लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडक्या बहिणींसाठी फक्त 4 तासांचा जॉब आणि 11,000 रुपये महिना Ladki Bahin Yojana Job

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.9/5 - (347 votes)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी Ladki Bahin Yojana Job देण्याचे धोरण आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये प्राप्त झालेले आहेत जुलै 2024 पासून सुरू झालेली ही योजना राज्यातील महिलांसाठी खूपच उपयोगी ठरत आहे. राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत.

राज्यातील काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून व्यवसाय सुरू केले आहेत आणि त्यामध्ये त्यांना यश मिळत आहे अशातच राज्य शासनाच्या मंत्र्यांनी लाडक्या बहिणींना जॉब देणार असल्याचे सांगितलेले आहे.

ज्या महिलांना सध्या जॉब ची गरज आहे अशा महिलांसाठी ही माहिती खूपच कामाची ठरू शकते आणि त्या अंतर्गत महिला राष्ट्रीय स्तराच्या कंपनीमध्ये काम करू शकतील. कमी तासांचे काम आणि चांगला पगार असणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • Ladki Bahin Yojana Job देण्याची मंत्र्यांची घोषणा
  • दिवसाला चार तास काम आणि महिना 11000
  • 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना
  • अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करता येणार
  • काही पात्र महिला जॉब साठी अर्ज करू शकतील

Ladki Bahin Yojana 2024

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी21 ते 65 वयोगटातील पात्र महिला
अविवाहित मुलीला लाभ मिळेल काकुटुंबातील एका अविवाहित मुलीला लाभ
वार्षिक उत्पन्न मर्यादाअडीच लाख रुपये
लाभार्थी यादीजिल्हा नुसार लाभार्थ्यांनी
ऑफिशियल वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Job 2024

राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा चांगला लाभ घेत आहेत आणि त्यामधून वेगवेगळे व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करत आहेत. मुंबईतील एका लाडक्या बहिणीने असाच व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला होता.

राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना, मुलींसाठी लेक लाडकी योजना आणि मोफत शिक्षण योजना, गृहिणी साठी अन्नपूर्णा योजना आणि आता राज्य शासनाकडून पात्र महिलांसाठी जॉब देण्यात येऊ शकतो.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाडकी बहिण योजना बद्दल बोलताना सांगितले की ते लवकरच महिलांसाठी जॉब ची संधी घेऊन येणार आहे ज्यामध्ये महिलांना टाटा कंपनीमध्ये नोकरी देण्यात येईल.

नोकरीमध्ये महिलांना पार्ट टाइम काम करावे लागेल म्हणजेच दिवसाला चार तास काम करावे लागेल आणि महिन्याला त्यासाठी 11000 रुपयांचे मानधन देण्यात येईल. यातच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देण्यात येईल.

Ladki Bahin Yojana Job Opportunity

महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना जॉब करण्याची इच्छा असते परंतु घरकाम आणि इतर बाबींमुळे त्यांना पूर्ण वेळ जॉब करणे शक्य नसते आणि अशा महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महिला श्रमबळ उपयुक्त व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात येऊ शकते.

आतापर्यंत लाडकी बहीण जॉब योजनेचा कोणताही जीआर काढण्यात आलेला नाही त्यामुळे ही योजना अंमलबजावणी होते की नाही त्याविषयी शंका आहे. जर लाडक्या बहिणीसाठी अशा पद्धतीची जॉब योजना अस्तित्वात आली तर त्याचा लाखो महिलांना फायदा होईल.

परंतु सध्या तरी राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली नाही. फक्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाषणात याविषयीची घोषणा दिलेली आहे त्यामुळे भविष्यात ही योजना पूर्णत्वास येते की फक्त आश्वासनातच राहते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

यापूर्वी सोशल मीडिया वरती अशाच पद्धतीची फ्री मोबाईल गिफ्ट नावाची योजना प्रसारित होत आणि या योजनेमध्ये मोबाईल भेटणार आहे असे सांगण्यात येत होते.

बऱ्याच महिलांचे मोबाईल योजनेसाठी प्रश्न होते आणि त्यांच्या मनामध्ये त्यांना मोबाईल भेटणार आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते आणि त्यामुळे मोबाईल योजनेमध्ये मोबाईल भेटणार आहे की नाही हे पुढील लेखात जाणून घ्या.

हे पण वाचा: महिलांना मिळणार का मोफत मोबाईल

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

1 thought on “लाडक्या बहिणींसाठी फक्त 4 तासांचा जॉब आणि 11,000 रुपये महिना Ladki Bahin Yojana Job”

Leave a Comment