मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांना तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांसाठी प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु हे सर्व करत असताना एक जुलै 2024 पासून सुरू झालेल्या अर्ज अद्याप काही महिलांचे मंजूर झालेले नाही.
तसेच शासनामार्फत आधार कार्ड बरोबर बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आधार कार्ड बँक अकाउंट बरोबर लिंक आहे की नाही ते चेक करणे महत्त्वाचे ठरते आणि जर आपले आधार कार्ड बँक अकाउंट वर लिंक नसेल तर आपल्याला लवकरात लवकर ते लिंक करावे लागेल.
14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 3000 रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे तसेच ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाही अशा महिलांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे
- सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटी पद्धतीने पैसे पाठवण्यात येणार
- लाडकी बहीण योजनेसाठी लवकरात लवकर आवेदन करणे गरजेचे
- लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana Aadhar Link, DBT Status (ladakibahin.maharashtra.gov.in)
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड बरोबरच आपले डीबीटी अकाउंट सक्रिय असणे गरजेचे आहे परंतु हे सर्व का महत्त्वाचे आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी डीबीटी पद्धतीचा वापर करण्यात येणार याची अयशस्वी पातळी कमी आहे
- आधार कार्ड सोबत लिंक असणाऱ्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे टाकले जाऊ शकतात
- लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला गरजा पूर्ण करू शकतील
Ladki Bahin Yojana Aadhar Card Link Status
जर तुम्ही आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक केलेले आहे की नाही तुम्हाला आठवत नसेल किंवा तुमच्या आधारला कोणते बँक अकाउंट जोडलेले आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.
- आधार च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा uidai.gov.in
- My aadhar पर्यायावरती क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅपच्या भरा त्यानंतर OTP Send करा ज्याद्वारे तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल
- आपला ओटीपी टाकून लॉगिन करा
- तुमचे आधार कार्ड चे डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडलेले असेल त्यामध्ये Bank Seeding Status पर्याय असेल
- Bank Seeding Status पर्यायावर क्लिक करा
- तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंट बरोबर लिंक आहे हे तुम्हाला उघडलेल्या नवीन पेज वरती तुम्हाला पुढील माहिती दिसेल.
- आधार लिंक असेल तर पुढील मेसेज दिसेल Congratulations! Your Aadhaar-Bank Mapping has been done
- त्याखाली आधार नंबर, बँक नाव दिसेल
- Bank Seeding Status – Active दिसत असेल तर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेले आहे.
जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक करावे लागेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल.
लाडकी बहीण योजना आधार कार्ड ला बँक अकाऊंट जोडा ऑनलाईन (aadhar card bank link online process)
- गूगल वर NPCI टाकून सर्च करा आणि अधिकृत वेबसाईट उघडा
- NPCI मध्ये Consumer नावाच्या पर्यायावर क्लिक करा
- नवीन पान उघडेल ज्यात Bharat Aadhar Seeding Enabler नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक करा
- नवीन वेबपेज उघडेल त्यात आपला आधार नंबर टाका आणि Request for Aadhaar मध्ये seeding पर्याय निवडा
- Select your bank मध्ये आपले बँक अकाउंट निवडा
- Seeding Type मध्ये Fresh Seeding पर्याय निवडा
- आपला अकाउंट नंबर टाका आणि तो परत कन्फर्म करा
- टर्म आणि कंडिशन पुढील चेक बॉक्स वरती क्लिक करा आणि आपला कॅपच्या भरा
- Proceed नावावरती क्लिक करा
वरील पद्धतीचा वापर करून आपण घरबसल्या आपले आधार कार्ड बँक अकाउंट बरोबर लिंक करू शकतो परंतु ही प्रोसेस मोजक्याच बँकेमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटक विकास ग्रामीण बँक या बँकांचा समावेश आहे परंतु जर तुमचे बँक अकाउंट इतर बँकांमध्ये असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊनच आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करावे लागेल कारण ज्या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे अशाच खात्यामध्ये पैसे वर्गीत करण्यात येत आहेत.
लाडकी बहीण योजना संक्षिप्त माहिती, ladakibahin.maharashtra.gov.in
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र |
लाभ | प्रति महिना 1500 रुपये |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन, ऑफलाईन |
योजनेचे उद्देश्य | महाराष्ट्र मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत |
उत्पन्नाची अट | अडीच लाख रुपये |
अर्ज करण्याची मुदत | 31 ऑगस्ट 2024 ते पुढे |
पहिला हप्ता | 14 ऑगस्ट 2024 |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र राज्याचा 2024 मधील अर्थसंकल्प सादर करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करत असल्याची घोषणा दिली आणि जून 2024 मधील या अर्थसंकल्पांमध्ये घोषणा केलेल्या या योजनेचे शासन निर्णय जलद गतीने काढण्यात आले आणि 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली.
9 ऑगस्ट 2024 मध्ये डीबीटी पद्धतीने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती एक रुपया पाठवण्यात आला आणि त्या माध्यमातून सर्वर व्यवस्थित काम करत आहे की नाही किंवा टेक्निकल प्रॉब्लेम चेक करण्यात आले.
14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजना प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आणि जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता देण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील एक कोटी महिला 17 ऑगस्ट 2024 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता प्राप्त करतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे.
ज्या महिलांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत अशा महिलांनी लवकरात लवकर परत फॉर्म सबमिट करावेत आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा जर आपला फॉर्म सप्टेंबर महिन्याच्या लाभार्थी यादीमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण 4500 प्राप्त होतील.
ऑनलाइन फॉर्म परत भरण्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट ची मदत घेऊ शकाल तसेच जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज परत सबमिट करायचा असेल तर तुम्ही ज्या अधिकाऱ्याकडे आधी अर्ज भरलेला आहे त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन परत अर्ज सादर करू शकाल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा