Mazi Ladki Bahin Yojana Status Check Online: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे महिलांना प्रति महिना 1500 रुपये राशी डीबीटी पद्धतीने बँक खात्यामध्ये टाकली जाणार आहे.
लाडकी बहिण योजनेचे अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि आता लाडकी बहिण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे तसेच अर्जांचे स्टेटस बदलण्यात येत आहे. काही लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारले जात आहेत तर काही महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत.
लवकरच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे आणि त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया जलदरीत्या सुरू आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरच अर्जाचे स्टेटस बघावे लागेल आणि अर्ज बाद झालेला असेल तर आवश्यकतेनुसार त्यात बदल करावे लागतील.
महत्त्वपूर्ण मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेचे स्टेटस बदलण्यास सुरुवात झाली आहे
- वेगवेगळ्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे स्टेटस बघता येऊ शकतात
- ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने ladki bahin yojana status चेक करता येईल
- जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आवश्यकतेनुसार त्यात बदल करून परत सबमिट करावा लागेल
- लाडकी बहीण योजना पहिला हप्ता मिळण्यासाठी आवश्यक
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana Status Check Online
माझी लाडकी बहीण योजना स्टेटस हे 4 पद्धतीने बघितले जाऊ शकते. ज्यामध्ये नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून, ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून, लाभार्थी यादी पीडीएफ स्वरूपामध्ये तसेच इतर माध्यमांद्वारे Mazi Ladki Bahin Yojana Status Check Online बघितले जाऊ शकते.
Method 1: नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना स्टेटस चेक
- सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घ्या
- लॉगिन करण्यासाठी प्रथम मोबाईल नंबर टाका
- आपल्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो भरा
- व्यवस्थित कॅपच्या भरून लॉगिन करा
- यापूर्वी केलेले अर्ज विकल्पावरती क्लिक करा
- तुमच्यासमोर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल
- वरील उजव्या बाजूला तुमच्या अर्जाचे स्टेटस बघता येईल
- खाली दिलेल्या पद्धतीनुसार अर्जाचे स्टेटस जाणून घ्या
Method 2: ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना स्टेटस चेक
- सर्वात प्रथम लाडकी बहिण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडा – ladki bahin.maharastra.gov.in
- मुख्य पानावरती अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावरती क्लिक करा
- एक नवीन पेज उघडेल ज्या वरती एक फॉर्म आहे त्यामध्ये मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करा
- जर कॅपच्या नीट लोड होत नसेल तर खालील Refresh बटनावरती क्लिक करा
- तसेच जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर forgot password विकल्प वरती क्लिक करा आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो टाकून पासवर्ड बदला
- लाडकी बहीण वेबसाईट वरती लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जांमध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता
Method 3: लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पीडीएफ मधून स्टेटस चेक
लाडकी बहीण योजनेचे पीडीएफ स्वरूपातून स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जिल्ह्याच्या मुनिसिपल ऑपरेशनच्या वेबसाईट वरती जावे लागेल त्यासाठी तुम्ही गुगलमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावाबरोबर municipal corporation टाकून सर्च करा.
मुन्सिपल कॉपरेशनची वेबसाईट उघडल्यानंतर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा विकल्प शोधा. तेथून तुम्ही तुमच्या वॉर्ड नुसार लाडकी बहीण योजनेची पीडीएफ डाउनलोड करू शकता.
जर लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि जर तुमचे नाव पीडीएफ मध्ये नसेल तर अद्याप तुम्ही पात्र झालेला नाहीत. महाराष्ट्र मधील फक्त काही जिल्ह्यांच्याच मुनिसिपल कॉपरेशनच्या वेबसाईट मध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
Method 4: इतर माध्यमातून द्वारे लाडकी बहीण योजना ऑनलाइन स्टेटस चेक
जर तुमचा लाडकी बहिण योजनेचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर तुमच्या मोबाईल वरती तुमच्या फॉर्मच्या क्रमांकासह Approved नावाचा मेसेज पाठवण्यात येतो तसेच जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तरीपण तुमच्या मोबाईल वरती मेसेज पाठवण्यात येतो.
परंतु कधी कधी सर्वरच्या प्रॉब्लेम मुळे किंवा इतर कारणांमुळे तुमच्या मोबाईल वरती मेसेज पडण्यास विलंब होऊ शकतो किंवा मेसेज पडणार नाही म्हणून ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे स्टेटस चेक करणे उपयोगी ठरते.
याचबरोबर काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुमच्या ग्रामपंचायतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही संबंधित या तिचा उपयोग करून तुमचा फॉर्म reject झाला की स्वीकारला गेला हे चेक करू शकता.
