Ladki Bahin Yojana Website: महाराष्ट्र शासनामार्फत लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सरकारकडून नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत होते परंतु नारीशक्ती दूत ॲप वरती सर्वर प्रॉब्लेम आणि इतर प्रॉब्लेम मुळे बऱ्याच वेळेस अर्ज स्वीकारला जात नव्हता किंवा त्या अर्जाची नीट पुढे परताळणी करता येत नव्हती.
या सर्व समस्या लक्षात घेता सरकारच्या माध्यमातून आता नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता जर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हाला वेबसाईट च्या माध्यमातूनच अर्ज दाखल करावा लागेल.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेसाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता तसेच तुमचा अर्ज केलेला असेल तर त्याची स्थिती जाणून घेऊ शकता आणि गरज पडल्यास त्यामध्ये एडिट करून परत अर्ज करू शकता.
महत्त्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी ऑफिशियल संकेतस्थळ जाहीर
- फक्त वेबसाईटच्या माध्यमातून नवीन अर्ज करता येणार
- वेबसाईट वरती लॉगिन करून अर्जाची स्थिती तपसता येईल
- अर्ज मंजूर झालेला आहे की नाही वेबसाईट वरतीच कळेल
अनुक्रमणिका ↕️
Ladki bahin maharashtra gov in 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
विभाग | महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन |
योजनेचे उद्दिष्ट | महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी करण्यासाठी चालना देणे |
लाभ | प्रति महिना 1500/- रुपये |
योजनेची सुरुवात | जुलै 2024 |
ऑनलाइन अर्जाची सुरुवात | 1 जुलै, 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
उत्पन्न मर्यादा | अडीच लाख रुपये |
पहिल्या हप्त्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 पासून पुढे |
वय मर्यादा | 18 ते 65 वर्षे |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana Website Maharashtra
महाराष्ट्र शासनामार्फत लाडकी बहिण योजनेसाठी ladakibahin maharashtra.gov.in ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला Ladaki bahin maharashtra gov in वेबसाईटच्या माध्यमातूनच अर्ज दाखल करावा लागेल.
तसेच जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला असेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे बघायचे असेल तरी पण लाडकी बहिणी योजनेची ऑफिशियल वेबसाईट – ladakibahin.maharashtra.gov.in तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
लाडकी बहीण योजनेच्या मुख्य पानावरती तुम्हाला पोर्टल वरती प्राप्त झालेले अर्ज, एकूण मंजूर झालेले अर्ज आणि लाभार्थी संस्था दर्शविण्यात येते. तसेच वरच्या बाजूला मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉगिन नावाचे विकल्प देण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा माहितीपट होम पेज वरती देण्यात आलेला आहे यावरती आपण क्लिक करून लाडकी बहीण योजनेची व्हिडिओ बघू शकता.
तसेच आणखी थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर पात्रता निकष, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया विषयीची माहिती देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची आवश्यक माहिती लाडकी बहीण योजना वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे.
सर्वात खाली ही योजना महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयांतर्गत सुरू असल्यामुळे संबंधित मंत्रालयाचा पत्ता देण्यात आलेला आहे.
हे पण वाचा: PM Mudra Loan Yojana, घरबसल्या दहा लाखापर्यंत कर्ज
Ladki bahin maharashtra gov in portal login
Ladki Bahin Maharashtra Gov In वेबसाईटच्या होम पेज मेनू मध्ये अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे ज्यावरती क्लिक करून आपण लॉगिन करू शकता.
लॉगिन पर्याय वरती क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे एक फॉर्म उघडला जाईल ज्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि व्यवस्थित कॅपच्या भरून लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे आणि जर तुमच्या वेबसाईट मध्ये कॅपच्या व्यवस्थित लोड झालेल्या नसेल तर तुम्ही रिफ्रेश बटणावरती क्लिक करू शकता.
जर तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड नावाच्या विकल्प वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल व्यवस्थित मोबाईल नंबर भरा आणि कॅपच्या भरून सबमिट करा. तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाका आणि नवीन पासवर्ड दोन वेळा दिलेल्या रकान्यांमध्ये टाका.
लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता तसेच तुमचे प्रोफाईल पूर्ण नसेल तर ते पूर्ण करू शकता आणि ऑनलाईन फॉर्म एडिट करून परत सबमिट करू शकता.
Ladki bahin maharashtra gov in sign up
लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून अर्जदार लॉगिन विकल्पावरती क्लिक केल्यानंतर लॉगिन अर्ज उघडतो परंतु आपण अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले नसेल तर आपल्याला साईन अप करावे लागते त्यासाठी Ladaki bahin maharashtra gov in वेबसाईटवर अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
प्रथम अर्जदार लॉगिन विकल्पावरती क्लिक करा आणि त्यानंतर Doesn’t have account Create account नावाच्या विकल्पावरती क्लिक करा तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म उघडेल.
फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड नुसार नाव, मोबाईल नंबर, दोन वेळा पासवर्ड, जिल्हा, तालुका, तसेच गाव, मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि इतर महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर कॅपच्या भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो टाका.
आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासोबत हमीपत्र, वेळ पडल्यास स्वयंघोषणापत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील तसेच बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल.
Ladki Bahin Maharashtra Government in
लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला की त्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर आपला अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे बघावे लागते आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला त्यामध्ये परत बदल करून पुन्हा सबमिट करावा लागेल तेव्हा आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल.
तसेच जर तुमचा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजूर झालेला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही ते चेक करणे महत्त्वाचे आहे जर तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येईल आणि पैसे तुमच्या खात्यावरची पाठवण्यात येतील.
माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दीष्ट
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना काही राशी प्रदान केले जाते तिच्या मदतीने सदर महिला आपले मासिक खर्च चालवू शकतील तसेच आपल्या घरामध्ये हातभार लावू शकतील. महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 List
जर तुम्हाला लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन लाभार्थी यादी बघायची असेल तर तुम्ही नारीशक्ती दूत ॲप चा उपयोग करू शकता तसेच ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून पण तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही ते चेक करू शकता.
जर तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि जरी मोबाईल वरती एसएमएस आला नाही तरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन लाभार्थी यादी चेक करू शकता.
जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरला असेल म्हणजे पोस्ट ऑफिस किंवा अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरला असेल तर तुम्हाला संबंधित व्यक्तीला भेटावे लागेल आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी लागेल. जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर काळजी करण्याचे कारण नाही परंतु जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यामध्ये बदल करून परत सबमिट करावा लागतो.
तुमचा फॉर्म परत सबमिट करण्यासाठी तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला असेल तर संबंधित सरकारी कार्यालयातूनच तो फॉर्म परत सबमिट करून घ्यावा आणि जर तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म एडिट करून सबमिट करावा.
Ladki Bahin Maharashtra Gov In Form Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वरती तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. घरबसल्या तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल यामुळे तुमच्या वेळ आणि पैशांची बचत होईल आणि कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जावे लागणार नाही.
लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहीण योजना वेबसाईटच्या मुख्य पानावरती जायचे आहे आणि त्यावरती अर्जदार लॉगिन नावाच्या विकल्पावरती क्लिक करायचे आहे.
तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन करा त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन स्क्रीन उघडेल. ज्या वेब पेजच्या मेनू बारमध्ये “यापूर्वी केलेले अर्ज” नावाचा विकल्प आहे त्यावर क्लिक करा.
तुमच्या पुढे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊन शकाल. जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुमच्या अर्जामध्ये एडिट बटन देण्यात येईल ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अर्जामध्ये बदल करून परत सबमिट करू शकता.
परंतु जर तुमच्या लाडकी बहीण योजना अर्ज मध्ये एडिट बटन उपलब्ध नसेल आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज पहिल्यापासून परत करावा लागेल.
जेव्हा तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर केला जातो तेव्हा तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती मेसेज पाठवला जातो आणि त्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर आहे अशा आशयाचा मेसेज असतो तसेच जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तरी पण मोबाईल वरती मेसेज पाठवण्यात येत असतो. म्हणूनच लाडकी बहीण योजना अर्ज करत असताना आपला रजिस्टर मोबाईल नंबर चालू असणे गरजेचे आहे.
Ladki Bahin maharashtra.gov.in Form Status Information
Approved- तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल
Approved SMS verification pending: तुमच्या मोबाईल नंबरची स्थिती अद्याप चेक करण्यात आलेली नाही परंतु तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभ मिळू शकतो.
Pending status: म्हणजेच तुमच्या अर्जाची अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जाची स्थिती बदलली जाईल.
In review status: तुमच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे आणि लवकरच अधिकाऱ्यांमार्फत तुमचा अर्ज मंजूर किंवा बाद केला जाईल
Rejected status: तुमचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. जर तुमच्या अर्जामध्ये एडिट बटन देण्यात आलेली असेल तर तुम्हाला अर्ज परत बदल करून सबमिट करता येईल आणि जर एडिट बटन नसेल तर पहिल्यापासून नवीन अर्ज करावा लागेल.
Ladki Bahin Yojana Address
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वापरताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत का किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट करून कळवा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
Form rejected zala ahe ani edit pan yet nahi. navin form bharnyasathi gele tar application already submitted ase yet ahe Kay karave
every thing is proper but couldn’t received my amount . not satisfied with their job at all.its their responsibility to check that every women has got their money
i have submitted the form but still i have not received any confirmation and amount also not credited. I just want to know status about my application and want to know the reason behind that even my application is approved.
लाडकी बहीण योजना वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in मध्ये लॉगिन करून यापूर्वी केलेले अर्ज विकल्प मध्ये तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस आणि इतर माहिती प्राप्त करू शकाल.