लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki bahin yojana हमीपत्र PDF Download, माझी लाडकी बहिण योजना हमीपत्र

लाडकी बहीण योजना post ला 5 स्टार रेटिंग द्या

Majhi ladki bahin yojana hamipatra PDF: लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू आहेत आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच महिला अर्ज दाखल करत आहेत. या योजनेची आता अर्ज करण्याची मुदत वाढ होऊन 31 ऑगस्ट करण्यात आलेले आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

परंतु ऑनलाईन अर्ज भरायचा असेल किंवा ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर आपल्याला त्याबरोबर हमीपत्र जोडून द्यावे लागते आणि सदर हमीपत्र फॉरमॅट आपल्याला माहीत नसेल तर आपला अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता वाढते त्यामुळे आज आपण माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र कसे डाऊनलोड करायचे आणि त्याचबरोबर याची पीडीएफ कुठे भेटेल याची माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर खाली आम्ही ऑफलाईन अर्ज बरोबरच हमीपत्र पण डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे तसेच जर तुम्हाला फक्त हमीपत्र डाऊनलोड करायचे असेल तर तुम्ही खालील फॉर्म मधील फक्त दुसऱ्या पेज ची प्रिंट आउट काढू शकता आणि तुमची हमीपत्र जमा करू शकता. यासाठी तुमच्याकडे Ladki bahin yojana हमीपत्र PDF असणे गरजेचे ठरते.

महत्त्वाचे मुद्दे:

  • ऑनलाइन तसेच ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी हमीपत्र महत्त्वाचे
  • हमीपत्र ची पीडीएफ उपलब्ध जी प्राप्त करून तुम्ही अर्ज करू शकता
  • शासनाच्या अटी आणि शर्तींचे पालन करत आहोत असे हमीपत्र नमूद
  • लाडकी बहीण हमीपत्र मध्ये विविध अटी आणि शर्ती देण्यात आले आहेत ज्या पार पाडणे गरजेचे आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तसेच जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका कडे हा अर्ज भरून देऊ शकता आणि ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज भरण्यासाठी 50 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे तसेच जर तुम्ही अर्ज भरत असाल तर यासाठीची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे त्यामुळे तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Ladki bahin yojana हमीपत्र PDF Download

Majhi ladki bahin yojana hamipatra

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रत पुढील प्रमाणे आहे.

  1. माझ्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाही (पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक वगळता)
  2. माझ्या कुटुंबामध्ये कोणीही आयकर धारक नाहीत
  3. माझ्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरीला नाही किंवा पेन्शन चालू नाही
  4. मी शासनाच्या इतर योजना मार्फत पंधराशे रुपये पेक्षा जास्त प्रति महिना प्राप्त करत नाही
  5. माझ्या घरामध्ये कोणताही विद्यमान/माजी आमदार किंवा खासदार नाही
  6. माझ्या घरातील कोणताही सदस्य राज्य शासन किंवा भारत शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या बोर्ड /कॉपरेशन मध्ये कार्यरत नाही
  7. माझ्याकडे किंवा कुटुंबातील इतर सदस्याकडे स्वतःच्या नावावरती चार चाकी गाडी नाही, ट्रॅक्टर वगळता

वरती केलेली सर्व माहिती योग्य आहे आणि मी आधार कार्ड बरोबरच बायोमेट्रिक आणि ओटीपी प्रधान करण्यास सक्षम राहील तसेच या प्रक्रियेस माझा कोणताही विरोध नसेल माझी ओळख पटवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आधार सक्षमीकरण केले जाऊ शकते.

ऑफलाइन पद्धती बरोबरच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून हा अर्ज सादर करू शकता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सरळ सोपी आहे त्यामुळे जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज भरू शकता. हे पण वाचा: लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज करा

अर्थसंकल्प मध्ये एक लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या आणि प्रथम जाहीर केलेल्या जीआर मध्ये बऱ्याच त्रुटी असल्याची तक्रार येत होती आणि त्याच अनुषंगाने सरकारने 3 जुलै 2024 रोजी परत एक अद्यावत जीआर जाहीर केला त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनांमध्ये सात मोठे बदल करत असल्याचे घोषणा केली या बदलांमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि प्रति महिना पंधराशे रुपये प्राप्त करू शकतील त्यामुळे तुम्ही हे पण वाचू शकता – लाडकी बहिण योजनेत सात मोठे बदल

ऑफिशियल वेबसाईटऑफिशियल ॲप
स्वयंघोषणापत्रलाभार्थी यादी

Ladki Bahin Yojana Hami Patra

जर तुम्ही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फॉर्म सोबत हमीपत्र जोडून द्यावे लागेल. हमीपत्र मध्ये तुम्ही सर्व अटी आणि शर्तींचे पालन करत आहात असे नमूद केलेले आहे आणि तुम्हाला सर्व योग्य पर्याय पुढे टिकमार्क करून ते सबमिट करावे लागेल.

Ladki Bahin Yojana Hami Patra हे सेल्फ अफीडेट म्हणून काम करेल आणि तुम्ही सर्व अटी आणि शर्ती पालन करत आहात असे लेखी स्वरूपामध्ये तुम्ही शासनाला कळवाल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेण्यास पात्र व्हाल.

महाराष्ट्र राज्यांमधील पात्र महिला नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी आणि ज्या महिलांची स्थिती आर्थिक दृष्ट्या खालवलेली आहे अशा महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी हमीपत्र स्वीकारण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment