Ladki Bahin Yojana Eligibility: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी आणि महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु अद्याप या योजनेत लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष आहेत आणि यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस कोणती आहे याविषयीची महत्त्वाची माहिती बऱ्याच व्यक्तींना माहित नाही आणि त्यामुळे याविषयीचे अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
महत्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजना साठी सरकारकडून वेगवेगळे पात्रता निकष
- ज्या महिला सर्व पात्रता निकष पार पाडतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल
- सरकारकडून पंधराशे रुपये प्रति महिना प्राप्त करण्यासाठी पुढील पात्रता निकष पार पाडावे लागतील.
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजना पात्रता निकष
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
वय मर्यादा | 21 ते 65 वर्ष |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला |
उत्पन्न | अडीच लाखांपेक्षा कमी |
बँक खाते | आधार कार्ड लिंक बँक अकाउंट आवश्यक |
पात्र महिला | विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील महिलांची आर्थिक परिस्थिती काहीशी चांगली करण्यासाठी आणि त्यांच्यावर आधारित असलेल्या मुलांची पोषण व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत तसेच जर याआधी महिला कोणत्याही अन्य योजनेद्वारे लाभ घेत असतील आणि लाभाची रक्कम ही 1500 रुपये पेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम सदर महिलेला दिली जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. महिलांचे परिस्थिती काहीशी सुधारली जावी यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ही महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
अर्ज करण्याची सुरुवात | 1 जुलै २०२४ |
विभाग | महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य |
फॉर्म करण्याची पद्धती | ऑनलाइन |
राशी देय दिनांक | महिन्याच्या 15 तारखेपर्यंत |
Mazi Ladki Bahin Yojana Eligibility
- महाराष्ट्रातील घटस्फोटीत, विवाहित, निराधार तसेच परित्यक्त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटेल
- महिला महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे
- वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे
- अर्ज करण्यासाठी सदर महिलेचे बँकेमध्ये खाते असावे
- महिलेकडे आधार कार्ड उपलब्ध असावे
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे
- फॉर्म भरताना आवश्यक डॉक्युमेंट सोबत असावेत
माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य करण्यात आलेले आहे आणि यासाठी सदर महिला ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकते तसेच ज्या महिलेला स्वतः ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही अशा महिला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मुख्य परिचारिका, सेतू सुविधा केंद्र च्या माध्यमातून अर्ज दाखल करू शकता.
वरील भरलेला अर्ज भरलेला अर्ज अंगणवाडी कार्यालयात तसेच सेतू सुविधा कार्यालयामध्ये नियुक्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि त्याची तुम्हाला योग्य पावती पण दिली जाईल. सदर फॉर्म भरत असताना ऑनलाईन केवायसी प्रक्रिया केली जाईल त्यामुळे सदर महिला फॉर्म भरतेवेळी आवश्यक असणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अधिक माहिती प्राप्त करायचे असेल तसेच तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
जन्म दाखला दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला यावर बापाचे नाव आहे व आधारवर पतीचे नाव आहे
विशेष सहाय्य योजना अंतर्गत ज्या महिला संजय गांधी निराधार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना ही योजना लागू होईल का
जर महिला केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.