मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सर्वात प्रथम मुंबई येथील वरळी मधील महिलेच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या खात्यावरती एक रुपया पाठवून सर्वरची चाचणी करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर आता प्रत्यक्षात तीन हजार रुपये खात्यांमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे.
9 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया टाकून चाचणी प्रक्रिया पार पडली होती. 14 ऑगस्ट रोजी मुंबई, धाराशिव, लातूर, तसेच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये टाकण्यास सुरुवात
- 9 ऑगस्ट 2024 रोजी एक रुपया टाकुन चाचणी करण्यात आली होती
- 14 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजना 3000 रुपयांचा लाभ देण्याचा सुरुवात
- सिंधुदुर्ग, मुंबई, लातूर, धाराशिव तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांना लाभ
- 31 ऑगस्ट 2024 नंतर लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया निरंतर चालू राहणार
- आधार कार्ड बरोबर बँक अकाउंट लिंक करण्याचे काम युद्ध पातळीवर
- महाराष्ट्रातील 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार
अनुक्रमणिका ↕️
Ladki Bahin Yojana First Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात येईल असे घोषित करण्यात आलेले होते परंतु त्यापूर्वी आता 14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रितपणे 3000 रुपयांचा लाभ महिलांना दिला जात सध्या जुलै 2024 मध्ये ज्या महिलांनी अर्ज भरला आहे अशा महिलांना प्राथमिकता देऊन लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे.
उर्वरित महिलांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये देण्यात येतील तसेच ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही त्यांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत फॉर्म भरता येईल आणि पुढील सप्टेंबर 2024 मध्ये 4500 रुपयांचे राशी देण्यात येईल.
राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना अंतर्गत काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर याबद्दलची माहिती सांगितली.
महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट 2024 रोजी एक कोटी दोन लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रितपणे लाभ देण्याचे एकनाथ शिंदे यांच्यामार्फत नमूद करण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आता महिलांच्या खात्यावरती राशी पाठवली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024, ladakibahin.maharashtra.gov.in
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेचा पहिला हप्ता | 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू |
लाभार्थी खात्यांचे टेस्टिंग | 09 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची मुदत | 31 ऑगस्ट 2024 नंतर पुढे चालू |
पहिल्या हप्त्याचा लाभ | जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये |
योजनेचा उद्देश | महिला सक्षमीकरण आणि आर्थिकीकरण |
राज्य | महाराष्ट्र |
वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा