लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहिण योजनेचे तब्बल 83% फॉर्म मंजूर, इतर योजनांचा निधी थांबवलाय?

लाडकी बहीण योजना post ला 5 स्टार रेटिंग द्या

Ladki bahin yojana form: लाडकी बहीण योजनेचे पहिले हप्ते रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येणार आहे. जवळपास एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिला यासाठी पात्र असतील आणि त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती काहीसा ताण पडू शकतो.

रक्षाबंधनाच्या दिवशीच लाडकी बहीण योजनेचे हफ्ते देण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवरती काम सुरू आहे आणि त्यामुळे दररोज बरेच फॉर्म मंजूर केले जात आहे आणि लाखो फॉर्म ची पडताळणी आतापर्यंत करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पात्र असलेल्या महिलांना Approved मेसेज पाठवण्यात येत आहे.

आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यापैकी एक कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आलेली आहे यामधील 83% अर्ज हे योग्य आहेत तर काही अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे.

परंतु लाडकी बहीण योजना सुरू असताना आणि या योजनेचा पहिला हप्ता मिळेपर्यंत इतर योजनांना काहीसा ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हफ्ते दिले जाणार
  • लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना काही काळ रखडणार असल्याची शक्यता
  • आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील एक कोटी अर्जांची पडताळणी करण्यात आली

Ladki bahin yojana form: इतर योजनांना ब्रेक लागलाय का

लाडकी बहिण योजनेची घोषणा जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा तातडीने जीआर काढण्यात आला. या योजनेचे अत्यंत जलद गतीने अंमलबजावणी करण्यात आली आणि जुलै 2024 पासून या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत.

लाडकी बहीण योजना बऱ्याच वेळेस वादाच्या भवऱ्यामध्ये सापडले आहे आणि अशा परिस्थितीत सरकारकडून वेळोवेळी ठोस पावले उचलत यातील त्रुटी दूर करण्यात आलेल्या आहे परंतु या एकाच योजनेकडे एवढे लक्ष दिल्यामुळे इतर योजनांकडे दुर्लक्ष होते की काय ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक मुळे ही योजना महत्त्वाची ठरल्याची चर्चा सुरू आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीने योजना महत्त्वपूर्ण असल्या मुळे या योजनेकडे अधिक लक्ष दिले जाते अशी टीका केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकले जातील अशी माहिती सरकारने दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आकडेवारी

  1. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 10 हजार 215 अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे
  2. एकूण अर्जापैकी एक कोटी अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे
  3. एकूण 83% पेक्षा जास्त अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत
  4. 12 हजार पेक्षा जास्त अर्ज डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत
  5. बँक खात्याची व्यवस्थित माहिती नसणे हे अर्ज रिजेक्ट करण्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे

कोणत्याही कुटुंबातील एकाच महिलेला डबल लाभ मिळणार नाही परंतु जर एखाद्या महिलेला आधीच इतर योजनेमधून पंधराशे रुपयांपेक्षा कमी राशी प्राप्त होत असेल तर एकूण फरकाची राशी सदर महिलेला दिली जाईल आणि जर 1500 पेक्षा जास्त रुपयांचा लाभ प्रत्येक महिना मिळत असेल तर मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास एक कोटी महिलांना डायरेक्ट डीबीटी पद्धतीने रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे पाठवण्याचे सरकारने ठरवले आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये ताण पडणार आहे परिणाम स्वरूप इतर काही नावीन्यपूर्ण योजनांचा निधी तसेच इतर खात्यांचा निधी काही प्रमाणात रोखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पुढे काही दिवसांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना एक मोलाची कामगिरी करेल आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिल्यानंतरच इतर विभागांना निधी वितरित केला जाईल अशी परिस्थिती आहे. परिणाम स्वरूप इतर खात्याचे मंत्री काहीसे नाराज असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईटलाभार्थी यादी
स्वयंघोषणापत्रहमीपत्र
कागदपत्रेअर्जाचे स्टेटस

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment