लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहिण योजनेत हे 7 मोठे बदल, अधिक महिलांना मिळणार योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 1/5 - (1 vote)

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली महिलांसाठी असलेली ही योजना खूपच चर्चेचा विषय बनलेले आहे कारण या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे परंतु या योजनेमध्ये बऱ्याच अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे विरोधकांकडून ही योजना जास्त यशस्वी होणार नाही किंवा या योजनेचा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही अशी टीका करण्यात आलेली होती

मागील काही दिवसांपासून सेतू कार्यालय तसेच तहसील कार्यालय बाहेर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. आणि शासनाच्या परिपत्रकानुसार फक्त पंधराच दिवस अर्ज चालू असेल अशी देण्यात आलेली होती त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण होते अशा सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत ज्या अंतर्गत अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडू शकेल.

Ladki bahin yojana update: लाडकी बहीण योजनेत मोठे बदल

लाडकी बहीण योजनेमध्ये सात मुख्य बदल करण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर लगेचच त्याचे शासकीय परिपत्रक जाहीर करण्यात आलेले होते परंतु त्या परिपत्रकानुसार माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा म्हटला तर महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार होते आणि त्यामुळे या योजनेमध्ये काही शितीलता यावी किंवा बदल व्हावेत अशी महिलांची इच्छा होती.

सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधन करत असताना या योजनेमध्ये बदल करत असल्याची माहिती दिली या योजनेमध्ये एकूण सात बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये शेती, उत्पन्न तसेच इतर महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे जेणेकरून महाराष्ट्रातील बऱ्याच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

अर्ज करण्याच्या कालावधीत बदल

लाडकी बहीण योजनेपुढे सर्वात मोठे आव्हान म्हणजे पंधरा दिवसांमध्ये फॉर्म भरून द्यायचा होता आणि बऱ्याच महिलांकडे सध्या डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत किंवा डॉक्युमेंट काढण्यासाठी बराच वेळ लागत असल्यामुळे त्या कालावधीमध्ये संबंधित फॉर्म प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी होती म्हणूनच सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ करण्यात आलेली आहे आणि आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिला अर्ज दाखल करू शकतील.

जर एखाद्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आवेदन पाठवले आणि महिलेचा अर्ज स्वीकार झाला तर त्या महिलेला जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचा लाडके बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँक खात्यात पाठवला जाईल.

ओळख प्रमाणपत्रात बदल

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे होते आणि बऱ्याच महिलांकडे हे कागदपत्रे काढलेले नव्हते त्यामुळे आता यामध्ये बदल करून जर तुमच्याकडे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यांपैकी कोणतेही दस्तावेज असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने अर्ज दाखल करू शकता.

शेतीची अट मध्ये बदलाव

माझी लाडकी बहिण योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे अशी अट ठेवण्यात आलेली होती परंतु ग्रामीण भागामध्ये बऱ्याच कुटुंबियांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार होते परंतु आता शेतीची अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता कोणतीही शेतीची अट ठेवण्यात आलेली नाही म्हणजेच कमाल पाच एकर शेतीची अट काढून टाकण्यात आलेली आहे.

नवीन वयोगट जाहीर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधी 21 ते 60 वर्ष वयोगटाची अट ठेवण्यात आलेली होती परंतु आता नवीन वयोगट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आता जुन्या वयोगटामध्ये काहीशी शीतलता देऊन 21 ते 60 वर्ष वयोगट निर्धारित करण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण पाच वर्ष वयाची शितिलता देण्यात आलेली आहे त्यामुळे अधिकाधिक महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतील.

परराज्यातील महिलांना लाभ

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांनी आधी पर राज्यात राहत असताना आता महाराष्ट्र राज्यात लग्न करून आलेल्या आहेत अशा महिलांना लाभ देण्याचे कोणतेही माहिती प्रसारित करण्यात आलेली नव्हती परंतु आता परराज्यातील महिला ज्यांनी महाराष्ट्र मध्ये राहत असलेल्या पुरुषाबरोबर लग्न केलेले आहे अशा महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेमध्ये अशा पद्धतीने लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेकडे पतीचे डोमासाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे.

उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असेल तर त्यासाठी अडीच लाख रुपयांची कमाल उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली होती परंतु आता या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ज्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा दाखला नाही परंतु पिवळे किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड आहे असे व्यक्ती पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना उत्पन्न प्रमाणपत्रांमधून सुट देण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही केशरी किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

पात्र अविवाहित महिलेला लाभ

जर एका कुटुंबामध्ये दोन महिला असतील आणि त्या या योजनेसाठी पात्र असतील तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजेच कुटुंबातील दोन महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याचबरोबर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देता येईल.

महाराष्ट्राच्या अगोदर मध्यप्रदेश राज्यांमध्ये देखील लाडली बहना योजना या नावाने अशाच प्रकारचे एक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अट म्हणजे महिलांचे वय 21 ते 60 वर्ष असावे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे आणि महिला मध्यप्रदेशचे रहिवासी असावी असे निकष ठेवण्यात आले होते वरील योजनेचा मध्यप्रदेश राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद बघायला मिळालेला आहे आणि तसाच प्रतिसाद महाराष्ट्र राज्यात बघायला मिळेल का किंवा या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात कशाप्रकारे होईल हे बघणे गरजेचे ठरते.

तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे की नाही ते खाली आम्हाला कमेंट करून कळवा

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment