महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आले आणि त्यामध्ये एक करोड पेक्षा जास्त महिलांना 3 हजार रुपयांचा लाभ मिळाला.
प्रथम 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आणि त्यानंतर 28 ऑगस्ट नंतर दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता तिसरा हप्ता देण्यात येणार आहे ज्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 4500 देण्यात येतील.
त्या महिलांना अद्याप तीन हजार रुपयांचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 4500 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून एसएमएस पाठवण्यात येत आहे आणि लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्गीत करण्यात येत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये वितरित होण्यास सुरुवात
- महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज सुरू
- 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान बँक खात्यावर पैसे टाकले जातील
- ज्या महिलांना 3000 रुपयांचा लाभ मिळालेला नाही त्यांना 4500 रुपये मिळतील आणि त्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ होईल
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संक्षिप्त माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
सुरुवात | 28 जून 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशन |
अर्ज करण्याची पद्धती | ऑफलाइन, अंगणवाडी सेविकाकडे |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | 30 सप्टेंबर 2024 |
उद्दिष्ट | महिला सक्षमीकरण आणि आर्थिक मदत |
राज्य | महाराष्ट्र |
मुख्य लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
यादी | जिल्हा नुसार यादी |
अधिकृत संकेतस्थळ | ऑफिशियल वेबसाईट |
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता (Ladki bahin yojana 3rd installment)
ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु त्यांना आतापर्यंत लाभ प्राप्त झालेला नाही अशा सर्व महिलांसाठी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 वितरित केले जाणार आहेत आणि यासाठी शासनाच्या वतीने 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर च्या दरम्यान हा निधी वितरित केला जाणार आहे. सदर निधी वितरित करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.
तसेच ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशा महिलांसाठी सप्टेंबर महिन्याचे एकूण पंधराशे रुपये वितरित करण्यात येतील.
महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे तसेच उर्वरित महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ प्राप्त होईल असे शासकीय प्रणाली मार्फत नमूद करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपले अर्ज जिल्हास्तरावरती मंजूर असले पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपले आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत लिंक असावे आणि बँक अकाउंट चालू असावे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी लाभ वितरण सोहळा सोलापूर येथे 14 सप्टेंबर 2024 रोजी पार पडणार आहे आणि त्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
जर तुमच्या मोबाईल वरती आतापर्यंत लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला पुढील काही दिवस वाट बघावा लागू शकतो कारण यासाठी 19 सप्टेंबर 2024 पर्यंत पैसे वितरित करण्याची तारीख देण्यात आलेली आहे.
तसेच जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला तो अंगणवाडी सेविकाकडे सादर करावा लागेल शासनामार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत होणाऱ्या गैर व्यवहाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करायचा असेल तर ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमांचा उपयोग करता येत होता. परंतु आता लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक गैरव्यवहार उघडकीस आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत शासनाकडून फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
हमीपत्र | ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकाकडे देण्यासाठी |
स्वयंघोषणापत्र (उत्पन्नाचा दाखला नसल्यास) | लाभार्थी यादी |
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा