लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Official Website, असा भरा Online Form Link

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.3/5 - (28 votes)

Mazi Ladki Bahin Yojana Official Website Maharashtra: महाराष्ट्र राज्यांमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे परंतु या योजनेमध्ये अजून बरेच संभ्रम जनतेमध्ये निर्माण झालेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचे ॲप सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्याच्या मधून जवळपास एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेला आहे परंतु अद्याप लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नव्हती.

परंतु आता महाराष्ट्र शासनामार्फत नारीशक्ती दूत ॲप प्रमाणेच लाडकी बहिण योजनेची ऑफिशियल वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे. या वेबसाईटच्या मदतीतून महिला आपल्या अर्जाची स्थिती तसेच आपल्या अर्जातील त्रुटी आणि इतर बाबी जाणून घेऊ शकतील त्याचबरोबर किती महिलांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण दिलेली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • सदर वेबसाईटवर एकूण प्राप्त अर्ज, त्यापैकी मंजूर झालेले अर्ज आणि एकूण लाभार्थी संख्या दर्शवण्यात येईल
  • https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईट वरती आत्तापर्यंत जाहीर झालेले सर्व जीआर बघता येतील आणि कागदपत्रांची यादी डाऊनलोड करता येईल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Website Maharashtra

लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ आहे या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेचे विविध नवनवीन अपडेट प्रसारित केले जातील तसेच शासनामार्फत बनवण्यात आलेल्या या वेबसाईट वरती लाभार्थी महिला लॉगिन करून अर्ज स्थिती जाणून घेऊ शकतील.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या ऑफिशियल संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांना पात्रता निकष, अपात्रता निकष तसेच अर्ज प्रक्रिया जाणून घेता येईल आणि त्यामुळे अर्ज करण्याची प्रोसेस सरळ होईल आणि अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
पात्र लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला
लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्रयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना हमीपत्रयेथे क्लिक करा
ऑफिशियल ॲपनारीशक्ती दूत ॲप
ऑफिशियल वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मधील विवाहित, निराधार, विधवा तसेच घटस्फोटीत आणि परित्यक्ता महिलांना घर चालवत असताना काहीसा आधार मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे याविषयीची अधिकृत घोषणा त्यांनी बजेट मध्ये केलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना साठी जवळपास 46000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातील एक कोटी महिला लाभ घेऊ शकतील. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध तळागाळातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

यासाठी सर्वसामान्य महिला ऑनलाइन फॉर्म भरू शकतील आणि त्या पात्र झाल्यानंतर त्यांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येतील तसेच ज्या महिलांना आधीपासून इतर कोणत्याही योजनेमधून लाभ मिळत असेल आणि जर लाभाचे रक्कम पंधराशे रुपयांपेक्षा कमी असेल तर एकूण फरकाची रक्कम संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Official Website @ mazi ladki bahin yojana.gov.in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट ही mazi ladki bahin yojana.gov.in आहे असा दावा विविध संकेतस्थळांद्वारे करण्यात येत आहे तसेच विविध सोशल मीडियावरती फॉरवर्ड होत असलेल्या मेसेजमध्ये ही वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट असल्याचे सांगण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरु झालेले असून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत असा संदेश व्हायरल होत आहेत.

परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही आहे आणि या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्हायरल होत असलेल्या संपूर्णपणे फेक आहेत आणि अशा वेबसाईट वरती विश्वास ठेवून आपले पैसे फी किंवा इतर कारणास्तव कोणालाही देऊ नका लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणताही फॉर्म फी खर्च लागत नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज भरण्यासाठी विविध व्यक्तींकडून व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून डॉक्युमेंट मागवण्यात येत आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी 200 ते 500 रुपये फी ची पण मागणी घेत आहे परंतु सरकारच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही फॉर्म शुल्क आकारण्यात येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना स्कॅम पासून आपण दूर राहिले पाहिजे.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश

महाराष्ट्रातील बऱ्याच महिला अद्याप रोजगार क्षेत्रामध्ये नाहीत आणि त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर व्यक्तींवरती अवलंबून राहावे लागते आणि अशा महिलांना स्वतःचे व्यवसाय किंवा इतर खर्चासाठी आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आर्थिक स्वरूपामध्ये राशी प्रदान केली जाणार आहे. दर महिना महिलेच्या बँक खात्यामध्ये ही राशी वर्गीत केली जाईल.

mazi ladki bahin yojana.gov.in आवश्यक कागदपत्रे

माझे लाडकी बहीण योजनेसाठी विविध दस्तऐवजांची आवश्यकता आहे ज्यामध्ये तुमच्याकडे बँक पासबुक असणे गरजेचे आहे तसेच आधार कार्ड, राशन कार्ड आणि इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तेव्हा ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित महिला बरोबर असणे गरजेचे आहे म्हणूनच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी विविध दस्तावेज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे जाणून घ्या.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी वेगवेगळे पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहे आणि त्यामधून महाराष्ट्रातील बऱ्याच महिला योजनेपासून दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझी लाडकी बहिण योजना पात्रता निकष कोणते आहेत हे माहीत नसतील तर माझी लाडकी बहीण पात्रता निकष जाणून घ्या.

mazi ladki bahin maharashtra gov in अपात्रता निकष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जसे पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत तर त्याचप्रमाणे अपात्रता निकष पण ठेवण्यात आलेले आहे. तुम्ही पुढील अपात्रता निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुमच्या बँक खात्यामध्ये निर्धारित राशी टाकली जाणार नाही. लाडकी बहीण योजनेचे अपात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत.

  • जी महिला महाराष्ट्राचा नागरिक नाही
  • ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे
  • जे महिला आधीपासूनच कोणत्याही योजनेच्या माध्यमातून दीड हजारापेक्षा जास्त रक्कम प्रति महिना मिळत आहे
  • ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन आहे
  • ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो
  • ज्या कुटुंबात विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे
  • ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयामध्ये परमनंट कामाला आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही परंतु जर बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असेल तर लाभ मिळेल
  • ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, उपक्रम किंवा कोऑपरेशन मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य किंवा संचालक आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटवरून अर्ज दाखल करावे लागतील किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण अंगणवाडी सेविका किंवा इतर सरकारी निर्धारित केलेल्या कार्यालयामध्ये जाऊन आपले लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करू शकतो.

तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मेसेज आला आहे का किंवा या योजनेसाठी कोणी तुमच्याकडे पैसे मागितलेत का याविषयीची माहिती खाली कमेंट करून नक्की सांगा.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment