Ladki Bahin Yojana Portal: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मोठा गाजावाजा करून त्याची वेबसाईट आणि ॲप जारी करण्यात आले आहे. संबंधित ऑफिशियल ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण अर्ज भरू शकतो अशी माहिती सरकार मार्फत देण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्याआधी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती दोन महिन्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरले नाहीत अशा महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहे.
महत्वाचे मुद्दे:
- नारीशक्ती दूत ॲप वरती लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले जात नाहीत
- लाडकी बहिण योजनेची वेबसाईट काही दिवसांपासून बंद
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महिलांची पळापळ सुरू
- ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले अशा महिलांना अडचणीचा सामनाज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले अशा महिलांना अडचणीचा सामना
अनुक्रमणिका ↕️
No new form accepted error in ladki bahin yojana
लाडकी बहीण योजनेचे ॲप आणि वेबसाईट बंद पडले आहे त्यामुळे आता अर्ज भरायचा कसा आणि या पुढील प्रक्रिया कशी असेल याविषयीची चिंता महिलांना लागली आहे.
अर्ज भरण्याचे पोर्टल चालत नसल्यामुळे महिलांकडून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. मागील महिन्यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या अनुदानाची घोषणा केल्यानंतर या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये वेळोवेळी मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळे अधिकाधिक महिला पात्र होतील याकडे लक्ष देण्यात आले.
परंतु आता पोर्टलच चालत नसल्यामुळे अर्ज कुठे करायचा असा प्रश्न ज्या महिलांचे अर्ज राहिले आहेत अशा महिलांकडून व्यक्त होत आहे. तसेच काही अटी मुळे महिला आधीच त्रस्त झाले आहेत आणि त्यात नारीशक्ती दूत ॲप चालत नाही आणि ladki bahin yojana portal दोन-तीन दिवसांपासून बंद झाले आहे.
No New Form Accepted In Ladki Bahin Yojana 2024
रक्षाबंधनाच्या मुहूर्त वरती लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता येणार असल्यामुळे महिलांची पळापळ सुरू झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा तसेच ऑफलाईन अर्ज बद्दलची माहिती प्राप्त करत आहेत.
याचबरोबर काही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांचे अर्ज काही कारणांमुळे नामंजूर करण्यात आले अशा महिलांना परत पोर्टल वरती जाऊन संबंधित बदल करून अर्ज सबमिट करावा लागणार आहे परंतु आता पोर्टल चालत नसल्यामुळे सदर महिला त्रस्त झाल्या आहेत.
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे आणि जर पोर्टल लवकर सुरळीत चालू झाले नाही तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत अशा महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे महिलांचा लाडकी बहिण योजना विषयीचा रोष सरकारविरुद्ध वाढत आहे.
Ladki bahin yojana पुढे काय करायचे
नारीशक्ती दूत ॲप च्या माध्यमातून नवीन अर्ज स्वीकारणे बंद झाल्यानंतर लाडकी बहीण योजना वेबसाईट वरून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे परंतु हे पोर्टल मेंटेनन्स मुळे काही काळापासून बंद ठेवण्यात आले आहे.
संबंधित वेबसाईटच्या सर्व वरती अतिरिक्त जास्त लोड येत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या असल्यामुळे ही वेबसाईट काही काळासाठी सुधारणा करता बंद ठेवण्यात आलेली आहे.
जेव्हा वेबसाईट मधील सुधारणा पूर्ण होतील आणि वेबसाईट सुरळीतपणे चालू होईल तेव्हा तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता. आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्यातील एक कोटी अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली आहे.
जर तुम्ही आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.
लाडकी बहीण योजना संक्षिप्त माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | जून 2024 अर्थसंकल्प |
लाभार्थी | 21 ते 65 वर्षे वयोगटातील महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला |
योजनेचा फायदा | पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये |
अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत चालवण्यात येणारी कल्याणकारी योजना आहे. यामध्ये महिला आर्थिकीकरण करण्यासाठी आणि महिलांना काहीसा आर्थिक लाभ देण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार मार्फत प्रति महिना पंधराशे रुपयांची राशी थेट बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने पाठवण्याची सुविधा केली जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील आर्थिक स्वरूपात बिकट परिस्थिती असलेल्या महिलांना काहीसा आर्थिक लाभ मिळावा आणि त्याद्वारे त्या कुटुंबातील काहीशा गरजा पूर्ण करू शकतील. लाडकी बहिण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि कोट्यावधी महिलांनी यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
पुढील काही दिवसांमध्ये पोर्टल सुरू झाल्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया नियमित स्वरूपामध्ये पार पडेल आणि त्याद्वारे महिला आर्थिक लाभ घेऊ शकतील.
सरकारच्या वतीने यापूर्वी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली होती परंतु आता सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची मुदत ही निरंतर सुरू राहील आणि आपण नंतर अर्ज करून पण दर महिना पंधराशे रुपये प्राप्त करू शकतो आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतो.
जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारच्या वतीने वेगवेगळी पावणे उचलले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे.
लाडकी बहीण योजना माहिती
काही महत्त्वाचे प्रश्न:
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट कधी सुरू होईल?
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सध्या मेंटेनन्स साठी बंद करण्यात आलेले आहे आणि पुढील काही कालावधीमध्ये लाडकी बहिण योजनेची वेबसाईट परत पूर्ववत सुरू होईल.
माझा अर्ज रिजेक्ट झाला आहे, काय करायचे?
जर तुमचा लाडकी बहीण योजना अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला त्याचे कारण बघून त्यानुसार लाडके बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये बदल करून परत फॉर्म सबमिट करावा लागेल आणि जर एडिट करण्याचे बटन उपलब्ध नसेल तर परत फॉर्म भरावा लागेल.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी भेटेल?
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्त वरती देण्याचे राज्य सरकारने निश्चित केलेली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी लाडके बहिणी योजनेचे हफ्ते वितरित करण्यास सुरुवात केली जाईल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा