मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आले आणि त्यानंतर अल्पावधीतच ही योजना प्रचंड प्रचलित झाली आणि राज्यातील कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
लाडकी बहीण योजना अंतर्गत पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येतात म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये देण्यात येतात. निवडणुकीच्या आधी ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आलेले होते.
निवडणूक प्रचार दरम्यान महायुती सरकारकडून 2100 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली होती म्हणजेच प्रति महिना 600 रुपयांची वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते.
महत्त्वाचे मुद्दे:
- महायुती सरकारकडून प्रति महिना २१०० रुपये लाडकी बहीण योजनेत देण्याची निवडणूक दरम्यान घोषणा
- आता डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात येत आहे
- डिसेंबर महिन्यामध्ये पात्र महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले आहेत
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार
निवडणुकीनंतर लगेचच 2100 रुपयांचा हप्ता सुरू होणार की नाही याविषयी विविध तर्क वितर्क लावण्यात आलेले होते परंतु आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे या हप्त्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये देण्यात आलेले आहे.
जुलै 2024 पासून आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये नऊ हजार रुपये राज्य शासनाचे वतीने देण्यात आलेले आहेत परंतु महायुती सरकारकडून 2100 रुपये प्रति महिना लाडकी बहीण योजनेत देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली होती आता ही वाढ कधी होणार आहे असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना राशी मध्ये वाढ करण्याची तरतूद केली जाऊ शकते म्हणजेच पुढील काही महिने महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे पैसे येतील आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय झाल्यानंतर 2100 रुपये प्रति महिना देण्यात येऊ शकतो.
लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म
लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची दिनांक देण्यात आलेली होती आणि त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली होती आणि अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जवळपास तीन कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर केलेला होता आणि त्यामधील दोन कोटी 34 लाख महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे.
जर तुम्हाला नवीन अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे कारण नवीन शासन निर्णय प्रारित केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
तसेच आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे फक्त ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे अर्ज सादर करता येऊ शकतो त्यामुळे जर महिलांनी अंगणवाडी सेविकाकडे अर्ज सादर केला तर त्यांना अर्जाचे स्टेटस माहित व्हावे आणि इतर माहिती मिळावी यासाठी शासन नवीन पोर्टलची निर्मिती करत आहे.
testmmmlby.mahaitgov.in या वेबसाईट वरती सध्या शासनाच्या वतीने नवीन पोर्टलच्या निर्मितीचे काम चालू आहे आणि काही दिवसानंतर हे पोर्टल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येऊ शकते.
सदर पोर्टलमध्ये तुम्ही तुमचा अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबर वापरून तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकाल आणि जर तुमचा अर्ज ना मंजूर करण्यात आलेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी परत अर्ज सादर करावे लागेल.
डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही
जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला अजून काही दिवस वाट बघावी कारण आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महिलांच्या बँक खात्यावर पैसे येत आहेत.
जर तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंकिंग च काही प्रॉब्लेम होता आणि तो आता तुम्ही सोडवलेला असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा