Ladki bahin yojana status: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही, पटकन जाणून घ्या योजना स्टेटस

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 2.4/5 - (11 votes)

लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर ladki bahin yojana status जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते लाडकी बहीण योजनेच्या स्टेटस मुळे आपल्याला आपला अर्ज स्वीकार झालेला आहे की नाही याविषयीची माहिती कळते तसेच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे की नाही त्याविषयी माहिती प्राप्त करून घेता येते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करून फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल याविषयीची तरतूद करणार असल्याची माहिती दिलेली आहे. पुढील काही कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेचा एकत्रित तीन हजार रुपयांचा आठवा आणि नववा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे परंतु काही महिलांच्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा झालेली नाही.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. महिलांच्या बँक खाते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता जमा
  2. 2.52 कोटी महिलांना लाभ
  3. बँक खात्यात पैसे आले की नाही कसे चेक करायचे

Ladki bahin yojana status

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.

राज्यातील अडीच कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा हस्ता जमा करण्यात आला आहे तसेच मार्च महिन्याचा हप्ता पण एकत्रितपणे देण्यात आलेला आहे.

mmlby status check

  1. लडकी बहीण योजनेचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा केल्यानंतर बँकेकडून अधिकृत मोबाईल क्रमांक वरती एसएमएस पाठवण्यात येतो
  2. जर तुम्हाला एसएमएस प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही बँकेच्या टोल फ्री क्रमांक वरती फोन करून बॅलन्स जाणून घेऊ शकता तसेच बँकेच्या एसएमएस सर्विस चा वापर करून खात्याची माहिती प्राप्त करू शकता.
  3. जर तुमचे बँक खाते ऑनलाइन पद्धतीने जोडलेले असेल तर तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या माध्यमातून बँक बॅलन्स चेक करू शकता
  4. जर तुमच्या बँक खात्यामध्ये डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मशीनच्या माध्यमातून तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही त्याचा बॅलन्स चेक करू शकता
  5. तुम्ही तुमच्या बँकेला भेट देऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकाल

Ladki bahin yojana money not received

जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नसतील तर त्यामागे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक नसणे हे महत्त्वाचे कारण असू शकते आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे aadhar seeding चेक करणे महत्त्वाचे ठरते.

तुमचे आधार कार्ड हे बँक क्रमांकाला चेक आहे की नाही हे घरबसल्या चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम माय आधारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल आणि तिथे आधार सेटिंग पर्यावरण क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकून तसेच त्याच्या भरल्यानंतर मोबाईलवर येणाऱ्या आधार ओटीपीच्या माध्यमातून आपले आधार सिडींग स्टेटस जाणून घेता येईल.

जर तुमचे आधार कार्ड हे बँक क्रमांकाला लिंक केलेले नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड हे बँक क्रमांकाला लिंक करावे लागेल

लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना जे बँक अकाउंट आधार कार्ड लिंक आहे अशा अकाउंट वरती पैसे जमा झालेले आहेत परंतु जर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट हे आधार कार्ड ला लिंक केलेले असतील तर तुमच्या आधार कार्ड लिंक केलेले कोणत्याही बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचे बघायला मिळाले आहे.

जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी आवेदन पाठवलेल्या नसेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे लाडकी बहीण योजनेसाठी अभिनंदन पाठवावे लागेल आणि तुमच्या आवेदन चा स्वीकार झाल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होण्यास सुरवात होईल.

Leave a Comment