Ladki Bahin Yojana 2nd Installment म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी भेटणार आहे याविषयी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतील आणि त्यामुळेच आजच्या या लेखांमध्ये आपण याविषयीची अधिक माहिती प्राप्त करून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र राज्यातील 80 लाख पेक्षा जास्त महिलांना प्राप्त झालेला आहे हा हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रितपणे तीन हजार रुपये लाभ या स्वरूपात देण्यात आलेला होता.
आता जो लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता (majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment) सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणार आहे तो 4500 रुपयांचा असेल म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा एकत्रित लाभ त्यामध्ये देण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये 3000 रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये प्राप्त होतील.
महत्त्वाचे मुद्दे:
- ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 मिळण्याची शक्यता
- ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळाला अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 3000 रुपये मिळतील
- अर्ज मंजूर झालेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लाखो महिला Ladki Bahin Yojana 2nd Installment चा लाभ घेऊ शकतील
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana 2nd Installment Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभार्थी | 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | जून 2024 |
First Installment Date | 14 ऑगस्ट, 2024 |
Second Installment Date | सप्टेंबर 2024 |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana 2nd Installment: ladakibahin.maharashtra.gov.in
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यापैकी 80 लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे किंवा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु अद्याप बऱ्याच महिलांचा या योजनेचा अर्ज मंजूर झालेल्या नाही.
लाडके बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 पासून देण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये तीन हजार रुपये देण्यात आले परंतु तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणाऱ्या लाभाची कल्पना नागरिकांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे आपला अर्ज आता मंजूर झालेला असून लाभ मिळालेला नाही तर काय करायचे असा प्रश्न महिलांच्या मनात आला होता.
त्याच अनुषंगाने सरकारने पुढील दुसरा हप्ता 4500 रुपयांचा असेल म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे महिलांच्या बँक खात्यावरती पाठवण्यात येतील आणि तसेच ज्या महिलांना याआधी तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात होईल.
Ladki Bahin Yojana 2nd Installment तुम्हाला 14 सप्टेंबर 2024 पासून पुढे मिळण्यास सुरुवात होईल आणि त्यासाठी लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे. या लाभार्थी यादीमध्ये महिलांचे नाव असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो.
Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता 14 सप्टेंबर 2024 पासून पुढे मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी दीड कोटी पेक्षा जास्त महिला पात्र असण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील 80 लाख पेक्षा जास्त महिलांना प्राप्त झालेला आहे.
तसेच आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि 45 लाख अर्जांवरती प्रक्रिया सुरू आहेत तर उर्वरित अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि ते अर्ज परत सबमिट करून त्यावर प्रक्रिया आणि पडताळणी करून मंजुरीचे कार्य सुरू आहे.
जर आपले नाव लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला आपला आधार क्रमांक हा बँक खात्याबरोबर लिंक आहे की नाही ते चेक करणे आवश्यक आहे आणि जर तो लिंक नसेल तर तो लिंक करावा लागेल.
हे पण वाचा: घरबसल्या आधार कार्ड बँक अकाउंट लिंक कसे करायचे
Ladki Bahin Yojana 2nd Installment List
जर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी दुसरी चेक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन माध्यमांचा उपयोग करू शकता आणि त्या माध्यमातून आपली लाडकी बहीण योजना यादी चेक करू शकाल.
लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या महानगरपालिका तसेच ग्रामपंचायतीमार्फत लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण आपल्या विभागाच्या ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते चेक करू शकतो परंतु बऱ्याच महानगरपालिका आणि ग्रामपंचायत मार्फत ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही तेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने यादी चेक करू शकाल.
Ladki Bahin Yojana 2nd Installment List मध्ये आपले नाव असल्यानंतर आपल्याला लाडकी बहिण योजनेचा दुसरा हप्ता प्राप्त होऊ शकतो आणि जर आपला अर्ज बाद झालेला असेल तर आपले नाव लाभार्थी यादीत नसेल आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी परत अर्ज दाखल करावा लागेल.
हे पण वाचा: लाडकी बहीण योजना जिल्ह्यानुसार यादी
काही महत्त्वाचे प्रश्न, FAQ
लाडकी बहीण योजना दुसरा हप्ता किती तारखेला मिळेल?
लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता 14 सप्टेंबर 2024 नंतर मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी कुठे बघायची?
लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने बघू शकतो
अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर दुसरा हप्ता मिळेल काय?
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज पहिल्यांदा बाद झालेला असेल आणि तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला नसेल परंतु आता अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुमचे बँकेचे तपशील व्यवस्थित असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता मिळू शकतो.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
Upload from dakhvat ahe tr paise milnar ahe ki nahi