Ladki bahin yojana form status: ladki bahin maharashtra gov in 2024
लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मचे विविध स्टेटस उपलब्ध आहेत. यामध्ये एसएमएस व्हेरिफिकेशन तसेच फॉर्म स्वीकार आणि रिजेक्ट नुसार लाडकी बहीण योजनेचे स्टेटस निर्धारित करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील प्रमाणे अर्जाचे स्टेटस देण्यात येतात त्यामुळे वरील प्रक्रियेनुसार तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्या आणि त्यानंतर तुमचा फॉर्म स्टेटस जाणून घेऊन त्यावरती आवश्यकतेनुसार बदल करा.
- Ladki Bahin Yojana form Approved
- Ladki bahin yojana SMS verification pending
- Ladki bahin yojana In pending to submitted
- Ladki bahin yojana This survey rejected
- Ladki bahin yojana form disapproved with edit option
- Ladki bahin yojana form in review
वरील प्रमाणे सहा प्रकारचे मेसेज लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती तुम्हाला बघायला मिळतील. या प्रत्येक फॉर्म स्टेटस चा अर्थ वेगवेगळा होतो आणि तुम्हाला त्यानुसारच तुमच्या form बदल करून गरज पडल्यास परत अप्लाय करावा लागेल.
वरीलपैकी जर पहिले दोन विकल्प मधील मेसेज तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये दाखवत असतील तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचे बहीण बहीण योजनेचे फॉर्म स्वीकारण्यात आलेले आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे.
परंतु तिसरा क्रमांकाचा विकल्प आणि त्यापासूनचे पुढील मेसेज तुमच्या डॅशबोर्ड वरती दाखवण्यात येत असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये बदल करून परत फॉर्म सबमिट करावे लागेल.
वाचा संपूर्ण माहिती : लाडकी बहीण योजना फॉर्म स्टेटस
Majhi Ladki Bahin Yojana Status Check
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिला |
लाभ | प्रति महिना 1500 रुपये डीबीटी पद्धतीने |
योजनेची सुरुवात | 1 जुलै 2024 पासून |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे स्टेटस चेक करण्याची पद्धती | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
योजनेचा पहिला हप्ता दिनांक | 14 ऑगस्ट 2024 |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharastra.gov.in |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच जुलै 2024 पासून या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
सध्या अर्ज करण्याची शेवटचे दिनांक 31 ऑगस्ट 2024 निर्धारित करण्यात आलेले आहे आणि या कालावधीपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि महिला फक्त चूल आणि मूल पर्यंत निर्धारित न राहता आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी ही योजना काम करेल.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यासाठी काही आर्थिक निकष ठेवण्यात आलेले आहेत तसेच काही नियम आणि अटीपण ठेवण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी प्रतिसाद मिळत आहे आणि जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेतील असा अंदाज लावण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या अगोदर मध्य प्रदेश राज्यामध्ये पण अशीच एक योजना राबविण्यात येत आहे जिला लाडली बहना योजना असे संबोधण्यात आलेले आहे.
अलीकडच्या काळामध्ये झारखंड राज्यामध्ये मैया सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महिलांना 1000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची पद्धती
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून यासाठीचा अर्ज दाखल करू शकता.
ऑफिशियल वेबसाइटच्या मुख्य पानावरती अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली साइन अप नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला योग्य माहिती भरायचे आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे.
पुढे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्याचा विकल्प देण्यात येईल ज्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे काही डॉक्युमेंट ला दोन्ही बाजू अपलोड करणे गरजेचे ठरते जसे की रेशन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी
योग्य पद्धतीने फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर तुम्ही काही दिवसांनतर वरती दिलेल्या पद्धतीने प्रमाणे तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता आणि गरज पडल्यामुळे त्यामध्ये बदल करून परत फॉर्म सबमिट करू शकता.
महत्वाचे प्रश्न:
लाडकी बहीण एक योजनेच्या फॉर्म ची शेवटची तारीख काय आहे?
लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म ची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे असा या पूर्वी शासन निर्णय काढण्यात आलेला होता परंतु आता त्यामध्ये बदल करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया निरंतर असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
परराज्यातील महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असतील का?
जर दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्र राज्यातील मूळ निवासी पुरुषाशी लग्न केलेले असे तर संबंधित महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल परंतु सदर महिलेला आवश्यक दस्तावेज प्रस्तुत करावे लागतील.
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळेल?
लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट 2024 मध्ये मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्याचे घोषित केलेले आहे.
तुमच्या लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्मचे काय स्टेटस आहे तसेच तुम्ही अर्ज केला आहे का हे खाली कमेंटच्या माध्यमातून कळवा
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा