अमरावती जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि अमरावती जिल्ह्यामधील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवेदन पाठवलेले आहे अशा महिलांनी आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घेणे गरजेचे आहे.
जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्ही त्यामध्ये योग्य बदल करू शकाल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्राप्त करून घेऊ शकाल. त्यामुळेच आज आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का कसे चेक करायचे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी वाटप करण्यास सुरुवात झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लवकरात लवकर आपले लाभार्थी स्टेटस जाणून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार गरज पडल्यास आपल्या फॉर्ममध्ये बदल करून लवकरात लवकर अर्ज सबमिट करावे लागतील.
महत्त्वाचे मुद्दे:
- ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे अशा महिलांनी फॉर्म स्टेटस चेक करावे
- जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तरच तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल
- लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अमरावती जिल्ह्यासाठी
अनुक्रमणिका ↕️
माझी लाडकी बहीण योजना यादी अमरावती जिल्हा
अमरावती जिल्ह्यामधील लक्षावधी महिलांकडून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच बऱ्याच महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर काही महिलांचे अर्ज काही कारणांमुळे रिजेक्ट पण करण्यात आलेले आहे. जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल आणि तुम्ही ते वेळेमध्ये चेक करून त्यामध्ये योग्य बदल केले नाहीत तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येणारा लाडकी बहीण योजनेचा पहिला 3000 रुपयांचा हप्ता भेटण्यास अडचणीचा सामना करावा लागेल.
म्हणूनच जर तुम्ही आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासली नसेल तर संबंधित यादी तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया पार पाडू शकता.
- सर्वात प्रथम अमरावती महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा
- मुख्य पानावरती लाडकी बहिण योजनेचा ऑप्शन शोधा
- संबंधित ऑप्शन वर क्लिक करा तुमच्या पुढे नवीन पेज उघडेल
- या नव्या पानावरती तुमच्या वॉर्ड नुसार पीडीएफ फाईल दिलेल्या असतील त्यामध्ये तुमची योग्य पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
- जर पीडीएफ मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल
लाडकी बहीण योजनेची यादी अद्याप अमरावती विभागाच्या महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु पुढील काही दिवसांमध्ये ही यादी प्रकाशित करण्यात येईल आणि तेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेची यादी तपासू शकता परंतु सध्या तरी काही मोजक्याच महानगरपालिकांच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध आहे त्यामुळे तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीचा उपयोग करू शकता.
माझी लाडकी बहीण योजना यादी 2024
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर तुमच्या फॉर्म भरतेवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती Approved नावाचा मेसेज पाठवण्यात येतो आणि जरी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तरीपण मेसेज पाठवण्यात येतो. जर तुमच्या मोबाईल वरती पुढील प्रमाणे मेसेज प्राप्त झालेला असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे.
याचबरोबर बऱ्याच ग्रामपंचायतींच्या वतीने लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे जर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीने पण लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊन तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
महाराष्ट्र राज्यातील काही नगरपालिका मार्फत लाडकी बहिणी योजना लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे जर तुमच्या नगरपालिकेने अशी यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही संबंधित यादीचा लाभ घेऊन आपला लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे चेक करू शकाल.
माझी लाडकी बहीण योजना यादी ऑनलाइन Amravati District
ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहिण योजनेची यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि तिथे उजव्या साईडला वरच्या बाजूला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावरती क्लिक करा तुमचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तसेच कॅपच्या टाकून लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
तसेच मोबाईल ॲपवरून पण तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून आणणारी नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घ्या आणि त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाका त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका आणि त्याच्या मदतीने लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या विकल्पामध्ये जा आणि लाडकी बहीण आहे योजनेच्या अर्ज स्थिती जाणून घ्या.
हे वाचा: लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाल्यावर काय करायचे
माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट, 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
योजनेचा फायदा | बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
ऑफिशियल वेबसाईट | ladkibahin .maharashtra.gov.in |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमरावती जिल्हा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली महाराष्ट्रातील एक कल्याणकारी योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रतीमहिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
तसेच ज्या महिला आधीपासूनच इतर योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्या योजनेची लाभाची राशी पंधराशे रुपये पेक्षा कमी असेल तर एकूण फरकाची रक्कम सदर महिलेला दिले जाणार आहे. कोणत्याही महिलेला या योजनेचा डबल लाभ घेता येणार नाही.
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या बिकट परिस्थिती असलेल्या महिलांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये महिलांना महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना काहीसा आर्थिक दृष्ट्या हातभार लावण्यासाठी प्रति महीना राशी वितरित केली जाईल.
इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
अमरावती जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे त्यामुळे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांची लाभार्थ्यांची लिस्ट चेक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही पुढील लेख वाचू शकाल.
नाशिक जिल्हा लाभार्थी यादी | पुणे जिल्हा लाभार्थी यादी |
वाशिम जिल्हा लाभार्थी यादी | चंद्रपूर जिल्हा लाभार्थी यादी |
अकोला जिल्हा लाभार्थी यादी | बुलढाणा जिल्हा लाभार्थी यादी |
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा