महाराष्ट्र राज्य शासनामार्फत Ladki Bahin Yojana Bonus देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत यासंदर्भात नोटिफिकेशन काढण्यात आले आहे की नाही हे जाणून घेऊया.
केंद्र सरकार तसेच राज्य शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत आणि महिलांसाठी वेगवेगळे योजना सुरू आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अदिती तटकरे यांच्या विभागांतर्गत आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचा मार्फत जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जुलै 2024 पासून या योजनेचे फॉर्म सुरु करण्यात आलेले होते. या योजनेमध्ये जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आला आणि त्यानंतर ज्या महिलांना लाभ प्राप्त झालेला नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये देण्यात आले.
महत्त्वाचे मुद्दे:
- Ladki Bahin Yojana Bonus मिळणार का
- ऑक्टोबर महिन्याच्या हफ्ता व्यतिरिक्त मिळणार बोनस मिळू शकतो का
- राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमी वरती बोनस
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana Bonus
आता लाडकी बहीण योजना अंतर्गत परत अडीच हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे आणि मुख्य म्हणजे हा बोनस ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबरोबर देण्यात येणार आहे अशा बातम्या विविध समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत.
म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र महिलांना एकूण 5500 रुपयांचा लाभ प्राप्त होणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आचारसंहितेच्या आधीच ही घोषणा करण्यात आल्यामुळे राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचे वृत्त विविध वेबसाईट आणि youtube व्हिडिओ द्वारे प्रसारित केले जात आहे.
यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी 4500 रुपयांचा लाभ महिलांना देण्यात आलेला होता आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता देण्यात आलेला आहे.
Ladki bahin yojana bonus aditi tatkare
महाराष्ट्र राज्यातील मंत्री अदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास मंत्रालया अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा लाभ दोन कोटी चाळीस लाख महिला घेत आहेत
लाडकी बहीण योजना अंतर्गत वर्षाला 18000 रुपयांचा लाभ देण्यात येतो आणि आता आचारसंहितेपूर्वीच aditi tatkare यांच्या खात्यामधील लाडकी बहीण योजनेविषयी शासनाने अडीच हजार रुपयांचा बोनस जाहीर केलेला आहे का याविषयी त्यांच्या मंत्रालयामध्ये विचारणा करण्यात आली.
अदिती तटकरे यांच्या विभागाशी चर्चा साधल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा कोणताही बोनस देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे म्हणजेच ही न्यूज फेक होती आणि अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका असा संदेश देण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना बोनस दस्तावेज
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे जसे की ओळखीचा पुरावा ज्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादीचा वापर करू शकता.
लाडकी बहीण योजना फक्त 21 ते 65 वयोगटासाठी राबवण्यात येते आणि त्यामुळे तुमचे वय सिद्ध करण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर डॉक्युमेंट आवश्यक असतील तसेच उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असावे अशी अट आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
लाडकी बहिणी योजना अंतर्गत तुम्ही सर्व अटी आणि शर्ती योग्य पद्धतीने पार पाडत आहात असे हमीपत्र द्यावे लागेल. डॉक्युमेंट आणि ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविकाकडे देऊन योजनेचा फॉर्म भरावा लागेल.
Ladki Bahin Yojana Bonus Form
लाडकी बहीण योजना अंतर्गत बोनस मिळणार नाही फक्त रेगुलर लाभ मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही.
समाज माध्यमांवर प्रसारित माहितीनुसार हा बोनस वाटत असताना काही निवडक महिलांना आणि मुलींना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली होती परंतु अशा कोणत्याही प्रकारचा बोनस राज्य सरकार देणार नाही.
लाडकी बहीण योजना अर्ज
जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला नसेल तर या योजनेची मुदत आता संपलेली आहे. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली होती आणि आता ज्या महिलांचे फॉर्म राहिले आहे अशा महिलांना नवीन फॉर्म भरण्यास अडचणी येणार आहेत.
राज्यामध्ये काही महिलांचे लाडकी बहीण योजना फॉर्म भरणे राहिलेले आहे आणि आता राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झालेले आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नवीन शासन निर्णय काढून योजनेमध्ये मुदतवाढ करणे अवघड आहे.
परंतु जर लाडकी बहीण योजनांमध्ये मुदतवाढ झाली तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे अर्ज दाखल करू शकतात. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्यास अर्ज दाखल करता येत होता परंतु लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी आता फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा