Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर याचा लगेच शासन निर्णय काढून जुलै 2024 पासून अर्ज सादर करण्यात आलेले आहेत परंतु या योजनेमध्ये महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आतापर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यापैकी साधारणता एक कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे.
काही लाभार्थी महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु काही कारणास्तव त्यांना बँकेमध्ये पैसे मिळालेले नाही तर काही महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत. सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांच्या अर्ज मंजूर होतील त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रुपये प्राप्त होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
परंतु ज्या महिलांना तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांचे पैसे बँक वेगवेगळ्या कारणास्तव कापून घेत आहे जसे की कमीत कमी बॅलन्स न ठेवणे, सर्विस चार्जेस तसेच इतर चार्जेस या नावाखाली बँकांमधून पैशांची कपाती केली जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
- एक कोटी महिलांना आतापर्यंत प्रत्यक्ष लाभ
- बँकांकडून वेगवेगळ्या कारणास्तव महिलांचे पैसे कापण्यास सुरुवात
- सरकारकडून बँकांना निर्देश देण्यात आलेत
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana: बँकांना दिले सरकारने मोठे आदेश
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये 14 ऑगस्ट 2024 पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्याचा सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली आहे परंतु बँकांकडून आधार कार्ड लिंक असणाऱ्या अकाउंट वरती वेगवेगळ्या कारणास्तव पेनल्टी चार्जेस लावण्यास सुरुवात झालेली आहे जसे की कमीत कमी बॅलन्स मेंटेन न ठेवणे, दंडात्मक कारवाई इत्यादी.
त्यामुळे बऱ्याच महिलांनी सरकारकडे आम्हाला बँक पैसे देत नसल्याची तक्रार केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालय अंतर्गत बँकांसाठी नवीन निर्देश जाहीर करण्यात आलेले आहेत.
काय आहे बँकांसाठी निर्देश
महिला आणि बालविकास मंत्रालय मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटर वरती माहिती देताना सांगितले की कोणत्याही कारणास्तव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये.
ज्या महिलांचे कर्ज स्थगित आहे अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त झालेले पैसे कर्जासाठी कपात करण्यात येऊ नये तसेच कोणत्याही महिलेचे बँक खाते गोठवण्यात येऊ नये.
जर एखाद्या महिलेचे बँक खाते बँकेकडून कोणत्याही कारणास्तव गोठवण्यात आलेले असेल तर ते पूर्ववृत्त करावे जेणेकरून महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
महत्त्वाची माहिती | उपयुक्त लेख |
---|---|
ऑफिशियल वेबसाईट | लाभार्थी यादी |
हमीपत्र | स्वयंघोषणापत्र |
कागदपत्रे | लाडकी बहीण योजना अपडेट |
आता काही महिलांचे अर्ज सरकारकडून रिजेक्ट करण्यात येत आहेत आणि त्यासाठी सरकारकडून मोबाईल वरती MMLBY has been provisionally rejected असा मेसेज पाठवण्यात येत आहे आणि जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल तर काय करायचे जाणून घ्या
हे पण वाचा: MMLBY has been provisionally rejected
लाडकी बहीण योजना माहिती
लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मधील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि या योजनेकडे सरकारने विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर त्याचा शासन निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर जुलै 2024 पासून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली.
14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तसेच उर्वरित महिलांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ देण्यात येईल.
लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे निरंतर स्वरूपामध्ये सुरू राहील आणि यामध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये राशी प्रदान केली जाईल महिला सक्षमीकरणासाठी ही रक्कम देण्यात येत आहे असे सरकारने नमूद केलेले आहे आणि त्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत नवनवीन अपडेट जाहीर केले जात आहेत.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
ll