लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Beneficiary List Kolhapur District (PDF) Municipal Corporation लाभार्थी यादी कोल्हापूर

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.2/5 - (54 votes)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पांमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात प्रभावीपणे करण्यात येत आहे.

त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या योजनेचा त्यांना लाभ घ्यायचा आहे परंतु संबंधित योजनेमधून राशी बँक खात्यामध्ये प्राप्त करण्यासाठी आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असणे गरजेचे आहे.

तसेच जर आपले नाव लाभार्थी यादीत नसेल तर आपल्याला अर्जामध्ये परत बदल करावा लागू शकतो किंवा पुन्हा परत अर्ज दाखल करावा लागू शकतो म्हणूनच जर तुम्हाला लाडके बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि लाभ मिळवू शकता.

महत्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजनेसाठी कोल्हापूर ग्रामीण तसेच शहरी भागातून लाखो महिलांचे अर्ज
  2. अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी Kolhapur Municipal Corporation च्या वतीने लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे
  3. ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे
  4. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी चेक करता येते

Ladki Bahin Yojana Kolhapur District

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
पात्र जिल्हेकोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्र
मुख्य लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र महिला
लाभबँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये
अर्ज कसा करायचाऑनलाइन तसेच ऑफलाइन
Offline अर्ज कसा करावाअंगणवाडी सेविका कडे
उपयुक्त ॲपनारीशक्ती दूत ॲप
वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येणार आहे सध्या तरी या योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली नसली तरी पुढील काही दिवसांमध्येच महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी बघायला मिळू शकते त्यामुळेच संबंधित वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपली पात्रता यादी कशी चेक करायची हे आता जाणून घेऊया.

  1. सर्वात प्रथम google वरती Kolhapur Municipal Corporation सर्च करून आपल्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती जा
  2. तुमच्यासमोर महानगरपालिकेची वेबसाईट उघडले असेल त्या वेबसाईटच्या मुख्य पानावरती जा
  3. तुम्हाला लाडकी बहिण योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  4. आता प्रत्येक वॉर्ड अनुसार लाडकी बहिण योजनेची प्रकाशित केलेली यादी तुमच्यासमोर असेल
  5. आपल्या वॉर्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या
  6. पीडीएफ फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव शोधा जर संबंधित महिलेचे नाव असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल

Ladki Bahin Yojana Beneficiary List Kolhapur District

जर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेची वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी सापडली नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये या योजनेची यादी चेक करू शकता अद्याप सर्वच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये यादी प्रकाशित करण्यात आलेली नसली तरी बरेच ग्रामपंचायत मार्फत या संदर्भात यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

कधी कधी आपल्या गावातल्या व्हाट्सअप ग्रुप वरती लाडकी बहिण योजनेची यादी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत प्रकाशित करण्यात येऊ शकते त्यामुळे तुम्ही अशा व्हाट्सअप ग्रुप चा उपयोग करून आपली लाडकी बहीण योजनेची यादी तपासू शकाल.

तसेच तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी म्हणजेच अंगणवाडी किंवा पोस्ट ऑफिस तसेच इतर सरकारी कार्यालयामध्ये जिथे आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे अशा ठिकाणी जाऊन पण आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात त्यामुळे आपण सदर विभाग मध्ये जाऊन आपल्या अर्जाची स्टेटस जाणून घ्या आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला परत त्यामध्ये बदल करून किंवा सबमिट करून अर्ज भरावा लागू शकतो.

Mazi ladki bahin yojana beneficiary list kolhapur district

जेव्हा तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जातो तेव्हा तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि त्यावर Approved लिहिलेले असते त्याचबरोबर तुमच्या अर्जाचा नंबर पण दिलेला असतो जेणेकरून तुम्ही तुमच्या अर्जाची परत ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करून बघू शकाल.

परंतु विविध कारणांमुळे मोबाईल वरती मेसेज येण्यामध्ये वेळ लागू शकतो किंवा मेसेज येणार नाही तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सावधानता बाळगून ऑनलाईन पद्धतीने आपले लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करावे लागेल.

लाडकी बहिण योजना ऑनलाइन लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्ही वेब पोर्टलचा उपयोग करू शकता तसेच तुम्ही नारीशक्ती ॲप चा वापर करू शकता सर्वप्रथम आपण नारीशक्ती ॲप च्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याची माहिती प्राप्त करूया

Ladki bahin yojana beneficiary list kolhapur – narishakti doot

गुगल प्ले स्टोअर उघडून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा आणि त्यानंतर सदर ॲप उघडा. तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय दिलेला आहे तिथे मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका तसेच कॅपच्या भरून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर मुख्य पानावरच तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तिथे तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

लाभार्थी यादीऑफलाइन अर्ज
ऑनलाइन अर्जहमीपत्र
स्वयंघोषणापत्रअर्जाचे स्टेटस

Ladki Bahin Yojana List Kolhapur – Official Website

जर नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता आली नाही तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटच्या मदतीने पण आपल्या अर्जाची परिस्थिती जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आपला मोबाईल नंबर, पासवर्ड तसेच कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे तुमच्यापुढे वेबसाईट चे मुख्य पान उघडलेले असेल तिथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे की बाद झाला आहे हे बघायचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच काही दिवसांमध्ये देण्यात येणार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचे लाभार्थी यादी मधील स्टेटस जाणून घेतले नाही आणि जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर परत फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

नाशिकपुणे
जळगावअमरावती
सांगलीमहाराष्ट्र जील्ह्यानुसार यादी

लाडकी बहीण योजना कोल्हापूर

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे ज्या योजनेची सुरुवात जून 2024 मध्ये झाली आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतात आणि जर काही महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये अडचण होत असेल तर अशा परिस्थितीत संबंधित महिला अंगणवाडी सेविका किंवा इतर शासनाने नेमून दिलेल्या कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतात.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment