लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनापूर्वीच लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता; तारीख फिक्स

लाडकी बहीण योजना post ला 5 स्टार रेटिंग द्या

Ladki Bahin Yojana First Installment: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वीच म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील तसेच प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री यासाठी उपस्थित असेल.

लाडकी बहीण योजनेच्या मार्फत दोन ते अडीच कोटी महिलांना या दिवशी पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि लाखो महिलांच्या फॉर्म चे स्टेटस बदलण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • रक्षाबंधनापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल
  • रक्षाबंधन 197 ऑगस्ट रोजी आहे आणि लाडकी बहिण योजनेचा हप्ता 17 ऑगस्ट रोजी वितरित केला जाईल
  • 17 ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम होईल याच्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री हजेरी लावतील

Ladki Bahin Yojana First Installment Date

बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेले आहे. 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येईल.

यापूर्वी हा हप्ता 19 ऑगस्ट 2024 म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्त वरती देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती. परंतु आता दोन दिवस आधीच या योजनेचे पहिले इन्स्टॉलमेंट देण्यात येईल.

लाडकी बहीण योजना अर्ज

लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी साठ लाख महिलांनी ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये एक कोटी सत्तावीस लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत जवळपास 82 टक्के अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्यामध्ये मुख्यतः डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड न करणे आणि अयोग्य बँक खात्याची माहिती ही मुख्य कारणे आहेत.

सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रुपये देण्यात येणार असल्यामुळे अजूनही लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात केले जात आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सर्वर मध्ये बदल करून अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच ही योजना करण्यात आली आहे अशी टीका विरोधकांच्या माध्यमातून केली जात आहे तसेच या योजनेसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र वरती कर्ज वाढण्याचा धोका होईल असे विरोधकांचे मत आहे.

परंतु सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेविषयीची भूमिका अत्यंत ठाम आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. तसेच या योजनेला विरोध म्हणून करण्यात आलेल्या जनहित याचिकेला हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे योजना अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

ऑफिशियल वेबसाईटऑफिशियल ॲप
स्वयंघोषणापत्रहमीपत्र
लाभार्थी यादीअर्जाचे स्टेटस चेक करा

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment