लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

ज्या लाडक्या बहिणींना अद्याप पैसे नाही मिळाले त्यांनी काय करायचे ladki bahin yojana news

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 1/5 - (2 votes)

Ladki Bahin Yojana News Maharashtra: महाराष्ट्र राज्य शासनामार्फत जून 2024 च्या अर्थसंकल्पांमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जुलै 2024 पासून या योजनेचे अर्ज सुरू झाले आणि तेव्हापासूनच राज्याच्या महिलांमध्ये या योजनेविषयी खूपच चांगला प्रतिसाद देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेळोवेळी मुदत वाढ करण्यात आली. सुरुवातीला 5 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असेल अशी माहिती देण्यात आली होती आणि त्यानंतर परत वेळोवेळी यामध्ये बदल करून अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली.

म्हणजेच 15 जुलै नंतर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्जात मुदतवाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढवून देण्यात आली. राज्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. महाराष्ट्र राज्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ
  2. बऱ्याच महिलांनी अर्ज केले आहेत परंतु त्यांना अद्याप लाभ प्राप्त झाला नाही
  3. ज्यांना लाभ प्राप्त झाला नाही त्यांनी सध्या काय करायचे
  4. लाडकी बहीण योजनेचे news update

Ladki Bahin Yojana Update

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
पात्र लाभार्थी21 ते 65 वयोगटातील महिला
एकूण लाभ18 हजार रुपये वार्षिक
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
आतापर्यंत एकूण हप्ते5
ऑफिशियल वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana News Update

ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल केले होते त्यांना रक्षाबंधनापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्राप्त झाला. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल केले त्यांना 4500 रुपये देण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या आठवड्यापासूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले गेले. म्हणजेच पात्र महिलांना एकूण 7500 रुपये देण्यात आले.

Ladki Bahin Yojana Update Pending Beneficiary

या सर्व परिस्थितीमध्ये राज्यामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत त्यांना अद्याप या योजनेचा लाभ प्राप्त झालेला नाही. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर काही महिलांच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांना लाभ प्राप्त झाला नाही. बऱ्याच महिला पात्रता निकषात बसत नसल्यामुळे त्यांना लाभ प्राप्त झाला नाही.

परंतु काही महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत तरी पण त्यांना लाभ प्राप्त झालेला नाही. म्हणजेच ज्या महिलांनी पात्रता निकषात असताना अर्ज दाखल केला तरी ज्या महिलांना लाभ प्राप्त झालेला नाही अशा महिलांनी काय करायचे हे जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना पैसे आले नाहीत काय करावे

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अद्याप लाभ मिळाला नाही अशा महिलांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली आहे.

जोपर्यंत राज्यामधील इलेक्शन प्रक्रिया पार पाडत नाही तोपर्यंत ही योजना बंद राहील या योजनेबरोबरच योजनादूत योजना पण काही काळ बंद करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने या वरती स्पष्टीकरण देताना सांगितले की ज्या योजनांमध्ये शासनाकडून डायरेक्ट पैसे दिले जातात अशा योजना मतदारांवरती प्रभाव पाडू शकतात आणि त्यामुळेच आचारसंहिता चालू असेपर्यंत या योजनांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येणार नाही म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज सध्या pending मध्ये आहे त्यांना अजून काही काळ वाट बघावी लागू शकते.

काही महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आणि अशा महिलांनी त्यांचे अर्ज जर परत सबमिट केले नाही तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही.

तसेच ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन अर्ज दाखल केलेले आहेत अशा महिलांनी आपला अर्ज मंजूर झालेला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कारण बऱ्याच वेळेस अर्ज नामंजूर केला जातो आणि मोबाईल वरती एसएमएस आला नाही तर आपल्याला अर्जाचे स्टेटस समजत नाही आणि अशा वेळेस आपल्या मनात प्रश्न उद्भवतो की अर्ज केलेला आहे परंतु आपल्याला लाभ प्राप्त का होत नाही. अशा सर्व परिस्थिती पासून वाचण्यासाठी अंगणवाडी सेविका कडून आपला अर्ज मंजूर झाला की बाद झाला हे एकदा चेक करून घ्यावे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment