लाडकी बहिण योजनेचे ऑफिशियल वेब पोर्टल ladki bahin maharastra.gov.in सुरू करण्यात आलेले आहे आणि या वेब पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात, आपले लाभार्थी यादी मध्ये नाव आहे का चेक करू शकतात तसेच अर्ज मंजूर झालेला आहे की नामंजूर ते ऑनलाईन घरबसल्या बघू शकता.
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला असेल किंवा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टलची मदत घ्यावी लागणार आहे कारण आता ॲप व्यवस्थित पद्धतीने काम करत नाही आणि नारीशक्ती ॲप वरती नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत.
फक्त लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तसेच अर्जांची माहिती जाणून घेता येऊ शकते.
महत्त्वाचे मुद्दे:
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेब पोर्टल सुरू
- ladki bahin maharastra.gov.in वेब पोर्टलच्या मदतीने लाभार्थी यादी चेक करता येईल
- लाडकी बहीण योजना पोर्टल च्या मदतीने नवीन अर्ज सादर करता येतील तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल
अनुक्रमणिका ↕️
- Ladki Bahin maharastra.gov.in 2024 Portal
- Ladki Bahin Maharastra Gov In Web Portal 2024
- Mazi Ladki Bahin Yojana Online portal
- Ladki Bahin Maharashtra Gov In Portal Registration
- Ladki Bahin Maharashtra Gov In Portal Login
- Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 online form
- Ladki Bahin Maharashtra Gov In लाभार्थी यादी
- Ladki Bahin Maharashtra Gov In पोर्टलचा उद्देश
Ladki Bahin maharastra.gov.in 2024 Portal
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभ | प्रति महिना 1500 रुपये |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्य महिला |
उद्देश | महिलांना आर्थिक सहाय्य |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
पहिला हफ्ता | 17 ऑगस्ट, 2024 |
लेख प्रकार | लाडकी बहीण वेबसाईट माहिती |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharastra.gov.in |
Ladki Bahin Maharastra Gov In Web Portal 2024
महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली आहे कारण या योजनेमार्फत राज्य सरकारच्या वतीने प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर योजनेची माहिती सांगितली.
त्यानंतर लगेचच जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली परंतु सुरुवातीला हे अर्ज नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून मागविण्यात येत होते पुढे त्यामध्ये बदल करून संबंधित अर्ज वेबसाईट पोर्टलच्या मदतीने मागवण्यात येत आहेत.
सध्या ज्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्यांना ऑनलाईन वेब पोर्टलवरून अर्ज करावा लागत आहे कारण ॲपवरून अर्ज स्वीकारला जात नाही. तसेच ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या महिलांना पुढील प्रक्रियेसाठी ऑनलाईन उपयोग पोर्टल महत्त्वपूर्ण मदत करत आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Online portal
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन पोर्टल ladakibahin.m aharastra.gov.in उघडल्यावरती मुख्य पानावरती तुम्हाला मेनू बारमध्ये योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे.
त्यापासून थोडे खाली गेल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर एकूण प्राप्त झालेल्या अर्जांची संख्याz एकूण मंजूर झालेल्या अर्जांची संख्या तसेच लाडकी बहीण योजना लाभार्थी संख्या देण्यात आलेली आहे.
त्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेची संक्षिप्त माहिती दिसते जिथे आपण अधिक जाणून घ्या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण योजना पात्रता, लाडकी बहीण योजना अपात्रता तसेच लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया नावाचे तीन पर्याय दिसतात.
आणि सर्वात खाली लाडकी बहीण योजना ज्या विभागात अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे त्या महिला आणि बाल कल्याण विभागाचा पत्ता देण्यात आलेला आहे.
Ladki Bahin Maharashtra Gov In Portal Registration
जर तुम्हाला लाडकी बहिण योजना पोर्टल वरती Ladki Bahin Maharashtra Gov In Portal Registration प्रक्रिया पार पाडायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट वरती जा. मेनू बारमध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि लॉगिन फॉर्म उघडल्यानंतर थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा आपले आधार कार्ड नुसार नाव, आपला पत्ता आणि इतर सर्व माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरून साइन अप बटनावरती क्लिक करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका आणि कॅपच्या भरून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
Ladki Bahin Maharashtra Gov In Portal Login
जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल किंवा नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र पोर्टल वरती लॉगिन करावे लागेल त्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहिण योजना वेबसाईट उघडा आणि तिथे अर्जदार लॉगिन पर्याय वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तसेच कॅपच्या भरून लॉगिन करा आणि जर तुम्ही अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जावरती क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज भरा.
Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 online form
जर कोणत्याही कारणास्तव तुमचा लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याचा राहिलेला असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून सदर फॉर्म भरू शकता अद्याप तुम्ही जर रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले नसेल तर तुम्ही वरती दिलेल्या स्टेप्स अनुसार रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि आपल्या मोबाईल नंबर तसेच पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करा. जेव्हा तुम्ही लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला मुख्य पानावरती मेनू बारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक मागितला जाईल तो टाका आणि त्याखाली कॅपच्या असेल तो भरा त्यानंतर ओटीपी पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका आणि सबमिट केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये आधार कार्ड नुसार नाव असेल.
फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती अचूकपणे भरा आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
काही दिवसांनंतर तुमच्या अर्जाची स्थिती बदलली जाईल आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल परंतु जर तुमचा अर्ज बाद झाला असेल तर तुम्हाला एडिट करावा लागू शकतो किंवा पहिल्यापासून नवीन अर्ज सबमिट करावे लागू शकतो.
Ladki Bahin Maharashtra Gov In लाभार्थी यादी
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी बघायची असेल तर तुम्ही ऑफिशियल वेब पोर्टलवरून तसेच ॲपच्या माध्यमातून लाभार्थी यादी बघू शकता याच बरोबर विविध जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्हा अनुसार लाभार्थी यादी चेक करू शकता. (जिल्हा नुसार लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी)
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर करण्यात आला तर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस स्वरूपामध्ये कळविण्यात येते तसेच जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तरी पण त्या संबंधित मेसेज तुमच्या मोबाईल वरती पाठवला जातो.
Ladki Bahin Maharashtra Gov In पोर्टलचा उद्देश
आपल्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की आधी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत होते मग वेगळे पोर्टल करण्याची गरज काय पडली तर नारीशक्ती ॲप च्या माध्यमातून अर्ज भरण्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यावरती लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया यासाठी ते ॲप बनवण्यात आलेले आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी वेगळे ऑफिशियल वेब पोर्टल बनवणे गरजेचे होते त्यावरती फक्त लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात येईल तसेच त्या योजनेचे अर्ज आणि त्यानंतर अर्जापुढील सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पार पाडता यावी यासाठी लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.
आता लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टल मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे आणि त्यावरती ज्या महिलांचे अर्ज राहिलेले आहेत अशा महिला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तसेच आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते चेक करू शकतील.
तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती लाडकी बहीण योजना MMLBY एसएमएस आला आहे का, खाली कमेंट च्या माध्यमातून कळवा
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा