लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना मिळणार 1500 ऐवजी फक्त 500 रुपये, Ladki bahin yojana update

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4/5 - (1 vote)

महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्येच एक महत्वकांक्षी योजना बनली आहे आणि या योजनेमध्ये लाखो गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होत आहे.

राज्यांमध्ये महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात येत आहे ज्यामुळे लाखो महिलांना 1500 रुपये ऐवजी पाचशे रुपयांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

2025 मधील राज्य आर्थिक बजेट मध्ये लाडकी बहीण योजना चे बजेट 36000 करोड रुपये निर्धारित करण्यात आले आहे. म्हणजेच 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेत वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजनेत बदल होणार
  2. लाखो महिलांचा लाडकी बहीण योजनांचा लाभ कमी करण्यात येणार
  3. 2025 मध्ये लाडकी बहीण योजना लाभात वाढ नाही

Ladki Bahin Yojana 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनामार्फत जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली महिलांसाठीची एक योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांची निश्चित धनराशी देण्यात येते. म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतील तसेच कुटुंबातील एक अविवाहित पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकेल.

लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी विविध निकष ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये पर्मनंट नसावा, विविध बोर्ड तसेच कॉर्पोरेशन मध्ये उच्चपदस्थ नसावा आणि आमदार तसेच खासदार यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही.

जर तुम्ही सर्व निकष पार पाडत असाल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करू शकता आणि तुमचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर तुम्हाला प्रति महिना पंधराशे रुपयांचा लाभ प्राप्त होऊ शकतो.

लाखो महिलांना मिळणार 1500 ऐवजी फक्त 500 रुपये

लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच अनुषंगाने लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल केले जाणार आहेत. जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ देणे तसेच अपात्र महिलांचा लाभ कमी करणे हे योजनेतील बदलांचे उद्दिष्ट असेल.

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना एकाच वेळेस दोन योजनांचा लाभ घेताना लाभाची रक्कम 18000 च्या वर जाणार नाही नियम करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सव्वा आठ लाख महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजेच त्यांना वर्षाला 12000 रुपयांचा लाभ प्राप्त होत आहे आणि त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त सहा हजार रुपये वर्षासाठी प्राप्त होतील.

लाडकी बहीण योजनेनुसार महिलांना अठरा हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ वर्षासाठी देण्यात येणार नाही आणि त्यामुळेच हे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी करून त्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येईल जेणेकरून वर्षाची एकत्रित लाभ रक्कम 18 हजार रुपयांपर्यंत असेल.

महाराष्ट्र राज्यातील आठ लाखांपेक्षा जास्त महिलांना 6000 रुपये प्रति महिना देण्यात यावे यासाठी प्रस्ताव मानण्यात आलेला आहे आणि जर हा प्रस्ताव पारित झाला तर महिलांना लाडकी बहीण योजनेतून प्रति महिना 500 रुपये देण्यात येतील.

लाडकी बहीण योजनेचा हा निर्णय प्रारित झाला तर याचा फटका राज्यातील सव्वा आठ महिलांना होईल आणि त्यामुळे राज्याचा चौदाशे कोटी रुपयांचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्या अपात्र असताना लाभ घेत आहेत.

ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेतून कमी केले जाईल याबद्दलची माहिती सरकारकडून देण्यात आलेला आहे. पुढील कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अधिक बदल करून फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

Leave a Comment