लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहीण योजना मध्ये जॉईंट बँक अकाउंट चालेल का? सर्व बँक अकाउंट संबंधित प्रश्नांची उत्तरे

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.4/5 - (30 votes)

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच वर्षाला 18000 रुपये देण्यात येतात.

2024 च्या इलेक्शन मध्ये महायुतीकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. म्हणजेच पंधराशे रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत धनराशी नेण्यात येईल अशी घोषणा महायुती मार्फत करण्यात आली

परंतु हे सर्व होत असताना महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना बँक अकाउंट संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे काही महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. बँक अकाउंट संबंधित विविध समस्यांमुळे राज्यातील लाडक्या बहिणी लाभापासून वंचित
  2. जॉईंट अकाउंट चालेल की नाही, कोणत्या अकाउंट वरती पैसे येतील असे अनेक प्रश्न
  3. बँकेचे विविध नियम तसेच अकाउंट संदर्भातील प्रश्नांमुळे अडचणी

लाडकी बहीण योजना मध्ये जॉईंट बँक अकाउंट चालेल का? Ladki Bahin Yojana madhe joint account chalte ka

लाडकी बहीण योजना मध्ये भाग घेण्यासाठी महिलांनी स्वतंत्र अकाउंट उघडावे असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. परंतु ज्या महिलांचे जॉइंट अकाउंट आहे आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर त्यांचे नाव असेल तर अशा अकाउंटमध्ये महिलांना पैसे मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील महिला आत्मनिर्भर बनाव्यात आणि त्यांना स्वतःच्या काही गरजांसाठी पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी लाडके बहीण योजना सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच महिला स्वतः या पैशांचा उपयोग करू शकतील यासाठी स्वतंत्र अकाउंट उघडावे अशी अट करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे आणि बऱ्याच महिलांना असेल दर्शनास आलेले आहे की त्यांनी जो बँक अकाउंट नंबर फॉर्म भरताना दिला होता त्यावर पैसे न येता दुसऱ्या बँक अकाउंट वर पैसे पाठवण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या बँकेत अकाऊंट उघडावे?

जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही नॅशनलाईज बँकेमध्ये बँक अकाउंट उघडून शकता आणि त्यावरती लाभ प्राप्त करून घेऊ शकता. विविध सहकारी बँकांच्या बँक अकाउंट वर देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत.

राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ देत असताना शासकीय बँक किंवा खाजगी बँक असा कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही म्हणजेच तुमचे बँक अकाउंट कोणत्याही चांगल्या बँकेत असेल तर तुमच्या बँक अकाउंट वरती पैसे पाठवण्यात येऊ शकतात.

याचबरोबर ज्या महिलांनी पोस्ट बँक मध्ये अकाउंट उघडलेले आहे अशा महिलांना पण या योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे. बँक खात्यावर पैसे येण्यासाठी आपले आधार कार्ड बँक बरोबर लिंक असणे गरजेचे आहे आणि आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तरच पैसे पाठवण्यात येतात.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तरी पण बँकेत पैसे का आले नाहीत

जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर एकदा बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड हे बँक अकाउंट बरोबर लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या याचबरोबर जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट असतील तर उर्वरित अकाउंट पण चेक करा.

बऱ्याच वेळेस हे निदर्शनास आलेले आहे की जे बँक अकाउंट फॉर्म भरते वेळी लिंक केलेले होते त्याऐवजी इतर बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत. राज्य शासन त्यांच्याकडील आधार डेटाबेस वापरून बँक अकाउंट वरती पैसे पाठवत आहे आणि त्यामुळेच ही तफावत होऊ शकते.

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला असेल तर त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे हे चेक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेला भेट द्यावी आणि आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्यावे.

जुने बँक अकाउंट असेल तर त्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील का

जर तुमच्याकडे तुमचे जुने बँक अकाउंट असेल आणि ते अकाउंट तुम्ही नियमित वापरत असाल म्हणजेच जर ते अकाउंट निष्क्रिय झालेले नसेल तर अशा बँका अकाउंट वरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त होऊ शकतात.

परंतु जर तुमचे अकाउंट जुने आहे आणि तुम्ही त्याच्यावर नियमित व्यवहार ठेवलेले नसतील त्यामुळे जर तुमचे बँक अकाउंट निष्क्रिय करण्यात आलेले असेल तर अशा निष्क्रिय झालेल्या बँक अकाउंट वरती लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात येत नाही.

जर तुमचे बँक अकाउंट निष्क्रिय असेल तर तुम्ही ते बँकेमध्ये जाऊन चालू करून घेऊ शकता. तसेच राज्य शासनाकडून बँकांना जर मिनिमम बॅलन्स मेंटेन केलेला नसेल तर अकाउंट बंद न करता त्यावर महिलांना लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु पुढील काळामध्ये बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करणे आणि खाते चालू ठेवणे गरजेचे असेल.

जर तुमच्या बँकेत आधार लिंकिंग ची सुविधा नसेल तर काय करायचे

काही बँकांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने आधार लिंकिंगची सुविधा बंद करण्यात आलेली असेल तर तुम्ही संबंधित बँकेच्या ऑनलाईन सुविधाचा वापर करून आपल्या बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक करू शकता.

परंतु जर तुमचे खाते अशा बँकेत आहे जिथे ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आधार लिंकिंग करण्याची सुविधा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन अकाउंट उघडावे लागेल कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंकिंग प्रक्रिया महत्त्वाची आहे.

त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना तसेच अर्ज करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या की ही सर्व प्रक्रिया विनामूल्य आहे म्हणजेच तुम्हाला आधार लिंकिंग करण्यासाठी बँकेला कोणतेही पैसे द्यायचे नाहीत किंवा अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पैसे द्यायचे नाहीत सर्व प्रक्रिया निशुल्क आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment