लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Form PDF: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज @ladkibahin maharastra.gov.in

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.6/5 - (8 votes)

Ladki Bahin Yojana Form PDF: सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे आणि जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज शोधत असाल तर आजच्या या लेखामध्ये तुम्हाला निश्चितच मदत होणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही अशा महिलांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले जाऊ शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांद्वारे अर्ज भरले जाऊ शकतात जसे की ग्राम पंचायत अंगणवाडी सेवकांमार्फत तसेच मुख्य परिचारिका, ग्रामसेवक इत्यादी मार्फत अर्ज भरले जाऊ शकतात.

तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी शासनामार्फत काही कॅम्प आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मदत केली जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही अशा महिला ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात
  • ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे अर्जाची प्रत असणे गरजेचे आहे त्यासाठी या लेखात पीडीएफ फाईल देण्यात आलेले आहे
  • Ladki Bahin Yojana Form Pdf डाऊनलोड करून त्यावर सर्व महत्त्वाची माहिती भरून निर्धारित सरकारी ऑफिस किंवा अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे आहे
  • अर्जासाठी तुमच्याकडे कोणतीही राशी मागितली जाणार नाही, अर्ज प्रक्रिया निशुल्क आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज (Ladki Bahin Maharastra Gov .in Form)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धती उपलब्ध आहे ऑनलाइन पद्धतीमध्ये मोबाईल ॲप च्या माध्यमातून तुम्ही अर्ज सादर करू शकता तसेच ऑफलाइन पद्धतीमध्ये अर्ज करण्यासाठी ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अर्ज सादर केले जाऊ शकतात.

लाडकी बहीण योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी करण्यात आलेली योजना आहे यामध्ये विवाहित विधवा निराधार परितक्या तसेच घटस्फोटीत महिला लाभ घेऊ शकतात या योजनेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै निश्चित करण्यात आलेली आहे. सध्या इंटरनेट वरती या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी विविध वेबसाईट असल्याचे सांगण्यात येत आहे जसे की https://majhiladki.gov.in/ , https://majhiladkibahin.gov.in/ इत्यादी

परंतु महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेली वेबसाईट ही वेगळी आहेत ज्या वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे आहे – ladakibahin.maharashtra.gov.in म्हणजेच इंटरनेट वरती व्हायरल होत असलेल्या सर्व वेबसाईट खोट्या आहेत आणि या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लोकांकडून पैशांची मागणी केली जात आहे आणि डॉक्युमेंट मागवले जात आहेत परंतु लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. लाडकी बहीण योजना फॉर्म भरा

Ladki Bahin Yojana Offline Form PDF

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने भरला जाऊ शकतो ऑफलाइन पद्धतीमध्ये अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म पीडीएफ असने गरजेचे आहे या फॉर्मच्या मदतीने तुम्ही हाताने माहिती लिहून तो अर्ज सदर अधिकाऱ्यांची सही घेऊन अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म भरणे बरोबरच तुम्हाला विविध लाडकी बहीण योजना कागदपत्रे जमा करावे लागतील आणि सदर महिलेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल संपूर्ण दस्तावेजांची परत पडताळणी झाल्यानंतरच पुढे अंतिम यादीसाठी नावे पाठवली जातील आणि त्या यादीमध्ये नावे आल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

लाडकी बहीण योजना फॉर्म पीडीएफ save करा

लाडकी बहीण योजना 2024 महाराष्ट्र

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे बघितले जात आहे या योजनेमध्ये महिलांसाठी प्रति महीना पंधराशे रुपये तर वर्षाला 18 हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी एक प्रमुख योजना म्हणून या योजनेकडे बघितले जात आहे या योजनेची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनंतर याविषयीचा अधिकृत जीआर काढण्यात आला आणि त्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये अर्ज सादर करून घेतल्या जातील असे सांगण्यात आले.

एक महत्त्वकांक्षी योजना असली तरी या योजनेमध्ये अनेक अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या जसे की कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याकडे चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर वगळता तर त्या घरातील महिलेला या योजनेचा लाभ भेटणार नाही किंवा त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ भेटणार नाही अशा प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्या. लाडकी बहीण योजना पात्रता निकष जाणून घ्या.

योजनेमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर आणि त्या अर्जाचे संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर एक मुख्य यादी जाहीर करण्यात येईल आणि जर संबंधित यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव असेल तरच सदर महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येईल आणि एकदा यादीमध्ये नाव जाहीर झाले तर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 1500 रुपये डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यात येतील.

महाराष्ट्र राज्याच्या अगोदर मध्यप्रदेश राज्यांमध्ये अशीच एक योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेचे नाव लाडली बहना योजना असे ठेवण्यात आले होते आणि त्या योजनेमध्ये 1250 रुपये प्रति महिना महिलांसाठी देण्यात येतात मध्य प्रदेश मध्ये ही योजना एक सुपरहिट योजना म्हणून समोर आले आहे आणि त्याच योजनेप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू करून त्या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

तुम्ही या योजनेसाठी अजून अर्ज केला आहे की नाही ते खाली कमेंट करून कळवा तसेच कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता झालेली आहे की नाही त्याविषयीची माहिती खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Form PDF: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज @ladkibahin maharastra.gov.in”

    • शासनाच्या वतीने अद्याप कोणतेही वेबसाईट प्रसारित करण्यात आलेली नाही, वेबसाईट पोर्टल निर्माण झाल्यानंतर तुम्हाला सुचित केले जाईल.

      उत्तर

Leave a Comment