लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

MMLBY Official Website: Apply Online, Form, Status and List Maharashtra

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (45 votes)

MMLBY: महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर 35 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

लाडकी बहिणी योजनेला शॉर्ट फॉर्म मध्ये MMLBY असे संबोधिण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये सुरू करण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण करणे आणि त्यांना काहीशी आर्थिक मदत करून दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा आहे.

लाडकी बहीण योजना साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे या योजनेचे अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे.

आता या योजनेचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमी वरती लाभार्थी यादी जाहीर करून तसेच लाभार्थ्यांना आणि फॉर्म करणाऱ्या महिलांना एसएमएस स्वरूपामध्ये त्यांच्या अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • MMLBY म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • या योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत
  • लवकरच 17 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचा पहिला हप्ता देण्यात येईल
  • यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांच्या मोबाईलवर शासनाकडून एसएमएस स्वरूपात अर्जाची स्थिती सांगण्यात येते

MMLBY – Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (MMLBY)
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे उद्देशमहाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य
डायरेक्ट लाभप्रति महिना 1500 रुपये
अर्ज कसा करायचाऑनलाइन तसेच ऑफलाईन
अर्ज शुल्क0 /-
जिल्हा नुसार लाभार्थी यादीइथे क्लिक करा
मुख्य वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
उपयुक्त ॲपनारीशक्ती दूत

MMLBY apply online

जेव्हा जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती तेव्हा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपचा उपयोग केला जात होता परंतु मागील काही दिवसांपूर्वी या ॲपवरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थिती करण्यात आली आहे आणि त्या ऐवजी ऑनलाइन वेब पोर्टल वरून अर्ज भरता येऊ शकतात.

यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम MMLBY web portal म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावर क्लिक करून Doesn’t have account, Create account पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि तिथून आपल्या अकाउंट चे रजिस्ट्रेशन करायचे आहे

त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती लॉगिन करून तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर तसेच इतर महत्त्वाची डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवावी लागतील.

ज्या महिलांना ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज भरता येत नाहीत किंवा ऑनलाईन अर्ज भरताना अडचणीचा सामना करावा लागतो अशा महिला ऑफलाइन पद्धतीने आशा सेविका किंवा इतर सरकारी ऑफिसमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरू शकतात.

MMLBY has approved means

MMLBY has approved means म्हणजेच तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला गेलेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होणार आहे. 1500 रुपये प्रति महिना तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने ट्रान्सफर केले जातील आणि वर्षाला तुम्हाला 18 हजार रुपयांचा एकूण लाभ मिळेल.

MMLBY has rejected means

MMLBY has rejected means म्हणजेच तुमचा लाडकी बहिणी योजनेचा अर्ज रिजेक्ट केला गेला आहे आणि तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करावा लागू शकतो किंवा जो अर्ज तुम्ही केलेला आहे त्यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे यशस्वी बदल घडून परत करावा लागू शकतो त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल आणि तुमचा अर्ज सर्व पद्धतीने योग्य असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

हे पण वाचा: वेबसाईट वरून MMLBY अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस

MMLBY Website Login Maharashtra

MMLBY Website login करण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहिण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ladki bahin maharashtra gov in वरती जा तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड तसेच कॅपच्या भरून लॉगन करा आणि जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलेला असाल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी Forgot password बटनावरती क्लिक करा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती त्यानंतर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका आणि तुमचा पासवर्ड बदला त्यानंतर तुम्ही नवीन पासवर्ड सह लॉगिन करू शकता.

MMLBY Application Status Check

जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, MMLBY स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम ऑफिशियल वेबसाईट वरती जाते ते अर्जदार लॉगिन पर्याय वर क्लिक करून आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये लॉगिन करा. जेव्हा तुम्ही योग्य मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन कराल तेव्हा मुख्य पानवर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प दिसेल त्यावरती क्लिक करा. तुमच्या पुढे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्या अंतर्गत तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकता आणि जर अर्ज मध्ये काही कमी असेल तर ती एडिट करून परत अर्ज सादर करू शकता.

MMLBY online form

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जून 2024 रोजी ऑफिशियल जीआर काढण्यात आला आणि त्यामध्ये जुलै 2024 पासून अर्ज सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आणि सुरुवातीला फक्त पंधरा दिवसच हे अर्ज असतील अशी माहिती देण्यात आली होती.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महिलांकडून मोठी टीका केली जात होती त्यानंतर संबंधित शासन निर्णयामध्ये परत बदल करून ही मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निर्धारित करण्यात आली.

आणि ज्या महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येईल असे शासनामार्फत नमूद करण्यात आलेले आहे

त्याच अंतर्गत आता पहिला हप्ता देण्यात येणार आहे जो 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात येईल आणि उर्वरित राहिलेल्या महिलांना नंतर पुढील महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात येईल.

काही महत्त्वाचे प्रश्न

MMLBY म्हणजे काय?

MMLBY मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

MMLBY ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे?

MMLBY साठी ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in आहे

लाडकी बहीण लाभार्थी यादीत नाव नसेल तर काय करायचे?

जर तुमचे नाव लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीमध्ये नसेल तर तुम्ही तुमचा अर्ज एडिट करून परत सबमिट करू शकतात तसेच तुम्ही पुन्हा नव्याने नवीन अर्ज दाखल करू शकता.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

5 thoughts on “MMLBY Official Website: Apply Online, Form, Status and List Maharashtra”

    • जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नसतील आणि सर्व माहिती योग्य असेल तर पुढील काही कालावधीत तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे

      उत्तर

Leave a Comment