ladki bahin yojana third installment date: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले आहे आणि या योजनेमध्ये 90 लाख पेक्षा जास्त महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये प्राप्त झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता अनुक्रमे 14 ऑगस्ट 2024 आणि 28 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्यात आला परंतु राज्यात अद्याप अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही.
राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता प्राप्त करायचा असेल तर या संदर्भातील महत्त्वाच्या तारखा तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत.
महत्त्वाचे मुद्दे:
- 90 लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता प्राप्त
- ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता हप्तांतरीत
- लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार यासाठी महिलांना प्रतीक्षा
अनुक्रमणिका ↕️
ladki bahin yojana 2024 overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
मुख्य लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन अंगणवाडी सेविकाकडे |
योजनेचे एकूण बजेट | 45000 करोड |
पहिला हप्ता | 14 ऑगस्ट 2024 |
दुसरा हप्ता | 28 ऑगस्ट 2024 |
लाभार्थी यादी | जिल्हा निहाय लाभार्थी यादी |
तिसऱ्या हप्त्यात किती पैसे मिळणार
जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये प्राप्त झालेले असतील तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल याचबरोबर जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्यातील 4500 रुपये प्राप्त होतील.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील; Ladki Bahin Yojana Third Installment Date
लाडकी बहीण योजनेमध्ये विविध गैरव्यवहार आढळून आलेले आहेत आणि काही पुरुषांनी महिलांचे आधार कार्ड वापरून या योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे त्यामुळेच सरकारने ऑनलाईन अर्ज बंद करून ऑफलाइन फक्त अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरण्यास परवानगी दिलेली आहे.
सध्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार रोखण्याचे आणि यातील बनावट लाभार्थी शोधण्याचे काम चालू आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे.
परंतु ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 3000 हजार रुपयांचा हफ्ता मिळालेला आहे किंवा ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला असून त्यांना अजून लाभ मिळालेला नाही अशा महिलांना 22 सप्टेंबर 2024 पर्यंत हा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावरती पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एसएमएसच्या स्वरूपामध्ये माहिती पाठवली जाईल. तसेच तर तुम्हाला नवीन अर्ज दाखल करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागतील.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
आधार कार्ड शाळेचा दाखला पासबुक
साहेब 26 जुलै ला फॉर्म भरला आहे एप्रिल झाला आहे पण अजून पैसे आले नाही ही विनंती आहे साहेब जय महाराष्ट्र
mi aadhar अपडेट केल आधार लिंक केल तरी 1रु pn nahi aala