Ladki bahin yojana app: महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच याचा ऑफिशियल जीआर काढण्यात आलेला आहे या आधीच्या जीआर मध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आणि त्या सर्व बाबी लक्षात घेऊन नवीन अपडेट जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये जमिनीची अट, उत्पन्न इत्यादी बाबी नमूद करण्यात आलेले आहेत. हे पण वाचा: लाडकी बहिण योजनेत हे 7 मोठे बदल, अधिक महिलांना मिळणार योजनेचा लाभ
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता अर्जाचा नमुना जाहीर करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर आता ऑनलाइन पद्धतीने पण ॲपच्या मदतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता सरकारच्या माध्यमातून नवीन ॲप जाहीर करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे ज्याच्या माध्यमातून कोट्यावधी महाराष्ट्रीयन महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे या योजनेची वयाची अट पण आता वाढवण्यात आलेली आहे आणि आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील तसेच अर्जाच्या मुदतीमध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल आणि तुमच्याकडे अर्जाचा नमुना नसेल तर तुम्ही आमचा फॉर्म पीडीएफ डाउनलोड करू शकता त्यासाठी हे वाचू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज, Ladki Bahin Yojana Form PDF
Ladki Bahin Yojana App, लाडकी बहिणी योजना मोबाईल ॲप
ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत तसेच अंगणवाडी मध्ये महिलांचे मोठी गर्दी होत होती आणि महिलांना अस सुविधा निर्माण होत होती त्याचबरोबर विविध डॉक्युमेंट काढण्यासाठी आणि फॉर्म जमा करण्यासाठी खूपच टाईम लागत होता अशा सर्व परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन ॲप च्या माध्यमातून घर बसल्या अर्ज भरण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे.
- सर्वात प्रथम प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये Narishakti Doot नावाने अँप सर्च करा
- ॲप डाऊनलोड झाल्यानंतर महिलेचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा
- Accept Term and Condition नावाचा विकल्प येईल त्यावरती क्लिक करा आणि स्वीकारा हा पर्याय निवडा
- तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला असेल तर त्याच मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यात टाका आणि ओटीपी व्हेरिफाय करा
- तुमच्यापुढे प्रोफाइल अपडेट करा नावाचा संदेश येईल त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण नाव, जिल्हा, तालुका यासह तुमचे प्रोफाईल अपडेट करा
- तुमच्या पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय येईल त्यावरती क्लिक करा
- आधार कार्ड नुसार महिलेचे पूर्ण नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्मगाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक सह निर्धारित दिलेली सर्व माहिती आणि बँकेची माहिती भरा
- संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड यावरती स्वतः व्हेरिफाय करून म्हणजेच स्वतःची सही करून अपलोड करा त्याचबरोबर बँक पासबुक फोटो आणि अर्जदाराचा स्वतःचा फोटो अपलोड करा
- तुम्ही भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि अर्ज दाखल करा
अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाचे सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लॉगिन करून केलेले अर्ज हा विकल्प निवडावा आणि त्यानंतर ओटीपी टाकून तुमच्या अर्जाची सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊ शकता.
लाडकी बहिण योजना पात्रता
सदर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावी किंवा परराज्यातील महिला असेल तर तिचा पती महाराष्ट्र राज्यातील मूळनिवासी असावा. अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलेला याचा लाभ मिळेल परंतु जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. कुटुंबातील कोणाच्याही नावावरती ट्रॅक्टर असेल किंवा कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल तर अशा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधून 1500 रुपये मिळवण्यासाठी पात्रता निकष
तुम्ही अद्याप या योजनेचा अर्ज भरला आहे की नाही हे कमेंट करून कळवा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
maja approved jhla ahe yojanasati appvar dist nahi list madhe nav kasa check karcha
माझा फऻम नाही भरला जात आहे इरे म्हणून लीहुन येतं आहे
Maza form me bharla aahe aani to approve zala aahe pan mala paise aale nahit.
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरलेला असेल आणि मंजूर झालेला असेल तसेच बँक खात्याची माहिती योग्य असेल आणि आधार कार्ड बँक लिंक झालेले असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो
maza form 7 july 2024 la approve zala ahe pan mala ajun paise ale nahi