Mazi ladki bahin yojana document: लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे त्यामध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वर्षाला 3 गॅस सिलेंडर पण मोफत देण्यात येणार आहेत.
या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत 28 जून 2024 रोजी करण्यात आली याचबरोबर त्यांनी या योजनेची घोषणा करत असताना महिला सक्षमीकरणासाठी विविध अन्य योजना बद्दलची पण माहिती दिली जसे की लेक लाडकी योजना, उज्वला योजना इत्यादी.
महाराष्ट्राच्या अगोदर मध्यप्रदेश राज्यामध्ये पण महिलांना मोफत रोख रक्कम प्रति महिना देण्याची स्कीम चालू आहे त्यामध्ये महिलांना 1250 रुपये प्रति महिना दिले जातात आणि या योजनेला मध्य प्रदेश मध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणूनच महाराष्ट्र मध्ये पण वाढीव रकमेसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले आहे.
जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या Ladki Bahin Yojana Documents ची माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तसेच तुम्ही कोणत्या प्रकारे अर्ज दाखल करू शकता हे पण तुम्ही जाणून घेतले पाहिजे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण लाडकी बहीण योजना डॉक्युमेंट जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका ↕️
Mazi Ladki Bahin Yojana Documents / आवश्यक कागदपत्रे
- माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म
- लाभार्थी आधार कार्ड
- सदर महिलेचे बँक पासबुक
- महाराष्ट्र राज्य रहिवासी प्रमाणपत्र / महाराष्ट्र जन्म दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट size फोटो
- अटी शर्ती पालन करणारे घोषणापत्र
Ladki Bahin Yojana Documents @ Ladkibahin maharashtra gov in
वरील सर्व डॉक्युमेंट ची मुख्यसेविका / ग्रामपंचायत / वॉर्ड अधिकारी / अंगणवाडी सेविका / ग्रामसेवक यांच्या माध्यमातून परत पडताळणी केली जाईल आणि जर सर्व माहिती व्यवस्थित असेल तरच पुढे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. माझी लाडकी बहीण योजना अर्ज करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी राबवण्यात येत असली तरी यासाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत आणि या पात्रता निकषांमुळे बऱ्याच महिला या योजनेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. काही विरोधकांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच आपण जाणून घेतले पाहिजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता कोणकोणत्या आहेत. आपण या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो की नाही.
- महिलेचे वय हे 21 ते 60 वर्षे असावे
- सदर महिला महाराष्ट्रातील नागरिक असावी
- महाराष्ट्रातील विवाहित, विधवा परीत्यक्या आणि निराधार महिला तसेच घटस्फोटीत महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- या योजनेच्या लाभाची मर्यादा साठ वर्षांपर्यंत असेल
- महिलेला या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे
- कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्रता
शासनाने जाहीर केलेला अधिकृत दस्तावेज मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता बरोबरच अपात्रता निकष पण जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजेच बरेच नागरिक या योजने पासून अपात्र पण राहण्याची शक्यता आहे हे अपात्रता निकष कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया.
- ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो अशा कुटुंबाला लाभ भेटणार नाही
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत ते पण या योजने पासून वंचित असतील
- ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी विभागमध्ये कायम कर्मचारी / नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ भेटणार नाही
- परंतु ज्या कुटुंबातील सदस्य बाह्य प्रणाली द्वारे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत अशा कुटुंबीयांना याचा लाभ भेटेल.
- ज्या कुटुंबामध्ये विद्यमान किंवा माजी आमदार / खासदार असेल अशा कुटुंबातील स्त्रियांना याचा लाभ भेटणार नाही.
- ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही
- तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती ट्रॅक्टर वगळता इतर फोर व्हीलर असेल तर त्या कुटुंबाला पण या योजनेपासून वंचित रहावे लागेल.
जर तुम्ही वरील अपात्रता निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज सादर करू शकतात. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सर्वच महिलांसाठी एक योगदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरच या योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत तेव्हा तुम्हाला या योजनेसाठी अर्ज दाखल करावा लागेल सध्या फक्त 15 जुलै पर्यंत म्हणजे 15 च दिवस अर्ज दाखल करता येऊ शकतो म्हणून याविषयीचे लेटेस्ट अपडेट घेत राहण्यासाठी या संकेतस्थळाला वारंवार भेटत देत राहा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा