Mazi Ladki Bahin Yojana First Installment: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
महिला सक्षमीकरणाच्या हेतूने आणि महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, निराधार, तसेच घटस्फोटीत आणि परितक्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणात महिला विविध आर्थिक बाबींसाठी पुरुषांवर निर्भर आहे आणि सदर महिलांना काहीसे आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना काम करेल.
तसेच ज्या महिला यापूर्वी पासून इतर योजनांचा लाभ घेऊन काहीशी राशी मिळवत आहेत अशा महिलांना एकूण फरकाचे रक्कम वाढवून देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
महाराष्ट्र राज्य मधील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा अधिकृत जीआर जाहीर करण्यात आलेला आहे आणि या योजनेची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा आणि एक जुलै 2024 पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सदर फॉर्म भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पर्यंत चालेल आणि त्यानंतर तात्पुरत्या यादीची घोषणा केली जाईल संबंधित यादीमध्ये काही तक्रारी आणि हरकती असल्यास त्या नमूद केल्या जातील.
आणि एक ऑगस्ट रोजी लाभार्थी यादी जाहीर केली जाईल ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल अशा महिलांना पुढील पंधरा दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट
Ladki Bahin Yojana First Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी दरम्यान देण्यात येईल अशी घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावरती डीबीटी पद्धतीने पाठवण्यात येतील.
एक जुलै ते 31 ऑगस्ट च्या दरम्यान अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यानंतर ज्या व्यक्तींचे अर्ज प्राप्त झालेले आहेत अशा महिलांची यादी जाहीर करण्यात येईल तसेच संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून पुढील फॉर्म प्रक्रिया पंधरा दिवसांमध्ये पूर्ण केली जाऊ शकते त्यानंतर अंतिम यादी प्रसारित केले जाईल त्यानंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये सदर महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर डीबीटी पद्धतीने महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातील.
शासनामार्फत अधिकृत जीआर काढण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजना साठी आवश्यक ॲप तसेच वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे. ऑनलाइन वेब पोर्टलच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिला
लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील महिला पात्र असतील संबंधित योजनेमध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतील संबंधित महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे नागरिकत्व असावे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे याचबरोबर विविध पात्रता निकष सरकारमार्फत ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे बऱ्याच महिला या योजनेमधून अपात्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना सदर महिला तिथे उपस्थित असावी किंवा फॉर्म भरणाऱ्या व्यक्ती कडे सदर महिलेचे फोटो असावे कारण केवायसी प्रक्रियेमुळे ऑनलाइन फॉर्म भरत असताना महिलेचा व्हेरिफिकेशन करावा लागेल. रेशन कार्ड, आधार कार्ड सारखे विविध कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते असणे गरजेचे आहे त्यामध्येच डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातील.
ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही अशा महिलांसाठी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल या प्रक्रियेमध्ये सर्व फॉर्म भरण्यासाठी निःशुल्क प्रक्रिया पुरी करण्यात येईल आणि सदर महिलेला फॉर्म भरण्याची पावती दिली जाईल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा