लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

ladki bahin yojana self declaration form | लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 5/5 - (1 vote)

Ladki bahin yojana self declaration form: महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाकडून स्त्रियांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत जसे की एसटी बसच्या प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, लेक लाडकी योजना इत्यादी.

महाराष्ट्रातील महिला आत्मनिर्भर व्हाव्यात आणि त्यांना आर्थिक हातभार मिळवा यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजना सुरू करत असल्याची घोषणा केली ही योजना मध्यप्रदेश राज्यामध्ये कधीपासून राबवण्यात येत आहे आणि या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

लाडकी बहीण योजनेमध्ये प्रति महिना पंधराशे रुपये देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरी वरती 46000 कोटी रुपयांचा अधिक भार पडेल परंतु महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या विकासासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे
  • या योजनेत महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद आहे
  • लाडकी बहीण योजना फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहे
  • रेशन कार्ड मुळे महाराष्ट्रातील महिला लाडकी बहीण योजनेतून वंचित राहू नये यासाठी स्वयंघोषणा पत्राची सुविधा करण्यात आलेली आहे

Ladki bahin Yojana update

लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहे म्हणजेच जेव्हा प्रथम शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता तेव्हा त्यामध्ये फक्त 15 दिवसांमध्येच अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर सदर योजना वादाच्या भवऱ्यात अडकली होती त्यामुळेच सरकारकडून नंतर सुधारित जीआर काढण्यात आला आणि त्यामध्ये या योजनेची मुदतवाढ करण्यात आली आणि आणखीन सात महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आले जसे की शेतीची अट काढून टाकण्यात आली आणि कुटुंबातील अविवाहित मुलीला देखील अटी आणि नियमन मध्ये बसत असेल तर लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली. वाचा संपूर्ण माहितीलाडकी बहीण योजनेचा सुधारित जीआर, सात मोठे बदल

Ladki bahin yojana self declaration form

लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी एक मोठी अडचण समोर आलेली होती बऱ्याच महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये अद्याप नोंदणीकृत करण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळे सदर महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो की नाही याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला होता आणि कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पळापळी करावा लागत होती.

बऱ्याच महिलांकडे डोमासाईल सर्टिफिकेट उपलब्ध नव्हते आणि त्यासाठी सरकारकडून १५ वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही दस्तावेज मंजूर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली तसेच बऱ्याच महिलांना उत्पन्नाचा दाखला मध्ये समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ज्या महिलांच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांच्या कुटुंबाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही परंतु बऱ्याच महिलांचे नाव अद्याप रेशन कार्ड मध्ये नोंदणी कृत करण्यात आलेले नाही अशा महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सुविधा काढण्यात आलेले आहे. सदर महिला सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वयंघोषणापत्र तयार करून पण या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकते.

Ladki bahin yojana self certification

self certificate scaled
लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र डाऊनलोडयेथे क्लिक करा
लाडकी बहीण योजना हमीपत्रयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना ॲपऑनलाइन ॲप
संकेतस्थळलाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा म्हटला तर नारीशक्ती ॲप च्या माध्यमातून हा अर्ज करता येऊ शकतो परंतु ही योजना नवीन असल्यामुळे आणि पोर्टल वरती जास्त लोक एकाच वेळी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया करत असल्यामुळे ॲप व्यवस्थित पद्धतीने चालत नाही आणि त्यामध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे सध्या अंगणवाडी सेविकाकडे ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरणे एक सोपी आणि बिना अडचणीची पद्धत आहे.

तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होत आहेत खाली कमेंट करून कळवा.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

5 thoughts on “ladki bahin yojana self declaration form | लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र”

    • जर तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज बाद झालेला असेल आणि त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला मागत असेल तर तुम्हाला तो सबमिट करावा लागेल.

      उत्तर

Leave a Comment