लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin maharashtra.gov.in 2024: लॉगिन, रजिस्ट्रेशन, ऑनलाईन अर्ज आणि लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.5/5 - (2 votes)

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी ladki bahin maharashtra.gov.in वेबसाईट पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण योजना साठी ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in च्या मदतीने लॉगिन, रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तसेच केलेल्या अर्जांची स्थिती जाणून घेतली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट मुळे महिलांना कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये न जाता घरबसल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे आणि त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच योजनेमध्ये पारदर्शकता आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट पोर्टलचे अत्यंत आवश्यकता होती कारण या आधीचा नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज सादर करत असताना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. सर्वर नीट काम करत नव्हते आणि फॉर्म सबमिट करत असताना समस्या येत होत्या.

जर तुम्हाला ladki bahin.maharashtra.gov.in 2024 वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर त्याआधी तुम्हाला सदर योजनेच्या नियम आणि अटी पार पाडणे गरजेचे ठरते नाहीतर तुमचा अर्ज बाद केला जाईल.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल तर तो ऑफिशियल वेबसाईटवरून ladaki bahin maharashtra.gov.in करावा लागेल
  2. अर्ज केल्यानंतर आपण लाभार्थी यादी चेक करू शकतो
  3. आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल परंतु अर्ज रिजेक्ट झाला तर परत अर्जामध्ये बदल करून सबमिट करावे लागेल
  4. महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना एक कल्याणकारी योजना आहे जी महिला सक्षमीकरणा करीता कार्य करेल

लाडकी बहीण योजना 2024 @Ladki Bahin Maharashtra Gov In 2024

महाराष्ट्र राज्यातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि त्यांना काहीसा आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्फत लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना मदत होणार आहे.

ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना पंधराशे रुपयांची राशी डायरेक्ट डीबीटी पद्धतीने पाठवण्यात येईल ज्यामुळे महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळेल.

महाराष्ट्र राज्याच्या 2024 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करत असल्याची ऑफिशियल घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला आणि अर्ज मागविण्यात आले आता अर्ज प्रक्रिया सुरू होऊन एक महिना झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे.

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाची एक कल्याणकारी योजना असली तरी या योजनेला विरोधकांकडून वेळोवेळी टीका केली जात आहे आणि ही योजना एक निवडणूक जुमला असल्याचे म्हटले जात आहे परंतु लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांना याचा लाभ होईल यात काही शंका नाही.

लाडकी बहीण योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी चालू आहे आणि लवकरच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल ज्याचा लाभ महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना होणार आहे.

लाडकी बहिण योजना उद्दिष्ट (ladki bahin maharashtra.gov.in)

लाडकी बहीण योजना वेब पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in चे मुख्य उद्दिष्ट लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रणाली मध्ये सहजता आणून कोणीही लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करू शकते अशा प्रकारचे प्रणाली निर्माण करणे आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलमुळे लाभार्थी महिला आणि शासनाचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना दैनंदिन खर्च साठी इतर कोणाच्या मदतीची आवश्यकता असणार नाही.

ladki bahin yojana objective
ladki bahin yojana objective

ladki bahin.maharashtra.gov.in चे महत्वाचे मुद्दे

योजनेचा नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे राज्यमहाराष्ट्र
उद्दिष्टआर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य
मुख्य लाभप्रति महिना 1500/- रुपये
मुख्य लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र महिला
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन तसेच ऑफलाइन
पहिला हप्ता17 ऑगस्ट, 2024
उत्पन्न अटअडीच लाख रुपये पर्यंत
ऑफिशियल वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
ऑफिशियल ॲपनारीशक्ती दूत ॲप

Ladki Bahin Maharashtra Gov in 2024 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यांपैकी एक
  • परराज्यातील महिलांसाठी पतीचे पंधरा वर्षे पूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यांपैकी एक
  • अडीच लाखापर्यंत उत्पन्न आवश्यक
    • पिवळे तसेच केशरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक नाही
    • शुभ्र किंवा रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक
  • नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य
  • आधार कार्ड सोबत लिंक केलेले बँक पासबुक
  • हमीपत्र आणि फोटो

Ladki Bahin Yojana Maharashtra Government 2024 Login

लाडकी बहीण योजनेसाठी उपयुक्त असलेले नारीशक्ती ॲप वरती आता आपल्याला नवीन अर्ज सादर करता येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला वेबसाईट पोर्टल वरूनच लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडायची आहे.

वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या पुढे मुख्य पानावरती उजव्या बाजूला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे ज्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे संबंधित विकल्पावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पान उघडेल त्यावरती एक फॉर्म आहे

फॉर्म मध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकण्याची सुविधा आहे तिथे योग्य माहिती भरा आणि कॅपच्या आहे तसा बघून टाका आणि जर कॅपच्या दिसत नसेल तर Refresh बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर कॅपच्या टाकून लॉगिन करा.

लॉग इन केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची माहिती तुम्हाला दिसेल आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्ही त्यामध्ये आवश्यक बदल करून परत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता. याच बरोबर तुमच्या अर्जाची स्थिती आणि प्रोफाइल माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता.

ladki bahin.maharashtra.gov.in 2024 Registration

जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन वेब पोर्टलवरूनच अर्ज दाखल करावा लागेल त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ladki bahin.maharashtra.gov.in 2024 उघडावे लागेल आणि त्यानंतर अर्जदार लॉगिन विकल्पावरती क्लिक करावे लागेल.

तुमच्यापुढे एक नवीन पान उघडेल ज्यामध्ये तुम्हाला सर्वात खालच्या बाजूला Doesn’t have account Create Account ? नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे ज्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर परत एक नवीन फॉर्म उघडेल.

नवीन फॉर्म मध्ये तुम्हाला पुढील सर्व माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरावी लागेल:

  • आधार कार्ड नुसार पूर्ण नाव
  • मोबाईल नंबर
  • पासवर्ड
  • परत पासवर्ड
  • जिल्हा
  • तालुका
  • गाव
  • मुन्सिपल कॉपरेशन
  • नोंदणी करणारे व्यक्ती जसे की स्वतः, अंगणवाडी सेविका इत्यादी

वरील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर Accept Terms and condition पुढे टिकमार्क करा आणि कॅपच्या टाकून signup विकल्प वरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही तुमचे लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन करू शकता

ऑनलाइन अर्ज @ ladki bahin.maharashtra.gov.in Online Form

वरील स्टेप चा वापर करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे आणि अर्जदार नोंदणी नावाच्या विकल्पावरती क्लिक करायचे.

आता तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे तो दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य पद्धतीने टाका आणि कॅपच्या भरा. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पर्याय मिळेल वरती दिलेली सर्व डॉक्युमेंट हाताशी ठेवा आणि योग्य पद्धतीने स्कॅन करून संबंधित डॉक्युमेंट अपलोड करा.

काही कागदपत्रे अपलोड करताना दोन्ही बाजूंनी अपलोड करावे लागतील जसे की रेशन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी त्यामुळे तुमची कागदपत्रे अपलोड करत असताना काळजी घ्या. इतर सर्व महत्त्वाचे माहिती भरून ऑनलाईन अर्ज सादर करा.

हमीपत्रस्वयं घोषणापत्र
ऑफिशियल वेबसाईटलाभार्थी यादी

ladaki bahin maharashtra gov in list

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता या योजनेची लाभार्थी लिस्ट प्रसारित करण्यात येत आहे यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकता आणि जर तुम्हाला लाभार्थी लिस्ट मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण यासाठीचे आपले स्टेटस चेक करून घेऊ शकता.

तसेच जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येतो परंतु सर्व मधील प्रॉब्लेम मुळे किंवा इतर काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एसएमएस येण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे आपण नारीशक्ती दूत तसेच ऑनलाईन वेब पोर्टलवरून लाडकी बहिण योजनेचे स्टेटस जाणून घेऊ शकतो.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment