॉगिन प्रक्रिया पार पाडल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड उघडेल
- यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर ती क्लिक करा
- आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल
- वरच्या बाजूला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल
इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
जालना जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेले आहे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी बघायचे असेल तर तुम्ही पुढील लेख वाचू शकता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद नोंदविण्यात आलेला आहे आणि कोट्यावधी महिलांनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहे त्यामुळे आपण पात्रता यादी बघणे महत्त्वाचे असते.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा