लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडक्या बहिणींसाठी नवीन सरकारचे धमाकेदार गिफ्ट! MMLBY December

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.2/5 - (44 votes)

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे नोव्हेंबर पर्यंतचे हफ्ते महिलांना देण्यात आलेले आहेत.

आता लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट ची वाट बघत आहेत आणि अशातच सरकारच्या माध्यमातून या संदर्भात नवीन अपडेट प्रदान करण्यात आलेले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता बाबत सरकारचे अपडेट
  2. आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी लाडकी बहीण योजनेचे अपडेट दिले
  3. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित
  4. नवीन सरकार चा लाडकी बहीण योजना बाबत निर्णय

MMLBY December Installment

महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार स्थापित झालेले आहे आणि या नवीन सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना नियमित स्वरूपात सुरू राहील असे आधीपासूनच सांगण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने परत महिला आणि बालविकास मंत्रालयात मंत्री बनलेल्या आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लाडके बहिणी योजनेचे अपडेट सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील अडीच कोटी महिलांना डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे आणि राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्गित करण्यात येतील. जर महिलांना आधार कार्ड लिंकिंगबाबत समस्या आलेल्या असतील तर अशा महिलांना पैसे मिळण्यास काही उशीर होऊ शकतो.

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7500 महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि नोव्हेंबर तसेच ऑक्टोबर चा हप्ता निवडणुकीच्या आधीच पाठवण्यात आलेला होता त्यामुळे शेवटचा हप्ता 8 ऑक्टोबर रोजी देण्यात आला आणि आता डिसेंबरचा हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे.

नवीन अर्ज कसा करायचा

लाडकी बहीण योजना मंत्रिमंडळ विस्तार नंतर परत एकदा सुरू करण्यात आलेले आहे आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे हा अर्ज भरावा लागेल.

यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरून अर्ज भरण्याची सुविधा सुरू होती परंतु ही सुविधा आता बंद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील गैर व्यवहार रोखण्यासाठी तसेच अर्जांची संख्या कमी असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment