जर तुमचा लाडकी बहीण योजना फॉर्म भरत असताना Ladki Bahin Yojana Village Level Pending असे स्टेटस दाखवत असेल तर आपण अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे या विषयाची सर्व माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana Village Level Pending म्हणजेच आपला लाडकी बहिण योजनेचा अर्ज ग्रामीण पातळीवरती चेक करण्यात आलेला नाही परंतु जेव्हा आपण आपले स्टेटस चेक करतो तेव्हा तेथे आपल्याला District Level Approved असा मेसेज दिसत असेल तर आपला अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर करण्यात आलेला आहे परंतु ग्रामीण पातळीवरती अद्याप हा अर्ज चेक करण्यात आलेला नाही.
जर तुम्ही लाडकी बहीण योजना वेबसाईटवरून अर्ज दाखल केलेला असेल तर तिथे तुम्हाला village level pending नावाचे स्टेटस दाखवण्यात येते.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयीची सर्व माहिती एकाच स्थळावरती प्राप्त करायचे असेल तर तुम्ही ladki bahin yojana ला भेट देऊ शकता.
महत्त्वाचे मुद्दे:
- जेव्हा आपल्या अर्ज ग्रामीण पातळीवरती तपासण्यात आलेला नसतो तेव्हा village level pending असा मेसेज दाखवण्यात देतो
- जर आपला अर्ज sub ward लेवल मध्ये चेक केलेला नसेल तर तिथे Sub ward level pending असे स्टेटस दाखवण्यात येते
- परंतु जर आपला अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर असेल आणि यापूर्वी केलेले अर्ज पर्यायांमध्ये हिरव्या रंगात Approved संदेश दाखवत असेल तर आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana Village Level Pending
Ladki Bahin Yojana Village Level Pending असे स्टेटस आपल्या अर्जामध्ये दाखवत असेल तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आणि जर आपला अर्ज District Level मध्ये Approved दाखवत आहे परंतु Village Level Pending दाखवत आहे तर अशा वेळेस आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्यावे लागेल त्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज पर्यायांमध्ये जायचे आहे आणि तिथे आपला अर्ज Approved दाखवत आहे की Reject दाखवत आहे हे चेक करा.
जर आपला अर्ज हिरव्या रंगांमध्ये Approved संदेश दाखवत असेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे परंतु जर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज मध्ये Application Status हे Reject दाखवत असेल तर आपल्याला डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करून आपला अर्ज कशामुळे रिजेक्ट झाला हे चेक करावे लागेल.
आपल्या अर्जाच्या बाद होण्याच्या कारणाची माहिती तिथे देण्यात आलेली असेल आणि त्याचबरोबर तो अर्ज कोणत्या पातळीवरती रिजेक्ट झालेला आहेत हे देखील समजेल आणि जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तो अर्ज कोणत्या अधिकाऱ्याने मंजूर केलेला आहे हे आपल्याला कळू शकेल.
Ladki Bahin Yojana Village Level Pending कसे चेक करायचे?
- लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जा
- मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
- यापूर्वी केलेले अर्ज पर्यायावर क्लिक करा
- थोडे उजवीकडे स्क्रोल करून डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा
- आपला लाडकी बहीण योजना अर्ज उघडेल
- स्क्रोल करत सर्वात खाली या
- तिथे आपला अर्ज Village Level Pending आहे की नाही ते चेक करता येईल
Ladki Bahin Yojana Village Level Pending नंतर बँकेत पैसे येण्यासाठी काय करायचे?
जर आपला अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर करण्यात आलेला असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे परंतु त्यापूर्वी आपल्याला आपले आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक आहे की नाही ते चेक करावे लागेल आणि त्यानंतर आपल्या कोणकोणत्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे हे बघावे लागेल.
जर तुम्ही आत्तापर्यंत आपले आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक केलेले नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने NPCI आणि आधार वेबसाईट च्या माध्यमातून आपले आधार लिंकिंग स्टेटस जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही पुढील लेख वाचू शकता.
हे पण वाचा: ऑनलाइन आधार कार्ड – बँक लिंक चेक करण्याची पद्धत
आपण अर्ज करत असताना जे बँक अकाउंट दिलेले आहे त्याच बँक अकाउंट वरती पैसे येतील याची पूर्णतः खात्री देण्यात येत नाही कारण सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड डाटाबेसनुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पाठवले जात आहेत.
म्हणजेच जर एखाद्या महिलेचे दोन बँक अकाउंट असतील आणि सदर महिलेने एका बँक अकाउंट चे डिटेल्स लाडकी बहीण योजना पोर्टल वरती सबमिट केलेले असतील आणि दोन्ही अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर सदर महिलेला दोन्हीपैकी कोणत्याही एका बँक अकाउंट वरती पैसे येऊ शकतात.
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणि लाभ प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत आहेत का खाली कमेंटच्या माध्यमातून कळवा
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
मजा फॉम रिजेक्ट झाला
जर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला असेल तर त्यामध्ये सांगण्यात आलेल्या सुधारणा नुसार तुम्ही तुमच्या अर्जात बदल करून परत अर्ज सबमिट करू शकाल.
majha approved aahe pan sub-ward-level pending aahe 2.09.2024 pasun.
village level pending dakhavat ahe