महाराष्ट्र राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक खूपच प्रसिद्ध योजना बनलेली आहे आणि या योजनेने महायुती सरकारला दोनशे जागांपेक्षा जास्त जागा मिळवण्यास मदत केलेली आहे.
महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेमध्ये धनराशी मध्ये वाढ करून पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि या घोषणेचा महायुती सरकारला चांगलाच फायदा झाला आणि त्यांना या 2024 च्या इलेक्शन मध्ये मदत झाली.
बहुमत प्राप्त झाल्यानंतर नव्याने मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याच वेळेस पत्रकारांनी विचारलेल्या लाडकी बहीण योजना संदर्भातील माहिती त्यांनी सांगितली.
महत्त्वाचे मुद्दे
- लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपये देण्याची राज्य शासनाची घोषणा
- महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नांची उत्तरे दिली
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळतील याची माहिती सांगितली
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार; Ladki bahin yojana 2100 rupees
लाडकी बहीण योजना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत आणि त्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजना ही भविष्यात बंद केली जाणार नाही तर त्यामध्ये वाढ केली जाईल परंतु 2100 रुपये देत असताना बजेटच्या वेळेस याविषयीची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेत ही वाढ केली जाईल.
लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ करत असताना सर्व आर्थिक स्त्रोतांची माहिती तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील त्यामुळे 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे आणि जे आश्वासने दिली केली आहेत त्यांची पूर्तता केली जाईल.
लाडकी बहीण योजना अर्जांची छाननी आणि निवड
लाडकी बहीण योजना संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेमध्ये अनेक निकषा बाहेरील महिलांना लाभ प्राप्त झालेला आहे आणि अशा अर्जांची छाननी केली जाईल.
ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी योजना आणली तेव्हा सुरुवातीला निकषाबाहेरील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नंतर त्यांनी स्वतःच या योजनेची गरज नसल्याचे स्पष्ट केले आणि अंतिम छाननी करून योजना स्थिर करण्यात आली त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना स्थिर करण्यात येईल.
Ladki Bahin Yojana Scheme
महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्य शासनाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली होती आणि आत्ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना पुढे पण सुरू राहील असे सांगण्यात आलेले आहे.
सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेविषयी माहिती सांगताना सांगितले की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी स्वतःला सीएम म्हणजेच कॉमन मॅन समजत होतो आणि आता उपमुख्यमंत्री असताना डी.सीएम म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन समजत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की यासंदर्भात त्यांची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि अधिकाऱ्यांना योजनेबाबत योग्य सूचना करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर लाडके बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल.
लाडकी बहीण योजना पोर्टल
महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच महिलांनी अंगणवाडी सेवकांमार्फत अर्ज सादर केलेले आहेत परंतु यातील काही महिलांना लाभ प्राप्त झालेला नाही तसेच काही महिलांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येत नाही कारण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर तसेच इतर महत्त्वाची माहिती नसते.
आता राज्यातील महिलांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक नवीन पोर्टल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकाल.
हे पोर्टल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे आणि सामान्य नागरिकांसाठी सध्या हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही परंतु पुढील काही कालावधीनंतर राज्यातील नागरिक या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकतील.
हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा