सध्या काही महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहेत आणि त्यांना MMLBY has been Provisionally Rejected असा मेसेज पाठवण्यात येत आहे.
आता आजच्या या लेखांमध्ये त्यामुळे आपण MMLBY has been Provisionally Rejected असा मेसेज आल्यानंतर पुढे काय करायचे आणि आपल्या अर्जामध्ये कशाप्रकारे बदल करायचे त्या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
महत्त्वाचे मुद्दे:
- जर तुमच्या मोबाईल क्रमांक वरती MMLBY has been Provisionally Rejected असा मेसेज आलेला असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे
- तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये बदल करण्याची आवश्यकता असू शकते
- लाडकी बहीण योजना अर्जात बदल प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुमचा अर्ज परत पडताळणीसाठी पाठवण्यात येईल
अनुक्रमणिका ↕️
MMLBY has been Provisionally Rejected Meaning
MMLBY has been Provisionally Rejected म्हणजेच तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (MMLBY) अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
वरील मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर वरती पाठवण्यात येत आहे आणि आता आपला अर्ज जिल्हा पातळीवरती किंवा इतर कोणत्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे हे आपल्याला समजू शकते आणि तसेच आपले अर्जाचे रिजेक्ट होण्याचे कारण आपल्याला कळू शकते त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.
MMLBY has been Provisionally Rejected Solution
- लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट वरती जा
- मुख्य पानावरती आल्यावर तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाच्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे
- आपल्यापुढे नवीन फॉर्म उघडेल ज्यामध्ये मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या भरून लॉगिन करा
- जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर Forgot password बटनावर क्लिक करा आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल त्याच्या मदतीने पासवर्ड बदला
- लॉगिन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुमच्यापुढे लाडकी बहीण योजना डॅशबोर्ड उघडेल
- तिथे तुम्हाला मेनू बारमध्ये Application made earlier नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये आपले नाव, अर्जाचा क्रमांक, फोटो, अर्जाचे स्टेटस आणि इतर माहिती दिसेल
- जर आपल्या अर्जाच्या स्टेटस मध्ये RE -SUBMIT लिहून आलेले असेल तर आपल्याला आपल्या अर्जाचे रिजेक्ट होण्याचे कारण माहित करावे लागेल
- तिथे तुम्हाला डोळ्याचे चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करा आणि आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म उघडेल
- स्क्रोल करत सगळ्यात खाली जा जिथे आपल्याला लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट होण्याचे कारण समजेल
- उदाहरणार्थ जर तुमचा अर्ज डॉक्युमेंट मुळे रिजेक्ट झालेला असेल तर तिथे Document Issue असा रिमार्क देण्यात येईल
- आता आपल्याला आपला अर्ज एडिट करावा लागेल यासाठी आपल्याला डोळ्याच्या चिन्हाच्या शेजारी असणाऱ्या पेनाच्या चिन्हावरती क्लिक करावे लागेल
- आपला अर्ज उघडेल तिथे परत व्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील
- परंतु जर तुमचा अर्ज इतर कारणामुळे रिजेक्ट झालेला असेल तर त्याप्रमाणे अर्जामध्ये बदल करायला लागतील
- संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज परत सबमिट करा
आपण आपल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज MMLBY has been Provisionally Rejected असा मेसेज आल्यानंतर परत सबमिट केल्यावर आपल्या अर्जाची परत पडताळणी केली जाईल आणि जर सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरलेली असेल आणि डॉक्युमेंट योग्य पद्धतीने अपलोड केलेले असतील म्हणजेच रेशन कार्ड आणि मतदान कार्ड हे पंधरा वर्षांपूर्वीचे असणे आवश्यक आहे आणि फोटो क्लिअर असणे आवश्यक आहे तसेच इतर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन योग्य माहिती अपलोड करावी लागेल.
जर आपल्या अर्जातील सर्व माहिती व्यवस्थित भरली तर आपल्याला आपला अर्ज पडताळणी मध्ये मंजूर होताना दिसेल आणि आपल्याला पुढील महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एकत्रित लाभ घेता येऊ शकतो.
तुमचा लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झाला की बाद झाला तसेच अर्ज बाद झालेला असेल तर कोणते कारण दाखवत आहे हे खाली कमेंट माध्यमातून कळवा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
rejection reason – Other
majha form rejected jhala ahe
Ration card number/Name is not matching……
maza from proivisonally rejected dakhvt ahe Ani website be allready submitted dakhvt ahe tri pn paise ale nhi ata prtnt …………..🙏
majha form 10 August la bharla pan ajun status pending ahe
तुमच्या लाडकी बहीण योजना अर्जाची सरकारी अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्यात आलेली नाही त्यामुळे तुमच्या अर्जाचे स्टेटस पेंडिंग दाखवत आहे
maza from proivisonally rejected dakhvt ahe Ani website be allready submitted dakhvt ahe tri pn paise ale nhi ata prtnt