लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki bahin yojana marathi form | मराठी भाषेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारणार

लाडकी बहीण योजना post ला 5 स्टार रेटिंग द्या

Ladki Bahin Yojana Marathi Form: लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून विविध कारणांमुळे चर्चेमध्ये आहे पहिल्यांदा जमिनीची अट आणि उत्पन्नाच्या अटीमुळे लाडकी बहीण योजनेवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती आणि त्यानंतर अर्ज करण्याच्या मुदतीमुळे सदर योजना वादाच्या भवऱ्यात अडकली होती परंतु या सर्व परिस्थितीमध्ये सरकारने वेळोवेळी चांगले निर्णय घेऊन या समस्यांचे निवारण केले.

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून अंगणवाडी सेवीकांच्या माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषा मधून अर्ज करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता आणि त्यामुळे सरकारच्या निदर्शनास ही बाब आली.

मराठी भाषेमधील अर्ज स्वीकारले जावेत आणि मराठी भाषेमधून अर्ज केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी नागरिकांची मागणी होती. महाराष्ट्र मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात मराठी भाषेमध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यामुळे हे सर्व अर्ज नामंजूर होतील का अशी शंका निर्माण झाली होती.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त इंग्रजीतच स्वीकारले जातील असे मेसेज सोशल मीडियावरती प्रसारित
  • भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील इंग्रजीची अडचण लक्षात आणून दिली
  • आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय मार्फत मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार अशी माहिती देण्यात आली
  • जवळपास 70% रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन त्यांना लाभ मिळणार

Ladki Bahin Yojana Marathi Form

मराठी भाषेमध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पाडवी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून एक नवीन माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये आता मराठी भाषेमध्ये पण अर्ज स्वीकारले जातील आणि याचा लाभ महाराष्ट्रातील 70 टक्के मराठीत अर्ज भरणाऱ्या महिलांना होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील जवळपास 70 टक्के महिलांच्या अर्ज हे मराठी भाषेमधून भरण्यात आलेले होते आणि मागे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती प्रसारित होत असलेल्या मेसेज मध्ये ज्या महिलांनी मराठी भाषेमधून अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे लाडके बहीण योजनेचे अर्ज बाद होतील अशी माहिती देण्यात येत होती.

परंतु आता मुख्यमंत्री कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बऱ्याच महिलांनी मराठी भाषेमधून अर्ज भरलेले होते मात्र शासनाच्या सूचने शिवाय ते अर्ज इंग्रजी भाषेमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते. त्यामुळे आता नवीन माहितीमुळे मराठी भाषेतील अर्जांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचे एक कोटीच्या वर अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 25 दिवसांमध्ये तब्बल 1 कोटी 80 लाख अर्ज सादर करण्यात आलेले आहे आणि हा आकडा दोन कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.

सध्या नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे आणि दररोज सात ते आठ लाख अर्ज पोर्टल वरती भरले जात आहेत तसेच 88 लाख लोकांनी सदर ॲप डाऊनलोड केलेले आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये सर्वात जास्त डाऊनलोड केलेल्या ॲप मध्ये नारीशक्ती दूत ॲपचा नंबर 27 व्या क्रमांकावर आहे.

लाडकी बहिण योजना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना हमीपत्र pdfयेथे क्लिक करा
लाडकी बहीण योजना ॲपयोजना ॲप
लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्मऑनलाइन फॉर्म pdf
लाडकी बहिणी योजना वेबसाईटhttps://ladkibahinyojana.online/

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही एकच चांगली योजना असल्याचे सरकारच्या माध्यमातून वारंवार प्रतिपादित करण्यात येत आहे आणि या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात महिलांना मिळणार आहे.

तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे का तसेच या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आलेले आहे का, ते खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment