महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना या योजनेमधून प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा अर्ज भरलेला नसेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
लाडकी बहीण योजनेचे आधी अर्ज ऑनलाईन ॲप च्या मदतीने भरता येत होते म्हणजेच आपण प्ले स्टोअर वरील नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करत होतो परंतु आता वेबसाईट पोर्टल ladki bahin maharashtra.gov.in मदतीने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पोर्टल वरील अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे परंतु बऱ्याच महिलांना आणि लाभार्थ्यांना याची माहिती नसते आणि चुकीचा अर्ज भरला गेला तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते.
महत्त्वाचे मुद्दे:
- नारीशक्ती दूत ॲप वरून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित
- https ladki bahin maharashtra gov in योजनेचे अर्ज भरण्यासाठी आता ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वरूनच नवीन अर्ज भरता येतील
- लाडकी बहीण योजनेची पुढील प्रक्रिया ऑनलाईन वेब पोर्टलवरून करता येईल
- लाडकी बहीण योजनेचे सर्व नवीन अपडेट आणि इतर महत्वपूर्ण माहिती योजनेच्या नवीन ऑफिशिअल पोर्टल वरती बघता येईल
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजना Online Form कसा भरायचा ladki bahin maharashtra gov in
Step 1: लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट उघडा – ladakibahin.maharashtra.gov.in
Step 2: वेबसाईटच्या उजव्या बाजूला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावर क्लिक करा
Step 3: तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल ज्याच्यावरती Doesn’t have account, Create account? नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा
Ladki Bahin Maharashtra Gov in Online Registration
Step 3: तुमच्या पुढे एक नवीन फॉर्म उघडेल यावरील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायचे आहे आणि ही माहिती तुम्हाला इंग्रजी भाषेमध्येच भरायची आहे.
Step 4: सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरा आणि Signup नावाच्या विकल्पावरती क्लिक करा
Step 5: तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल जो दिलेल्या जागेत टाकायचा आहे.
Step 6: ओटीपी यशस्वीरित्या टाकल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही वेबसाईटच्या मुख्य पानावरती याल
Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 Login
Step 7: लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटच्या मुख्य पानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक करा
Step 8: वरील पर्यायावर ती क्लिक केल्या नंतर तुमच्या पुढे आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय येईल तिथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे तसेच कॅपच्या भरून Send OTP बटनावर क्लिक करायचे आहे.
Step 9: तुमच्या आधार नोंदणीकृत असलेल्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल जो वेबसाईट मध्ये टाकायचे आहे.
Step 10: आपला आधार क्रमांक Verify OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करून verify करायचा आहे
Step 11: तुमच्यापुढे परत एक नवीन फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड अनुसार नाव असेल तसेच पुढील माहिती भरावी लागेल
- वडील किंवा पतीचे नाव
- वडिलांचे नाव
- महिलेचे लग्न पूर्वीचे नाव
- वैवाहिक स्थिती
- जन्मतारीख
- महाराष्ट्रात जन्म घेतला आहे की नाही
Step 12: वरील माहिती भरल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा तिथे आपल्याला आपला अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे त्यामध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
Step 13: आता आपल्याला आपला बँक खात्याचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल त्यामध्ये बँकेचे नाव इंग्रजी भाषेमध्ये टाका आणि इतर माहिती भरावी आणि ही सर्व माहिती परत चेक करा कारण याच बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत
Step 14: फॉर्म च्या शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्या डॉक्युमेंट ची साईज जास्तीत जास्त पाच एमबी पर्यंत असावी. तुम्हाला पुढील डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील.
- अधिवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षांच्या मतदान कार्ड यांपैकी कोणते एक
- पिवळे जेव्हा केशरी रेशन कार्ड असल्यास ते अपलोड करा किंवा उत्पन्नाचा दाखला अपलोड करावे लागेल
- रेशन कार्ड ची समोरील बाजू आणि पाठीमागचे बाजू
- अर्जदाराचे हमीपत्र
- अर्जदार फोटो
Ladki Bahin maharashtra.gov.in 2024 माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्य महिला |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन तसेच ऑफलाइन |
पहिला हप्ता | 14 ऑगस्ट, 2024 |
अर्ज करण्याची मुदत | 31 ऑगस्ट, 2024 |
अपात्रता निकष | कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे किंवा ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणे यासह इतर |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
ऑफिशियल वेबसाईट | Ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana Status @ladki bahin maharashtra gov in
वरील सर्व प्रक्रियेनंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज सबमिट केला जाईल आणि त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला परत वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे
अर्जदार लॉगिन विकल्पावरती क्लिक करून लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे तेथे तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दिसेल.
या अर्जामध्ये वरच्या बाजूला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे ते कळेल आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्हाला परत अर्ज एडिट करून सबमिट करण्याचा पर्याय देण्यात येईल आणि जर एडिट बटन दिसत नसेल तर तुम्हाला पहिल्यापासून परत नवीन अर्ज दाखल करावा लागेल.
लाडकी बहीण योजनेचे मुख्यतः चार स्टेट सरकारच्या वतीने देण्यात येतात. जेव्हा आपण आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करतो तेव्हा त्यानंतर लगेचच आपल्या अर्जावरती Pending नाव लिहून येते.
अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी in review असे स्टेटस देण्यात येते म्हणजेच आपला अर्ज अधिकाऱ्यांमार्फत तपासला जात आहे आणि लवकरच तो मंजूर किंवा रिजेक्ट केला जाऊ शकतो.
पुढे जर आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर त्यावरती Approved नावाचे स्टेटस देण्यात येते आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर Reject असे स्टेटस देण्यात येते.
तसेच काही अर्ज वरती in pending to submitted असे स्टेटस लिहून देण्यात येते म्हणजेच तुमचा अर्ज अद्याप अधिकाऱ्यांनी तपासलेला नाही पुढील काही दिवसांमध्ये आपला अर्ज अधिकारी तपासतील आणि त्यानंतर पुढील कारवाई पूर्ण होईल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा