मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 पासून नोव्हेंबर 2024 पर्यंतचे प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे पाच हप्ते देण्यात आलेले आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना 7500 देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे देण्यात आलेला होता त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे आणि या महिलांना Ladki Bahin Yojana 6th Installment Date कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा आहे आणि लवकरच महिलांची प्रतीक्षा संपणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर योग्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देण्यात येईल
- डिसेंबर 2024 अखेरीस हा हप्ता देण्यात येऊ शकतो
- महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी महिलांना हा हप्ता देण्यात येईल
- लाडकी बहीण योजना नियमित सुरू राहील असे सरकारचे आश्वासन
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana 6th Installment Date
महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशा महिलांना आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
लवकरच मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम पार पडेल आणि मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर 2024 मध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीला दिला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | जून 2024 अर्थसंकल्प |
योजनेचा पहिला हप्ता | जुलै 2024 |
लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख | डिसेंबर 2024 |
मुख्या लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन अंगणवाडी सेविकाकडे |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
होमपेज | लाडकी बहीण योजना |
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार
लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्ता बाबत सरकारच्या वतीने कोणतेही अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले नाही परंतु मंत्रिमंडळ विस्तार तसेच मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम पार पाडल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यात येईल.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतील की 2100 रुपये याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही जाणकारांच्या मते 2100 रुपये 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून नंतर वितरित केले जातील तर काही व्यक्तींच्या मते अर्थसंकल्प पूर्वीच लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
लाडकी बहीण योजना प्रमुख पात्रता
लाडकी बहीण योजनेचे काही मुख्य पात्रता निकष आहेत जसे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावा, आमदार, खासदार तसेच केंद्राच्या किंवा राज्याच्या महत्त्वाच्या बोर्ड किंवा व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील व्यक्ती उच्चपदस्थ नसावा.
ज्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते तसेच फक्त कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महायुतीच्या सरकारला 2024 च्या इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा झाला आहे परंतु या योजनेमध्ये बऱ्याच निकषात न बसणाऱ्या महिलांना लाभ मिळालेला आहे. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून पुढील काही काळानंतर दूर केले जाऊ शकते.
हे पण वाचा
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा